AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

यांचं जगच वेगळं… या लोकांना न्यूड राहण्याची वाटत नाही लाज, मिटिंगवेळी अंगावर नसतो एकही कपडा; हा देश 99 टक्के लोकांना…

जगातील सर्वांत आनंदी देशांमध्ये वरच्या स्थानार हा देश आहे. इथे अशा गोष्टी घडतात, ज्या इतर देशांमध्ये कदाचित चुकीच्या समजल्या जातात. पण या देशात सगळं काही करता येतं. कोणता आहे हाँ देश, नाव काय ?

यांचं जगच वेगळं... या लोकांना न्यूड राहण्याची वाटत नाही लाज, मिटिंगवेळी अंगावर नसतो एकही कपडा; हा देश 99 टक्के लोकांना...
FinlandImage Credit source: social media
| Updated on: Oct 20, 2025 | 2:50 PM
Share

जागतिक आनंद अहवालात फिनलंडने सलग आठव्या वर्षी पहिला क्रमांक पटकावला आहे. वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 2025 नुसार, इथल्या नागरिकांचे लाईफ सॅटीस्फॅक्शन स्कोअर 7.741 इतका आहे, जो इतर देशांच्या तुलनेत खूप जास्त आहे. पण इथला आनंद फक्त आकड्याच्या स्वरूपातच नव्हे तर अनोखी संस्कृती आणि लाईफस्टाईलमध्येही लपला आहे.

या देशात न्यूडिटी अर्थात न्यूज राहणं हे बेशरमपणा मानलं जात नाही तर ते विश्वासाचं प्रतीक मानलं जातं. सौना सेशन्समध्ये विना कपड्यांच्याही मीटिंग्स असतात, तिथे मोठमोठ्या डील फायनल होतात. शाळांमध्ये होमवर्क हाँ नगण्य असतो. संध्याकाळी 4 वाजता ऑफीस बंद होतं. एवढंच नव्हे तर वर्षभरात 5 आठवडे भरपगारी सुट्टी मिळते आणि असं म्हणतात की हे सांताक्लॉजचं खरं घर आहे. हेच आहे फिनलँडच्या लोकांच्या आनंदाचं रहस्य.

न्यूडिटी चुकीची नाही

फिनलँडमधील सौना संस्कृती ही संपूर्ण जगाल आश्चर्यचकित करते. प्रत्येक व्यक्तीमागे इथं 3 सौना आहेत आणि सौना ही केवळ आंघोळीची ठिकाणं नव्हे तर सोशल बाँडिंगचही सेंटर आहे. न्यूडिटी इथे सामान्य आहे – मग ते कुटुंबीय असोत किंवा बिझनेस पार्टनर्स. वॉशिंग्टनमधील फिनिश एम्बसीमध्ये डिप्लोमॅटिक क बैठका सौनामध्ये आयोजित केल्या जातात, जिथे लोक बिना कपडे असतात. एका अहवालानुसार, “सौनामध्ये जे घडते ते सौनामध्येच राहते” असं म्हटलं जातं.  ही विश्वास निर्माण करण्याची एक पद्धत आहे. बिझनेस फिनलंडच्या मते, वाटाघाटींनंतर, लॉयली (सौना हीट) साठीचे प्रोटोकॉल खुले आहेत. मात्र येथे येणाऱ्या, पर्यटकांसाठी फक्त स्विमसूटचे स्वतंत्र सौना आहेत. पर्यावरण मंत्री सारा यांच्या म्हणण्यानुसार, ‘सौना आपल्याला नकारात्मक उर्जेपासून मुक्त करते, जी आनंदाचा आधार आहे.’ ही संस्कृती पुरुष-महिला मिक्स्ड सौनाला देखील प्रोत्साहन देते, पण ते रूढीवादी समाजातील लोकांना धक्कादायक वाटू शकते.

प्रत्येक नियम वेगळा

शिक्षण व्यवस्था ही फिनलँडची ताकद आहे. तिथे मुलांचे वर्ग कमी वेळ असतात. त्यांना होमवर्कही खूप कमी असतो. प्राथमिक शाळेत आठवड्यातून 2-3 तास ​​बाहेर शिक्षण( Outside Learning) घेतात. बीबीसीच्या एका अहवालात म्हटले आहे की, “फिनिश विद्यार्थी खेळावर आधारित शिक्षणात चांगले प्रदर्शन करतात.” इथे 93 टक्के मुले हायस्कूलमधून पदवीधर होतात तर अमेरिकेत हेच प्रमाण 76 टक्के आहे. इथे शिक्षकांकडे मास्टर्स डिग्री असणे आवश्यक आहे आणि वर्गांचे आकार लहान आहेत. 2025 च्या अहवालात फिनलंडच्या तरुण पिढीचा आनंदाचा स्कोअर सर्वाधिक आहे. स्टँडर्ड वर्किंग अवर्स हे 8 ते 4 आहेत. दर महिन्याला 2.5 पगारी रजा मिळते, वर्षभरात मोजायचे झाले तर ते 30 दिवस ( सुमारे 5 आठवडे) होतात. त्यामुळे आनंद हाँ पैशांमुळे नव्हे तर सोप्या चॉईसेसमुळे मिळतो, हे या देशात नक्कीच स्पष्ट होतं.

मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.