Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोदींनी मन की बातमध्ये उल्लेख केला अन् जर्मन गायिका रातोरात बनली स्टार; कोण आहे गायिका?

जर्मन गायिका कॅसेंड्रा माई स्पिस्टमॅनची "मन की बात" कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेली प्रशंसा तिच्यासाठी वरदान ठरली. भारतीय भक्तीगीतांच्या गायनाने तिने भारतात प्रचंड लोकप्रियता मिळवली. तिच्या "वराह रूपं" या गाण्याने तिची ओळख निर्माण झाली आणि तिने हिंदुत्व स्वीकारल्याची बातमीही समोर आली आहे.

मोदींनी मन की बातमध्ये उल्लेख केला अन् जर्मन गायिका रातोरात बनली स्टार; कोण आहे गायिका?
PM Narendra modi Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 18, 2025 | 6:52 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमात प्रसिद्ध जर्मन गायिका कॅसेंड्रा माई स्पिस्टमॅनचा उल्लेख केला होता. त्यानंतर रातोरात कॅसेंड्रा हिचं आयुष्य बदललं आहे. एवढंच नव्हे तर भारतात तिची प्रचंड लोकप्रियता वाढली आहे. एक स्टार म्हणून तिच्याकडे पाहिले जात आहे. कॅसेंड्राने आईसह पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. कॅसेंड्रा भारतीय भाषांमध्ये, विशेषत: भक्तिगीतं गात असतात. पंतप्रधान मोदींच्या समोर ती “अच्युतं केशवं रामनारायणं” हे गाणं गात होती. तिचं गाणं ऐकल्यानंतर पंतप्रधान मोदींनी तिच्या कामाचं प्रचंड कौतुक केलं.

कॅसेंड्रा माई स्पिस्टमॅनने आता एक मोठा निर्णय घेतला आहे. तिने सनातन धर्म आणि हिंदुत्वाकडे आकर्षित होऊन पूर्णपणे हिंदू होण्याचा निर्णय घेतला आहे. याबद्दल पंतप्रधान मोदींच्या “मन की बात” सोशल मीडिया टीमने एक्स (पूर्वी ट्विटर) वर एक ट्विट शेअर केलं आहे. “जर्मनीतील प्रसिद्ध गायिका कॅसेंड्रा हिंदुत्वाकडे कशी आकर्षित झाली ते पहा” असं ट्विट करण्यात आलं आहे.

प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व

कॅसेंड्रा या जर्मनीच्या अत्यंत प्रतिभावान गायिकेने भारतीय गाणी, विशेषत: ‘कीर्तना’मुळे भारतात मोठ्या प्रमाणावर लोकप्रियता मिळवली आहे. “मन की बात” च्या 105 व्या भागात पंतप्रधान मोदींनी एक 21 वर्षांची दृष्टिहीन कलाकारीला भारताच्या प्रेक्षकांसमोर सादर केले. पंतप्रधान मोदींनी कॅसेंड्राबद्दल अभिमान व्यक्त केला आणि सांगितले की, जर्मनीतील कॅसेंड्राने कधीही भारताला भेट दिली नाही. तरीही तिच्या भारतीय संगीतावर असलेल्या गाढ प्रेमामुळे ती भारतीय गाणी गात असते, आणि यामुळे ती आनंदी असते. पंतप्रधान मोदींनी तिला “प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व” म्हणून प्रशंसा केली.

स्वप्नांना पूर्ण केलं

जर्मनीतील कॅसेंड्रा भारतीय संगीतावर असलेले प्रेम दाखवताना आणि त्या संगीतावर आधारित गाणी गात असताना, एक विशेष ओळख निर्माण करत आहे. पंतप्रधान मोदींनी ह्याचं कौतुक करत म्हटलं की, कॅसेंड्राच्या दृढ इच्छाशक्तीने ती अकल्पनीय यश प्राप्त करत आहे. तिच्या संगीत प्रेमामुळे तिने सगळ्या अडचणींना पार करत, आपल्या स्वप्नांना पूर्ण केलं आहे.

गाणं हिट झालं आणि…

कॅसेंड्राचे खरे नाव कॅसेंड्रा माई स्पिस्टमॅन आहे. भारतीय गाणी गात असताना ती सोशल मीडियावर लोकप्रिय झाली. कॅसेंड्राला विशेषतः दक्षिण भारतीय गाणी गाण्याची आवड आहे. “वराह रूपं” हे गाणं हिट झाल्यानंतर कॅसेंड्राला भारतात मोठं यश प्राप्त झालं. त्यानंतर, अभिनेता ऋषभ शेट्टीने कॅसेंड्राच्या कामाची प्रशंसा केली आणि तिला प्रोत्साहन दिलं.

राज ठाकरेंच्या 'हिंदी' विरोधानंतर शेलार आक्रमक; म्हणाले, अभ्यासपूर्ण..
राज ठाकरेंच्या 'हिंदी' विरोधानंतर शेलार आक्रमक; म्हणाले, अभ्यासपूर्ण...
रोहित पवारांकडून दादांचं जंगी स्वागत, जामखेडच्या 'त्या' बॅनरची चर्चा
रोहित पवारांकडून दादांचं जंगी स्वागत, जामखेडच्या 'त्या' बॅनरची चर्चा.
'तुम्हाला चड्ड्याही नव्हत्या तेव्हापासून मी...', पडळकरांचा रोख कोणावर?
'तुम्हाला चड्ड्याही नव्हत्या तेव्हापासून मी...', पडळकरांचा रोख कोणावर?.
काँग्रेसला पुण्यात झटका? संग्राम थोपटे भाजपात? रविवारी देणार राजीनामा?
काँग्रेसला पुण्यात झटका? संग्राम थोपटे भाजपात? रविवारी देणार राजीनामा?.
'मुंडेंची चांगली वाणी बंद पडलीय अन्...', नामदेव शास्त्री काय म्हणाले?
'मुंडेंची चांगली वाणी बंद पडलीय अन्...', नामदेव शास्त्री काय म्हणाले?.
हिंदी ही संपर्कसूत्राची भाषा आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
हिंदी ही संपर्कसूत्राची भाषा आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
मुंडेंसाठी सगळ्यांनी प्रार्थना करा, नामदेव शास्त्रींनी केलं आवाहन
मुंडेंसाठी सगळ्यांनी प्रार्थना करा, नामदेव शास्त्रींनी केलं आवाहन.
..म्हणून अट्टाहास, हिंदीची सक्ती महाराष्ट्रातच का? राज ठाकरेंचा इशारा
..म्हणून अट्टाहास, हिंदीची सक्ती महाराष्ट्रातच का? राज ठाकरेंचा इशारा.
भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचा पुण्याच्या मशिदीतला व्हिडीओ व्हायरल
भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचा पुण्याच्या मशिदीतला व्हिडीओ व्हायरल.
नव्या वक्फ कायद्याला तूर्त स्थगिती, कोर्टाच्या निर्णयावर ओवैसी म्हणाले
नव्या वक्फ कायद्याला तूर्त स्थगिती, कोर्टाच्या निर्णयावर ओवैसी म्हणाले.