AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अफगाणिस्तानवर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची तातडीची बैठक; आंतरराष्ट्रीय समुदायाला एकजूट दाखवण्याचे आवाहन

बैठकीत संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस म्हणाले की, मी सर्व पक्षांना, विशेषत: तालिबानला लोकांच्या जीवनाचे रक्षण करण्यासाठी आणि संयम बाळगण्यासाठी आवाहन करतो.

अफगाणिस्तानवर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची तातडीची बैठक; आंतरराष्ट्रीय समुदायाला एकजूट दाखवण्याचे आवाहन
काबूलमधील परिस्थितीनंतर भारताने सुरू केला ई-आणीबाणी एक्स-मिस्क व्हिसा
| Edited By: | Updated on: Aug 17, 2021 | 1:49 AM
Share

संयुक्त राष्ट्रसंस्था : अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांनी कब्जा मिळवल्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने सोमवारी तातडीची बैठक घेतली. मागील आठवडाभरातील सुरक्षा परिषदेची ही दुसरी बैठक होती. बैठकीत संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस म्हणाले की, मी सर्व पक्षांना, विशेषत: तालिबानला लोकांच्या जीवनाचे रक्षण करण्यासाठी आणि संयम बाळगण्यासाठी आवाहन करतो. अफगाणिस्तानमध्ये अराजकता निर्माण झाली आहे. तेथील जनतेमध्ये प्रचंड अस्वस्थतेचे वातावरण असून स्वत:चा जीव वाचवण्यासाठी लोक शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. या संकटात संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने शांततेसाठी पाऊल टाकले आहे. (Emergency UN Security Council meeting on Afghanistan; Appeal to the international community to show unity)

गुटेरेस नेमके काय म्हणाले?

अफगाणिस्तानमध्ये सुरू असलेल्या संघषार्मुळे हजारो लोकांना घरे सोडावी लागली आहेत. राजधानी काबुलमध्ये देशाच्या इतर प्रांतातून अंतर्गत विस्थापित लोकांचा मोठा ओघ दिसून आला आहे. मी या नागरिकांच्या संरक्षणासाठी सर्व पक्षांना त्यांच्या कर्तव्यांची आठवण करून देतो. मी सर्व पक्षांना आवाहन करतो की लोकांना जीवनरक्षक सेवा आणि मदतीसाठी विनाअट प्रवेश द्या, असे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या आपत्कालीन बैठकीत संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी आवाहन केले.

अफगाणिस्तानातील भयंकर स्वरुपाच्या मानवतावादी संकटावर अँटोनियो गुटेरेस यांनी चिंता व्यक्त केली. याचवेळी ते म्हणाले, मी सर्व देशांना निर्वासितांचा स्वीकार करण्याचे आवाहन करतो. अफगाणिस्तानातील दहशतवादाच्या धोक्याला सामोरे जाण्यासाठी संपूर्ण जगाला एक होणे आवश्यक आहे. अफगाणिस्तानला भविष्यात कधीही दहशतवादी संघटनांचे सुरक्षित आश्रयस्थान बनू देणार नाही, याची खात्री करण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाने एकत्र आले पाहिजे. मी सर्व पक्षांना त्यांच्या अफगाणिस्तानातील नागरिकांचे संरक्षण करण्याच्या कर्तव्यांची आठवण करून देत आहे, असे गुटेरेस यांनी नमूद केले.

मानवी हक्कांचे संरक्षण करा

बैठकीत अँटोनियो गुटेरेस यांनी मानवी हक्कांच्या संरक्षणाचा मुद्दा प्रामुख्याने उपस्थित केला. ते म्हणाले, अफगाणिस्तानातील जनतेच्या मानवी हक्कांचे संरक्षण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाने एका आवाजात बोलले पाहिजे. मी तालिबान आणि सर्व पक्षांना आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायदा आणि सर्व व्यक्तींच्या हक्कांचे व स्वातंत्र्यांचे रक्षण करण्याचे आवाहन करतो. सध्याची अफगाणिस्तानातील परिस्थिती अत्यंत वाईट आहे. या देशातून आम्हाला मानवी हक्कांवरील निर्बंधांच्या धक्कादायक बातम्या ऐकायला मिळत आहेत. मला विशेषत: अफगाणिस्तानातील महिला व मुलींवरील वाढत्या अत्याचाराबद्दलची चिंता वाटते, असेही मत गुटेरेस यांनी सोमवारच्या आपत्कालीन बैठकीत व्यक्त केले.

महिला आणि मुलींच्या सुरक्षेबाबत प्रचंड चिंता

अफगाणिस्तानचे राजदूत आणि संयुक्त राष्ट्रातील स्थायी प्रतिनिधी गुलाम एम इसकझाई म्हणाले की, आज मी अफगाणिस्तानच्या कोट्यवधी लोकांच्या वतीने बोलत आहे. मी लाखो अफगाणी मुली आणि स्त्रियांचा उल्लेख करीत आहे, जे शाळेत जाण्याचे आणि राजकीय, आर्थिक आणि सामाजिक जीवनात भाग घेण्याचे स्वातंत्र्य गमावणार आहेत. तालिबान दोहा आणि इतर आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर दिलेल्या आश्वासनांचे पालन करत नाही. आज अफगाणिस्तानचे लोक प्रचंड दहशतीखाली वावरत आहेत. अफगाणिस्तानमध्ये महिला आणि मुलींना सर्वाधिक भीती वाटते. महिलांना त्यांच्या हक्कांची चिंता आहे. मुलीही असुरक्षित वातावरणात आहेत, असे इसकझाई यांनी स्पष्ट केले.

संयुक्त राष्ट्रातील अमेरिकेच्या राजदूत लिंडा थॉमस-ग्रीनफिल्ड यांनी, जागतिक अन्न कार्यक्रमांतर्गत 500 टनांपेक्षा जास्त मदत सीमेवर अडकली आहे. या मदतीचे तत्काळ वाटप सुरू करावे. आम्ही अफगाणिस्तानच्या शेजारील इतर देशांना अफगाणी लोकांना आश्रय देण्याचे आवाहन करतो, असे मत व्यक्त केले. (Emergency UN Security Council meeting on Afghanistan; Appeal to the international community to show unity)

संबंधित बातम्या

तालिबान्यांच्या मागे दिसणाऱ्या पेंटींगचं मराठ्यांच्या इतिहासाशी थेट कनेक्शन? वाचा सविस्तर

अफगाणिस्तानच्या राष्ट्रपतीनं देश सोडताना काय काय सोबत नेलं? पैसा, गाड्यांबाबत पहिल्यांदाच रिपोर्ट

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.