Epstein Files : ‘ट्रम्प कंडोम’मुळे जगात खळबळ, जेफ्री एपस्टीन फाईलमधील हादरवणारा फोटो आला; डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा समोर!

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे काही फोटो सध्या व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये ट्रम्प पाच ते सहा तरुणींसोबत दिसत आहेत. एका फोटोमध्ये ते एका सुंदर तरुणीशी बोलत असल्याचे दिसत आहे.

Epstein Files : ट्रम्प कंडोममुळे जगात खळबळ, जेफ्री एपस्टीन फाईलमधील हादरवणारा फोटो आला; डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा समोर!
donald trump and epstein files
Image Credit source: donald trump and epstein files
| Updated on: Dec 20, 2025 | 3:03 PM

Donald Trump Epstein Files : सध्या जगभरात एपस्टीन फाईल्सची चर्चा आहे. अमेरिकेच्या न्याय विभागाने एपस्टीन फाइल्समधील जवळपास तीन हजार कागदपत्रे सार्वजनिक केले आहेत. विशेष म्हणजे या कागदपत्रांमध्ये काही खळबळजनक फोटो आहेत. सोबतच यात काही व्हिडीओदेखील बाहेर आले आहेत. एपस्टीन हा अमेरिकेतील लैंगिक गुन्हेगार होता. कधीकाळी तो अमेरिकेतील अब्जाधीश होतात. दरम्यान, या एपस्टीन फाईलमधील अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचेदेखील काही फोटो समोर आले आहेत. विशेष म्हणजे यातील काही फोटोंमध्ये डोनाल्ड ट्रम्प अनेक तरुणींसोबत दिसत आहेत. यामध्ये तरुणींचे चेहरे ब्लर करण्यात आले आहेत. पण डोनाल्ड ट्रम्प यांचा चेहरा मात्र स्पष्टपणे दिसतोय. असे असतानाच आता डोनाल्ड ट्रम्प यांचा यांचा फोटो असलेल्या ‘ट्रम्प कंडोम’चा एक हादरवणारा फोटो समोर आला आहे. या फोटोमुळे आता जगभरात खळबळ उडाली आहे.

नेमका कोणता फोटो समार आला?

एपस्टीन फाईल्समधील काही हादरवणारे फोटो सार्वजनिक करण्यात आले आहेत. यात काही फोटो हे अमेरिकेतील प्रसिद्ध डान्सर मायकल जॅक्सन, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन, अब्जाधीश बिल गेट्स यांच्या काही फोटोंचा समावेश आहे. याच फोटोंमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचेही काही फोटो आहेत. यातील एका फोटोत डोनाल्ड ट्रम्प यांच्या आजूबाजूला चार ते पाच तरुणी उभ्या असल्याचे दिसत आहे. दुसऱ्या एका फोटोत ट्रम्प एका सुंदर तरुणीला हसत-हसत बोलताना दिसतायत. तर तिसऱ्या फोटोत ‘ट्रम्प कंडोम’ असे असे नाव असलेले एक पोस्टर दिसत आहे. या पोस्टरच्या समोर कंडोमने भरलेली एक बाऊल दिसतेय. या एका कंडोमची किंमत 4.50 डॉलर्स असल्याचेही दिसत आहे.

दरम्यान, आता याच फोटोंमुळे अमेरिकेत तसेच जगभरात खळबळ उडाली आहे. डोनाल्ड ट्रम्प अडचणीत सापडले आहेत. काही लोक आता डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघडा पडल्याचेही म्हणत आहेत. दरम्यान, आता या एपस्टीन फाईल्सच्या फोटोचे पुढे काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.