AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेण्याआधी डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतली मुकेश आणि नीता अंबानी यांची भेट, पाहा खास फोटो

डोनाल्ड ट्रम्प हे उद्या दुसऱ्यांदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्या शपथविधीच्या कार्यक्रमाला दिग्गजांची मांदियाळी असणार आहे. विशेष म्हणजे ट्रम्प यांनी शपथविधीच्या एक दिवस आधी जेवणाच्या विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. या कार्यक्रमाला त्यांनी जगभरातील दिग्गजांना निमंत्रण दिलं आहे. यामध्ये भारताचे प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा समावेश आहे.

राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेण्याआधी डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतली मुकेश आणि नीता अंबानी यांची भेट, पाहा खास फोटो
शपथ घेण्याआधी डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतली अंबानी दाम्पत्याची भेट
Chetan Patil
Chetan Patil | Edited By: | Updated on: Jan 20, 2025 | 1:47 PM
Share

डोनाल्ड ट्रम्प उद्या 20 जानेवारीला अमेरिकेच्या 47 व्या राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेणार आहेत. या शपथविधीच्या भव्य कार्यक्रमात राजकारणी, उद्योगपतींसह विविध क्षेत्रातील ख्यातनाम दिग्गजांचा समावेश असणार आहे. विशेष म्हणजे शपथविधीच्या आधी डोनाल्ड ट्रम्प यांनी आज जेवणाच्या भव्य कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. या कार्यक्रमासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभरातील दिग्गजांना निमंत्रण दिलं आहे. या कार्यक्रमात भारताचे प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांच्या पत्नी नीता अंबानी या देखील सहभागी झाल्या आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या निमंत्रणानंतर अंबानी दाम्पत्य आता कार्यक्रमासाठी अमेरिकेत दाखल झाले आहेत. त्यांची डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत भेट झाली असून ट्रम्प यांनी त्यांचं स्वागत केलं आहे.

मुकेश अंबानी आणि नीता अंबानी हे डोनाल्ड ट्रम्प यांच्या खास आमंत्रित पाहुण्यांपैकी एक आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीसाठी 100 विशेष पाहुण्यांचा समावेश आहे. अशा 100 पाहुण्यांमध्ये अंबानी दाम्पत्य देखील आहे. अंबानी कुटुंबीय आणि ट्रम्प कुटुंबीय यांच्यात अनेक काळापासून घनिष्ठ संबंध आहेत. इवांका ट्रम्प 2017 मध्ये भारत दौऱ्यावर आल्या होत्या तेव्हा मुकेश अंबानी यांनी त्यांचं स्वागत केलं होतं. तसेच डोनाल्ड ट्रम्प फेब्रुवारी 2020 मध्ये भारत दौऱ्यावर आले तेव्हादेखील मुकेश अंबानी त्यांच्यासोबत होते.

शपथविधीच्या कार्यक्रमात असणार दिग्गजांची मांदियाळी

डोनाल्ड ट्रम्प उद्या दुसऱ्यांदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्या शपथविधीचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला जगभरातील दिग्गज उपस्थित असतील. यामध्ये अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष जो बायडन, उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरीस, माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, जॉर्ज बुश, बिल क्लिंटन यांचा समावेश असण्याची शक्यता आहे. तसेच टेक्नोलॉजी आणि उद्योग क्षेत्रातील एलन मस्क, जेफ बेजोस, टिम कुक, मार्क जुकरबर्ग, सुंदर पिचाई, सॅम ऑल्टमॅन हे देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

या कार्यक्रमातून डोनाल्ड ट्रम्प यांच्या केवळ दुसऱ्या कार्यकाळाची सुरुवात होणार नाही तर त्यांचा जगात असलेला प्रभाव आणि नेटवर्कही दिसून येणार आहे. या कार्यक्रमातून राजकारण, तंत्रणात आणि उद्योग क्षेत्रातील अनेक दिग्गज एकाच मंचावर एकत्र येताना दिसणार आहेत. तसेच डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी हा कार्यक्रम आगामी वाटचालींसाठी जास्त महत्त्वाचा ठरणार आहे.

Follow Us
माझ्या मुलाने काही केलं नाही; यात हात असेल तर...पुर्णेकर प्रकरणात
Pradip Purnekar | माझ्या मुलाने काही केलं नाही; यात हात असेल तर... प्रदीप पुर्णेकर प्रकरणात पप्या शिंदेंच्या आईचा मोठा दावा
वाल्मिक कराड जेलमध्ये असला तरी अनेकांसोबत फोनवरून संवाद - बजरंग सोनवणे
Bajrang Sonawane : वाल्मिक कराड जेलमध्ये असला तरी अनेकांसोबत फोनवरून संवाद; बजरंग सोनवणेंचा गंभीर आरोप
1285 गावांची पैसेवारी 50 पैशांखाली; शेतकऱ्याने उभं सोयाबीनच जाळलं
Amravati : अमरावतीत दुष्काळाचा कहर; 1285 गावांची पैसेवारी 50 पैशांखाली; शेतकऱ्याने उभं सोयाबीनच जाळलं
50 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; सूर्या प्रकल्पग्रस्तांना...
Chandrshekhar Bawankule : 50 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; सूर्या प्रकल्पग्रस्तांना मिळणार प्रॉपर्टी कार्ड अन्...
उद्याच्या CJP मोर्चाला पवारांची राष्ट्रवादी मैदानात; सुप्रिया सुळेंनी
NCP Sharad Pawar on CJP : उद्याच्या CJP मोर्चाला पवारांची राष्ट्रवादी मैदानात; सुप्रिया सुळेंनी जाहीर केला पाठिंबा
पूर्णेकरला संपवण्यामागे कोणाचा हात?, राऊतांनी सगळंच सांगून टाकलं
Sanjay Raut on Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा दावा! पूर्णेकरला संपवण्यामागे कोणाचा हात?, राऊतांनी सगळंच सांगून टाकलं
तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन
CM DCM Meeting : रात्री उशिरा तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन; जागावाटपावर खलबतं - सुत्र
लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेलं 1 किलो सोनं एवढ्या कोटींना विकलं
Lalbaugcha Raja Auction : लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेलं 1 किलो सोनं तब्बल एवढ्या कोटींना विकलं! बाप्पाचा आशीर्वाद मानून भक्तानेच खरेदी केलं
मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांवर ED ची नजर? तब्बल एवढ्या कोटींच्या....
Manoj Jarange ED : मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांवर ED ची नजर? आर्थिक व्यवहारांची गोपनीय चौकशी सुरू; तब्बल एवढ्या कोटींच्या व्यवहारांचा दावा
हे जैनांचं नाही, आगरी-कोळी, मराठी बांधवांचं शहर; मनसेचा कोणाला टोला?
MNS On Narendra Mehata : मीरा-भाईंदरच्या ओळखीवरून राजकीय रणकंदन! हे जैनांचं नाही, आगरी-कोळी आणि मराठी बांधवांचं शहर; मनसेचा नेमका कोणाला टोला?