फक्त ‘या’ कारणामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी लावला भारतावर टॅरिफ, रशिया नव्हे तर पाकिस्तानच….
अमेरिकेने भारतावर टॅरिफ लावल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. आता अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारतावरील टॅरिफ धोरणावर जोरदार टीका केली आहे. अनेकजण अमेरिकेवर टीका करताना दिसत आहेत.

टॅरिफच्या मुद्दावरून भारत आणि अमेरिकेमधील संबंध ताणले गेले आहेत. अमेरिकेकडून भारतावर तब्बल 50 टक्के टॅरिफ लावण्यात आला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या या भूमिकेमुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला. भारताकडून देखील डोनाल्ड ट्रम्प यांनी लावलेल्या टॅरिफला विरोध केला जातोय. यामुळे अनेक वर्षांपासून चांगले संबंध बिघण्याची दाट शक्यता आहे. भारत देखील अमेरिकेला थेट उत्तर देण्याच्या तयारी आहेत. जर भारताने अमेरिकेला सडेतोड उत्तर दिले तर त्याचा थेट परिणाम अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो.
आता अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारतावरील टॅरिफ धोरणावर जोरदार टीका केली आहे. भारतावर लादलेले टॅरिफ ही द्विपक्षीय संबंधांमधील एक मोठी चूक असल्याचे त्यांनी थेट म्हटले. मुळात म्हणजे टॅरिफविरोधात अमेरिकन लोकांमध्येही संतापाचे वातावरण बघायला मिळतंय. ब्राझील आणि भारतावर 50 टक्के टॅरिफ लावण्यात आला आहे.
अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी म्हटले की, टॅरिफ शुल्कामुळे दोन्ही देशांमधील विश्वास डळमळीत झाला आहे. हेच नाही तर त्यांनी विनोदाने म्हटले की, पंतप्रधान मोदी ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कारासाठी दोनदा नामांकित करण्याची ऑफर देऊ शकतात. जूनमध्ये, पाकिस्तान सरकारने 2026 च्या नोबेल शांतता पुरस्कारासाठी ट्रम्प यांच्या नावाची शिफारस केली. भारत-पाकिस्तान संघर्षात डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णायक राजनैतिक हस्तक्षेपाने महत्त्वाची भूमिका बजावली असा दावा पाकिस्तानने केला.
त्यानंतर त्यांना थेट नोबेल शांतता पुरस्कार द्यावी, अशी मागणी पाकिस्तानकडून करण्यात आली. अमेरिकेचा पाकिस्तानच्या बाजूने मोठा झुकाव दिसत आहे. भारताच्या शेजारी देश चीन, बांगलादेश आणि पाकिस्तानचला अत्यंत कमी टॅरिफ अमेरिकेकडून लावण्यात आलंय. रशियाकडून भारत कच्चे तेल घेत असल्याचे अमेरिकेकडून सांगण्यात आलंय. भारतावर टॅरिफ लावल्यानंतर पुतिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन केला होता. दोघांमध्ये बराचवेळ चर्चा देखील झाली होती. भारत टॅरिफच्या मुद्दावमध्ये काय मार्ग काढतो, याकडे सर्वांच्या नजरा आहेत.
