बांगलादेशात हिंसा परवण्यासाठी या देशातून झाली फंडिंग, धक्कादायक खुलासा
बांगलादेश हिंसाचार सुरुच आहे. शेख हसीना यांची सत्ता उलथून टाकण्यात विरोधकांना यश आले आहे. बांग्लादेश सध्या लष्कराच्या नियंत्रणात आहे. पण हे आंदोलन इतकं हिंसक कसं झालं. यामागे कोणत्या संघटनेचा हात होता आणि या संघटनेला कोणी फंडिंग केलं याबाबत मोठा खुलासा झाला आहे.
बांगलादेशमध्ये हिंसक आंदोलनानंतर शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आणि देश ही सोडला. देश सोडल्यानंतर त्यांनी सध्या भारताकडे आश्रय घेतला आहे. शेख हसीना यांच्यावर ही परिस्थिती का आली समजून घेऊयात. बांगलादेशमधील ही परिस्थिती अचानक बदलली नाही. यामागे दोन देशांनी फंडिंग केल्याचं समोर येत आहे. यामागे पाकिस्तानची एजन्सी आयएसआय आणि चीनचा हात असल्याचे गुप्तचर यंत्रणांचे मत आहे. जमात-ए-इस्लामी संघटनेची विद्यार्थी शाखा असलेल्या इस्लामिक स्टुडंट कॅम्प (ICS) ने बांगलादेशात आंदोलन पेटवलं. त्यायासाठी या विद्यार्थी संघटनेला चीन आणि पाकिस्तानातून फंडिंग झाल्याचं समोर येत आहे.
भारतविरोधी संघटना
जमात-ए-इस्लामी ही संघटना भारतविरोधी देखील आहे. भारताविरोधात कट रचण्यात ही संघटना पुढे आहे. याच संघटनेच्या विद्यार्थी संघटनेने हे आंदोलन हिंसक बनवले. इस्लामिक स्टुडंट कॅम्पने हसीनाच्या जागी पाकिस्तान आणि चीन समर्थक सरकार आणण्याचे काम केले आहे. इस्लामिक स्टुडंट कॅम्प आधीच याबाबत कट रचला होता. देशभरात हिंसाचार भडकवणे हा त्याचा उद्देश होता. असं गुप्तचर यंत्रणांनी म्हटले आहे.
हसीना सरकारला अस्थिर करण्यासाठी जमात-ए-इस्लामीला मोठ्या प्रमाणात पैसे देण्यात आल्याचे एका अधिकाऱ्याने म्हटले आहे. पाकिस्तानमध्ये कार्यरत असलेल्या चिनी संस्थांकडून हा निधी पुरवण्यात आला. शेख हसीना यांचे भारतासोबत चांगले संबंध आहेत. चीनला भारतापासून इतर आशिया खंडातील देश दूर करायचे आहेत. त्यामुळे चीनचा हा प्रयत्न आहे. शेख हसीना या पाचव्यांदा निवडून आल्या होत्या. पण तरी देखील त्यांना सत्ता सोडावी लागलीये.
इस्लामिक स्टुडंट कॅम्प भारतीय सीमा भागात प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. भारतविरोधी कारवायांमध्ये ही संघटना सक्रिय आहे. भारतीय गुप्तचर संस्थांने देखील यावर लक्ष ठेवले होते. इस्लामिक स्टुडंट्स ऑर्गनायझेशनही आयएसआय समर्थित हरकत-उल-जिहाद-अल-इस्लामी या संघटनेसोबत काम करत आहे. ही संघटना बांगलादेशात काम करत असली तरी ती पाकिस्तानातून चालते.
पाकिस्तान आणि चीनकडून मदत
बांगलादेशात तालिबान शैलीचे सरकार आणणे हे इस्लामिक स्टुडंट कॅम्पचे उद्दिष्ट असल्याचे गुप्तचर संस्थांनी म्हटले आहे. यासाठी पाकिस्तानाची एजन्सी आयएसआयचाही त्यांना पाठिंबा मिळत आहे. एका गुप्तचर अधिकाऱ्याने सांगितले की, भारत आणि बांगलादेशमधील संबंध दृढ झाल्यामुळे पाकिस्तान आणि चीनला अडचणींचा सामना करावा लागत होता.