जगातील सर्वात खतरनाक संस्था, नाव ऐकताच शत्रूंचा होतो थरकाप
जगातील सर्वात खतरनाक गुप्तचर संस्था जर कोणती असेल तर ती मोसाद ही आहे. कारण इस्रायनले आपले सर्व शत्रू या संस्थेच्या माध्यमातूनच संपवले आहे. म्हणून आजही जर मोसादचं नाव घेतलं तरी शत्रूंचा थरकाप उडतो. मोसाद बद्दल जाणून घेऊयात.

इस्रायलने आपला सर्वात मोठा बदला घेतला आहे. इस्रायलने इराणची राजधानी तेहरानमध्ये हमासचे राजकीय प्रमुख इस्माइल हानिया यांची हत्या केलीये. हा एक पूर्ण सुनियोजित हल्ला होता. ज्याची माहिती इराणला देखील पडली नाही. या हल्ल्याची जबाबदारी इस्रायलने घेतली नसली तपी देखील यामागे इस्रायलच असल्याचा दावा इराण करत आहे. इराण आणि हमासने इस्रायलच्या गुप्तचर संस्था मोसादला यासाठी जबाबदार धरले आहे. इस्माईल हनियाचा मृत्यू कसा झाला याबाबतची कोणतीही माहिती अजून समोर आलेली नाही. पण दुसऱ्या देशात जावून दुश्मनांचा खात्मा करण्यात इस्रायल हा देश पुढे आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, वेगवेगळे दावे केले जात आहेत. त्यानुसार इस्माईल हनिया दोन महिन्यांपूर्वी ज्या खोलीत राहत होता तिथे बॉम्ब लपवून ठेवण्यात आला होता. असा दावा केला जात आहे. दुसऱ्या रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की, इस्माईल हनिया झोपेत असताना ड्रोन हल्ल्यातून क्षेपणास्त्र खोलीत डागण्यात आली. पण अधिकृत माहिती कुणीही दिलेली नाही. पण काहीही असलं तरी इस्त्रायलची दहशत यामुळे कायम असल्याचं दिसत आहे. कारण तो शत्रूंना कुठेही असला तरी शोधून काढतो आणि त्याला ठार करतोच. इस्रायलची सर्वात मोठी ताकद आहे ती त्यांची गुप्तचर यंत्रणा मोसाद.
मोसाद आपल्या शत्रूंना ठार करतेच
इस्रायल आपल्या शत्रूंचा नाश करण्यात माहिर आहे. तो यासाठी अनेक घातक शस्त्रे वापरतो. इस्रायल आपल्या शत्रूंना संपवण्यासाठी कार बॉम्ब, रोबोटिक मशीन गन आणि गरज पडली तर विषचा प्रयोग देखील करतो. मोसादने रशियन फायटरला पकडण्यासाठी महिला एजंटचाही वापर केला आहे. मोसाद आपले लक्ष्य साध्य करण्यासाठी जे काही करता येईल ते करतो. यामुळेच इस्रायलने जगातील अनेक देशांमध्ये यशस्वी कारवाया केल्या आहेत.
इस्रायलचे AI च्या मदतीने ऑपरेशन
द सनच्या रिपोर्टनुसार, इस्माईल हनियाचा खात्मा करण्यासाठी इस्रायलने एआयचा वापर केल्याचा दावा देखील केला जात आहे. इस्माईल झोपलेला असताना क्षेपणास्त्र खिडकी तोडून हानियाच्या खोलीत गेली आणि फुटली. इस्रायलने एआयद्वारे हाताळता येणारी मशीन गनही तयार केलीये. त्याचा वापर ही त्याने केलाय. ही बंदूक कोणत्याही व्यक्तीशिवाय चालवता येत होती.
इस्रायलकडे शक्तिशाली क्षेपणास्त्र
शत्रूंचा खात्मा करण्यासाठी इस्रायलने रॉकेट आणि ड्रोनचाही वापर केलाय. यामध्ये जहाजविरोधी आणि आण्विक सक्षम क्षेपणास्त्रांचा देखील समावेश आहे. इस्रायलची गुप्तचर संस्था मोसाद ही 7 हजार कर्मचारी असलेली ही जगातील सर्वात मोठी गुप्तचर संस्था आहे. मोसादने जगभरात असंख्य ऑपरेशन राबवले आहेत. ज्याच्या मदतीने त्यांना शत्रू संपवले आहेत.
