मोठी बातमी! ट्रम्प यांच्या नव्या निर्णयानं जग हादरलं, आता हा देशच घेणार ताब्यात, अमेरिकेच्या न्यूक्लियर कमांड विमानांचं उड्डाण
डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या निर्णयामुळे जगाची चिंता वाढली असून, आणखी एक भीषण युद्ध होण्याचे संकेत मिळत आहेत. अमेरिकेच्या न्यूक्लिअर विमानांनी उड्डाण केलं आहे.

काही दिवसांपू्र्वी इराक आणि इस्रायलमध्ये भीषण युद्ध झालं, या युद्धामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी घडून आणली आणि दोन्ही देशांनी युद्धविरामाची घोषणा केली. दरम्यान त्यानंतर आता रशिया आणि युक्रेनयुद्धामध्ये देखील मध्यस्थी करण्याचा ट्रम्प यांचा प्रयत्न सुरू आहे. त्यातच त्यांनी भारत रशियाकडून तेल खरेदी करतो म्हणून भारतावर 50 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भारत आणि अमिरेकेच्या संबंधांमध्ये देखील मोठा तणाव निर्माण झाला आहे, हे सर्व सुरू असतानाच आता डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा जगाचं टेन्शन वाढवलं आहे.
कारण ट्रम्प हे आता युद्धाची नवी आघाडी उभारत असल्याची माहिती समोर येत आहे. ग्रीनलँडजवळ अमेरिकन सैन्याच्या हालचाली वाढल्याची माहिती समोर येत आहे.एका रिपोर्टनुसार अमेरिकेनं ग्रीनलँडजवळ न्यूक्लियर कमांड विमानं तैनात केले आहेत. अटलांटिकमध्ये अमेरिकेनं न्यूक्लियर कमांड विमानं तैनात केल्यामुळे जगभरात चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.
ट्रम्प यांची सुरुवातीपासूनच ग्रीनलँड आपल्या ताब्यात घेण्याची इच्छा आहे, त्यांनी त्याबाबत अनेकदा वक्तव्य देखील केलं आहे, आपल्या मनातील इच्छा देखील त्यांनी बोलून दाखवली आहे. आता ट्रम्प यांनी आपला ग्रीनलँन्ड प्लॅन अॅक्टिव्ह केल्याची माहिती समोर येत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार प्रशांत आणि अटलांटिक महासागरात E-6B मर्करी विमानानं उड्डाणं केलं आहे. हे अमेरिकेचं एक बलाढ्य न्यूक्लियर कमांड विमान आहे. त्यामुळे आता आणखी एका मोठ्या युद्धाचे संकेत मिळत आहेत. दरम्यान अमेरिकेनं फक्त त्यांना भीती दाखवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे की, खरंच युद्ध होऊ शकतं याबाबत अजून माहिती समोर आलेली नाहीये. दरम्यान यापूर्वी अमेरिकेकडून इराण-इस्रायल युद्ध सुरू असताना इराणवर देखील हल्ला करण्यात आला होता. त्यामुळे आता जगाची चिंता वाढली आहे.
दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वी देखील ग्रीनलँड ताब्यात घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे, आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये ग्रीनलँड आमच्या ताब्यात घेऊ, आम्हाला आमच्या सुरक्षेसाठी ग्रीनलँडची गरज आहे, आतंरराष्ट्रीय सुरक्षेसाठी आम्हाला ग्रीनलँड महत्त्वाचं आहे.ग्रीनलँडला आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये ताब्यात घेऊ असं ट्रम्प यांनी म्हटलं होतं.
