AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ट्रम्पमुळे सोयाबीन शेतकऱ्यांना फटका, चीनने असे टाकले फासे की ब्राझीलची झाली चांदी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची टॅरिफनिती आता त्यांच्याच अंगाशी येत असल्याचं दिसत आहे. कारण ब्रिक्समधील आणखी एका देशाला चीनने पायघड्या घातल्या आहे. अमेरिकेने भारताप्रमाणे ब्राझीलवर 50 टक्के टॅरिफ लादला होता. पण आता चीनने असे फासे टाकले की अमेरिकच्या शेतकऱ्यांना घाम फुटला आहे.

ट्रम्पमुळे सोयाबीन शेतकऱ्यांना फटका, चीनने असे टाकले फासे की ब्राझीलची झाली चांदी
ट्रम्पमुळे सोयाबीन शेतकऱ्यांना फटका, चीनने असे टाकले फासे की ब्राझीलची झाली चांदीImage Credit source: TV9 Network/File
| Updated on: Aug 22, 2025 | 4:54 PM
Share

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचं डोकं फिरल्याचं दिसत आहे. इतर देशांची प्रगती त्यांच्यासाठी पोटदुखी ठरत आहे. त्यामुळे टॅरिफ नितीचा अवलंब करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे अनेक देशांच्या निर्यातीवर परिणाम झाला आहे. पण आता त्यांची रणनिती त्यांच्याच अंगाशी येत असल्याचं दिसत आहे. भारतावर 50 टक्के टॅरिफ लादल्यानंतर रशिया आणि चीनने भारतीय वस्तूंसाठी रेड कार्पेट अंथरलं आहे. त्यानंतर ब्रिक्स देशांनी डोनाल्ड ट्रम्प यांना आणखी एक दणका दिला आहे. अमेरिकेतली आयात कमी करण्याची रणनिती अवलंबली आहे. ब्रिक्समधील ब्राझीलवरही अमेरिकेने भारतासारखं 50 टक्के टॅरिफ लावला आहे. पण अमेरिकेचा हा डाव उलटा पडताना दिसत आहे. कारण आता चीन अमेरिकेऐवजी ब्राझीलकडून सोयाबीनची आयात करत असल्याचं वृत्त आहे.

चीन हा सोयाबीनची मोठ्या प्रमाणात आयात करतो. पण मागच्या काही महिन्यात चीनने अमेरिकेकडून सोयाबीनची आयात कमी केली आहे. मिडिया रिपोर्टनुसार, सप्टेंबर ऑक्टोबरच्या आगाऊ खरेदीत एक टनदेखील खरेदी केली नाही. त्यामुळे अमेरिकेचे शेतकरी चिंतेत पडले आहे. चीनने आता अमेरिकेऐवजी ब्राझीलकडे सोयाबीन खरेदीचा मोर्चा वळवला आहे. जास्तीचे पैसे मोजून चीन आपली गरज भागवत आहे. चीनने जुलै महिन्यात अमेरिकेकडून 4 लाख 20 हजार 873 टन सोयाबीन आयात केला. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे 11.47 टक्क्यांची घट होती. मागच्या महिन्यात चीनच्या सोयाबीन आयातीत 19 टक्क्यांनी वाढ झाली. पण यात 90 टक्के वाटा हा ब्राझीलचा होता. तर अमेरिकेतून फक्त 4 टक्के आयात केली.

चीनच्या रणनितीमुळे अमेरिकेतील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली. इतकंच काय तर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र लिहून भीती व्यक्त केली आहे. “आमच्या सर्वात मोठ्या ग्राहकासोबतच्या टॅरिफ वादामुळे टिकू शकत नाहीत.” चीनने ब्राझीलकडून आयात सुरुच ठेवल्यास अमेरिकेतील शेतकऱ्यांचं अब्जवधींचं नुकसान होण्याची शक्यता आहे.  दरम्यान, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी ब्राझीलच्या लुईझ इनासियो लुला दा सिल्वा यांच्याशी फोनवरून चर्चा केली. या चर्चेनंतर जिनपिग यांनी सांगितलं की, “ब्राझीलचे कायदेशीर हक्क आणि हितसंबंध जपण्यासाठी त्याचे समर्थन करतो.”

महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.