
President Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी अत्यंत दिमाखदार सोहळ्यात अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली आहे. ते अमेरिकेचे 47वे राष्ट्रपती बनले आहेत. तसेच राष्ट्रपतीपदाची त्यांची ही दुसरी टर्म आहे. या आधी 2016 ते 2020पर्यंत त्यांनी राष्ट्रपती म्हणून काम पाहिले होते. डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याला जगभरातील लोक उपस्थित होते. उद्योजक, सेलिब्रिटींसह विविध क्षेत्रातील मान्यवर या सोहळ्याला उपस्थित होते. ट्रम्प यांची ही सेकंड इनिंग आहे. त्यांच्या या इनिंगचा कोणत्या कोणत्या देशाला फटका बसू शकतो, त्यावर टाकलेला हा प्रकाश. चीन पहिला शिकार ट्रम्प यांच्या इनिंगचा सर्वात पहिला शिकार चीन होणार आहे. तसे संकेतच त्यांनी त्यांच्या भाषणात केला आहे. ओव्हल ऑफिसमध्ये ट्रम्प फाईलींवर सही करत होते. तेव्हा ते मीडियाच्या प्रश्नांची उत्तरेही देत होते. जर चीनने (अमेरिका-टिकटॉक डील) मंजूरी नाही दिली तर आम्ही चीनवर टॅरिफ लावू शकतो. चीन आमच्यावर टॅरिफ लावतो आणि आम्ही त्यांच्यावर अत्यंत कमी टॅरिफ...