
जगातील सर्वात चर्चित चेहरा म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प. पण सध्या ते एका आजाराने त्रस्त झाले आहेत. त्यांच्या आरोग्यविषयक अहवालाने सध्या अमेरिकेत खळबळ उडाली आहे. ट्रम्प यांना नेमकं झालं तरी काय? त्यांना शिरांसंबंधीचा कोणता आजार झाला आहे याची चर्चा होत आहे. त्यांना शिरांसंबंधीचा आजार ‘क्रॉनिक व्हेनस इन्सफिशियन्सी’ झाला आहे. हा आजार किती धोकादायक आहे? त्याची लक्षणं तरी काय?
काय आहे हा आजार?
डॉ. नवीन शर्मा यांनी ‘क्रॉनिक व्हेनस इन्सफिशियन्सी’ या आजाराविषयी माहिती दिली आहे. त्यानुसार, या आजारात पायांच्या नसा, शिरा या हृदयाकडे रक्त योग्यरित्या परत पाठवू शकत नाही. सामान्यतः नसांमध्ये झडपा असतात, ज्यामुळे रक्त फक्त एकाच दिशेने वाहू शकते. पण असा आजार झाला तर रक्तवाहिन्यातील झडपा कमकुवत होतात. त्या योग्य रित्या काम करत नाही. परिणामी पायांमध्ये रक्त साचू लागते. मग पायांना सूज, वेदना आणि इतर समस्या उद्भवतात.
क्रॉनिक व्हेनस इन्स्युफिशियसीची लक्षणं काय?
हा आजार धोकादायक आहे का?
हा आजार जीवघेणा नाही. पण त्यामुळे व्यक्ती अस्वस्थ नकी होतो. वेळेवर त्याचा इलाज, त्यावर उपचार करणे महत्त्वाचे आहे. उपचार न घेतल्यास दैनंदिन व्यवहारात व्यक्तीला खूप त्रास होतो. पायात सातत्याने वेदना, सूज आणि चालताना त्रास होतो. भयंकर वेदनेने व्यक्ती तळमळतो. त्यामुळे शारीरिकच नाही तर मानसिकही त्रास वाढतो.
या आजारावर इलाज काय?
क्रॉनिक व्हेनस इन्स्युफिशियवर उपचार शक्य आहे. नस, शिरासंबंधीच्या या आजारावर उपचार करता येतात. या आजाराचा त्रास किती आहे, त्यानुसार इलाज करण्यात येतो.
जीवनशैलीतील बदल करा : वजन नियंत्रित करा, दररोज चालत रहा आणि एकाच स्थितीत जास्त वेळ बसणे किंवा उभे राहणे टाळा.
कॉम्प्रेशन स्टॉकिंग्ज : यामुळे पायांमध्ये रक्तप्रवाह नियंत्रित करण्यास मदत होते.
औषधं काय : सूज आणि वेदना कमी करण्यासाठी काही औषधे दिली जातात.
लेसर अथवा शस्त्रक्रिया: जर स्थिती गंभीर असेल तर लेसर उपचार अथवा शस्त्रक्रिया असे उपाय केले जाऊ शकतात.