AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मला ती खूप आवडते.. डोनाल्ड ट्रम्प यांचे इटलीच्या पंतप्रधानांबद्दल मोठे विधान, थेट म्हटले, तिने..

डोनाल्ड ट्रम्प यांनी इटलीचा पंतप्रधानांबद्दल मोठा दावा केला होता. ज्यानंतर दोन्ही देशातील संबंध अधिक ताणले. आता पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प यांची भाषा थेट बदलताना दिसत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी मेलोनी यांच्याबद्दल असे काही भाष्य केले की, अनेकांनी भुवया उंचावल्या.

मला ती खूप आवडते.. डोनाल्ड ट्रम्प यांचे इटलीच्या पंतप्रधानांबद्दल मोठे विधान, थेट म्हटले, तिने..
Donald Trump and Giorgia Meloni
| Updated on: Jul 08, 2026 | 10:12 AM
Share

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कधी काय बोलतील आणि काय निर्णय घेतील, याचा अजिबात काही नियम नाही. काही दिवसांपूर्वीच डोनाल्ड ट्रम्प हे इटलीच्या पंतप्रधानांवर टीका करताना दिसले. युद्धादरम्यान इटलीने मदत केली नसल्याने ते प्रचंड नाराज होते. हेच नाही तर त्यांच्यावर बंदी घालण्याची भाषा देखील बोलली जात होती. आता तिच भाषा थेट बदलली आहे. नुकताच डोनाल्ड ट्रम्प यांनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचे तोडभरून काैतुक केले. फक्त काैतुकच नाही तर त्या मला खूप आवडतात, असेही थेट डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटल्याने अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत. एक चांगली व्यक्तीही डोनाल्ड ट्रम्प यांनी मेलोनी यांना म्हटले.  मदत न केल्याबद्दल त्यांच्यावर टीकाही केली. यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका विधानामुळे दोन्ही देशांमधील संबंधांत कटुता आली होती. दोन्ही देशाचे संबंध चांगलेच ताणले होते. मात्र, पुन्हा त्यांनी इटलीचे काैतुक करण्यास सुरूवात केली.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या अत्यंत जवळचे म्हणून मेलोनी यांच्याकडे बघितले जात होते. मात्र, मागच्या काही दिवसांचा विचार केला असता संबंध ताणले होते. G7 समिटमध्ये मेलोनी यांनी त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी खूप जास्त विनंती केली होती, असा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता. त्यानंतर मेलोनी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा खोटा असून खोटे आरोप केल्याचे म्हटले होते.

फक्त हेच नाही तर इटलीच्या विदेश मंत्र्यांनी थेट अमेरिकेचा दाैराही रद्द केला होता. यासर्व प्रकरणामुळे मेलोनी यांच्यासोबत डोनाल्ड ट्रम्प यांचे संबंध खराब झाले होते. हेच नाही तर डोनाल्ड ट्रम्प यांची मदत करण्यासही इटलीने नकार दिला होता. डोनाल्ड ट्रम्प यांनी तुर्कीमध्ये आता म्हटले की, त्यांनी आमच्यासोबत सहभागी होण्यास मनाई केली. ज्यामुळे संबंध खराब झाले.

पण मला खूप आवडते ती… मला वाटते की, ती एक खरी चांगली व्यक्ती आहे. पण मला वाटते की, तिने चूक केली. फोटोच्या वादात इटलीने उत्तर न देण्याची भूमिका घेतली आहे. मार्च महिन्यात इटलीने अमेरिकन लष्करी विमानांना सिसिलीच्या सिगोनेला विमानतळावर उतरण्याची परवानगी नाकारली, वॉशिंग्टनने मेलोनी सरकारची मंजुरी घेतली नव्हती. तेव्हापासूनच संबंध अधिक तणावात होती.

Follow Us
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाई...
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाईमुळे नातेवाईकांची तीव्र नाराजी