AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नेपाळच नव्हे तर या देशातही सोशल मीडियावर बंदी, एका देशात तर पोस्ट केल्याने मृत्यू दंडाची शिक्षा झाली

नेपाळमध्ये सोशल मीडियावर वरील सरकारच्या बंदीने तरुणांनी जाळपोळ सुरु केल्याने तणाव आहे. जगात नेपाळ एकटाच नाही तर अनेक देश आहेत जेथे सोशल साईटवर बंदी आहे.

नेपाळच नव्हे तर या देशातही सोशल मीडियावर बंदी, एका देशात तर पोस्ट केल्याने मृत्यू दंडाची शिक्षा झाली
social media banned
| Updated on: Sep 08, 2025 | 9:38 PM
Share

पाळ सरकारने ४ सप्टेंबर २०२५ रोजी एक मोठा निर्णय घेत सोशल साईटवर बंदी लादल्याने तेथील युवकांनी रस्त्यावर उतरुन जाळपोळ सुरु केली आहे. नेपाळ सरकारने फेसबुक, इंस्टाग्राम, व्हाट्सएप, यूट्यूब आणि एक्ससहीत २६ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर प्रतिबंध लावल्याने नेपाळमधील तरुणांना आगडोंब सुरु केला आहे. काठमांडूत हजारो जनरेशन जेट (Gen Z) चे तरुण रस्त्यांवर उतरले आणि संसदेपर्यंत पोहचले. यात १६ तरुणांचा मृत्यू झाला आहे. नेपाळ सरकारने कर्फ्यू लावला असून भारत आणि नेपाळ सीमेवर संशस्र सीमा दलाने टेहळणी सुरु केली आहे. चला तर आणखी कोणत्या देशात सोशल मीडियावर बंदी आहे. एका देशात तर सोशल मीडियाप्रकरणात मृत्यूची शिक्षा आहे. चला त्या देशांची माहिती घेऊयात…

कुठे-कुठे सोशल मीडियावर बंदी ?

सोशल मीडियावर बंदी लादणारा नेपाळ हा काही पहिला देश नाही. अनेक देशात देखील यासंदर्भात कठोर नियम आहेत. यात पहिले नाव चीनचे येते.

चीन

चीनमध्ये सोशल मीडियावर सक्त निर्बंध आहेत. येथे फेसबुक, इंस्टाग्राम, युट्युब आणि एक्स सारखे प्लॅटफॉर्म पूर्णपणे बॅन आहेत. त्यामुळे चीनच्या अंतर्गत भानगडी जगासमोर येत नाहीत. चीनने स्वदेशी प्लॅटफॉर्म्स उदा. व्ही चॅट, आणि डॉयीनला प्रोत्साहन दिले आहे. जर कोणी बंदीचे उल्लंघन केले तर मोठा दंड आणि तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे.

उत्तर कोरिया

किम जॉन्ग उन यांच्या उत्तर कोरियात साशल मीडिया आणि इंटरनेटपर्यंत सर्वसामान्यांना बंदी आहे. केवळ सरकारी कर्मचाऱ्यांना मर्यादित प्रमाणात इंटरनेटचा वापर करता येतो. येथे सोशल मीडियावर काहीही पोस्ट करणे अशक्य आहे आणि बेकायदेशीर कृतीमुळे मृत्युदंड देखील दिला जाऊ शकतो.

इराण

इराणमध्ये देखील राष्ट्रीय सुरक्षेच्या नावाखाली फेसबुक आणि एक्स तसेट युट्युब सारख्या प्लॅटफॉर्म्सना बंदी आहे. सरकार कठोर सेन्सॉरशिप लागू करते आणि सोशल मीडियावर सरकारच्या विरोधात पोस्ट केल्यानंतर कठोर शिक्षा दिली जाते. यात तुरुंगवास किंवा मृत्यदंडाच्या शिक्षेचा समावेश आहे.

अफगाणिस्तान

अफगाणिस्तान देखील सोशल मीडियावर बंदी आहे. येथे कोणत्याही सजिव वस्तूचा फोटो काढणे आणि त्यास शेअर करणे यावर तालिबानी शिक्षा मिळू शकते.

सौदी अरब

सौदी अरबमध्ये सोशल मीडियावर सरकारची करडी नजर असते. येथे सरकार विरोधी आणि धार्मिक भावनांना ठेच पोहचवणाऱ्या पोस्टसाठी तुरुंगवास किंवा दंड वा मृत्यूची शिक्षा मिळू शकते. २०२२ मध्ये एका व्यक्तीने ट्वीटरवर सरकार विरोधात पोस्ट केली तर त्याला मृत्यूची शिक्षा देण्यात आली होती.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.