Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर दबाव वाढवला, मोठा झटका देण्याच्या तयारीत
Donald Trump : भारत-पाकिस्तानमध्ये मीच सीजफायर घडवून आणली डोनाल्ड ट्रम्प असा दावा वारंवार करुन भारतीय सत्ताधाऱ्यांच्या अडचणी वाढवत आहेत. आता ट्रम्प यांनी भारतावर दबाव टाकण्याची खेळी सुरु केली आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तान सीजफायर आणि टॅरिफ बाबत मोठं वक्तव्य केलं आहे. भारत-पाकिस्तानमध्ये झालेल्या सीजफायरच सुद्धा त्यांनी पुन्हा एकदा श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. “भारत माझा मित्र आहे. माझ्या विनंतीवरुन त्यांनी पाकिस्तानसोबत युद्ध संपवलं” असं ट्रम्प म्हणाले. भारत-अमेरिकेमध्ये ट्रेड डील अद्याप अंतिम झालेली नाही. त्यावरुन डोनाल्ड ट्रम्प भारतावर दबाव टाकतायत. भारतावर 20 ते 25 टक्के टॅरिफ लावला जाऊन शकतो असं ट्रम्प म्हणाले. टॅरिफवर अजून कोणता निर्णय झालेला नाही, असही ते म्हणाले. भारत 20 ते 25 टक्के टॅरिफ भरणार का?. मला असं वाटतं, असं उत्तर ट्रम्प यांनी दिलं. “भारत एक चांगला मित्र आहे. पण त्यांनी इतर देशांच्या तुलनेत अमेरिकी सामनांवर जास्त टॅरिफ आकारला आहे” असं ट्रम्प म्हणाले.
अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प एअरफोर्स वन विमानात पत्रकारांशी बोलत होते. त्यावेळी टॅरिफच्या प्रश्नावर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, “भारत एक चांगला मित्र आहे. पण मागच्या काही वर्षांपासून अमेरिकी सामनावर जास्त टॅरिफ आकारतोय” त्याचवेळी ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तानमध्ये सीजफायर घडवून आणल्याचा दावा केला. ‘पाकिस्तान सोबत संघर्ष संपवण्याच मी भारताला आवाहन केलं होतं’ असं ट्रम्प म्हणाले.
अमेरिकेची टीम कधी भारतात येणार?
भारतासह अनेक देश अमेरिकेसोबत ट्रेड डिलला अंतिम स्वरुप देण्याच्या मागे लागले आहेत. अमेरिकेची टीम पुढच्या महिन्याात बैठकीसाठी भारतात येत आहे. दोन्ही देशांमध्ये प्रस्तावित द्विपक्षीय ट्रेड डीलवर पुढच्या फेरीची चर्चा करण्यासाठी 25 ऑगस्टला अमेरिकेची टीम भारतात येईल.
अमेरिकेची रणनिती काय?
जे देश आमच्यासोबत ट्रेड डीलवर चर्चा करणार नाहीत, त्यांच्याकडून आम्ही 15 ते 20 टक्के टॅरिफ वसूल करु शकतो असा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी जगातील काही देशांना दिला आहे. एप्रिल महिन्यात अमेरिकेने 10 टक्के टॅरिफची बेस लाइन निश्चित केलेली. आता त्यापेक्षा जास्त टॅरिफ आकारण्याचे संकेत आहेत. त्यामुळे छोट्या देशांवर आर्थिक ताण वाढू शकतो.
