डोनाल्ड ट्रम्पला घरचा आहेर, ही मोठी कंपनी टॅरिफ विरोधात मैदानात, पडद्यामागील घडामोडींना वेग
डोनाल्ड ट्रम्प यांचा टॅरिफचा निर्णय कोणालाच आवडला नसल्याचे बघायला मिळतंय. टॅरिफचा झटक फक्त भारतालाच नाही तर अमेरिकेतील कंपन्यांना आणि ग्राहकांना बसताना दिसतोय. ट्रम्प यांचा हा निर्णय कोणाच्याच पचनी पडताना दिसत नाहीये.

भारत आणि अमेरिकेचे संबंध टॅरिफमुळे ताणले गेले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर मोठा टॅरिफ कर लादलाय. हेच नाही तर जोपर्यंत टॅरिफवर निर्णय होत नाही तोपर्यंत व्यापार चर्चा देखील बंद असणार असल्याचे त्यांनी सांगितले. अमेरिकेने टॅरिफ आकारल्याने भारताची चिंता वाढलीये. कारण याचा थेट परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो. आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफच्या निर्णयावर अमेरिकेतूनही प्रश्नचिन्ह उपस्थित केली जात आहेत. अमेरिकेचे माजी उपराष्ट्रपती माइक पेन्स काही प्रश्न उपस्थित करत, अमेरिकेतील परिस्थितीच थेट सांगून टाकलीये.
माइक पेन्स यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणावर प्रश्न उपस्थित करत थेट सोशल मीडियावर पोस्ट शेअर केलीये. आमच्या कंपन्या आणि ग्राहकांना देखील टॅरिफची किंमत मोजावी लागत असल्याचे त्यांनी म्हटले. त्यांनी एक लेख शेअर केलाय. ज्यामध्ये फोर्डला तीन महिन्यांत $800 दशलक्ष टॅरिफ भरावी लागले आहे, जो आकडा अत्यंत मोठा आहे, त्यामधील जास्ती गाड्या या अमेरिकेत तयार झाल्या आहेत.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या शेवटच्या कार्यकाळात माइक पेन्स हे उपराष्ट्रपती होते आणि त्यांनी एकप्रकारे डोनाल्ड ट्रम्प यांना थेट आहेरच दिलाय. एका वृत्तानुसार, फोर्डच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सांगितले की, कंपनी व्हाईट हाऊसच्या संपर्कात आहे आणि ट्रम्प प्रशासनाशी टॅरिफ कमी करण्याबाबत चर्चा करत आहे. कारण टॅरिफचा परिणाम थेट त्यांच्यावर झालाय. फोर्ड कंपनीही अमेरिकेतील सर्वाधिक वाहने बनवणारी कंपनी आहे.
गेल्या वर्षी कंपनीने 1.8 दशलक्ष कार त्यांनी बनवल्या. फोर्ड कंपनीचे अमेरिकेत तब्बल 57,000 कर्मचारी आहेत. ट्रम्पच्या टॅरिफच्या निर्णयाचा फोर्डला मोठा फटका बसत आहे. कंपनीने 2025 च्या दुसऱ्या तिमाहीत टॅरिफशी संबंधित खर्चासाठी ८०० दशलक्ष डॉलर्स भरल्याची घोषणा केली आहे, जी रक्कम खूपच मोठी आहे. कंपनीचे स्पष्ट म्हणणे आहे की, या टॅरिफमुळे वार्षिक नफा सुमारे $3 अब्जने कमी होईल. ज्याचा मोठा फटका हा त्यांना थेट बसू शकतो. फक्त फोर्डच नाही तर अमेरिकेतील अनेक कंपन्यांची स्थिती तशीच आहे.
