नशीब फळफळलं, नोकरीला लाथ, 81 कोटींचा मालक आता काय शोधतोय?

पुढे काय नियोजन आहे, हे सांगताना कुर्सेट म्हणाला, मला आफ्रिकेला जायचंय. विहिरी खोदणाऱ्यांना तसेच तेथील मुलांना गिफ्ट द्यायचेत.

नशीब फळफळलं, नोकरीला लाथ, 81 कोटींचा मालक आता काय शोधतोय?
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Nov 10, 2022 | 11:37 AM

Factory worker won Rs 81 crore Lottery: 81 कोटी रुपये जिंकणाऱ्या एका माणसाची सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चा आहे. लॉटरीत या माणसाचं नशीब फळफळलं अन् त्यानंतर त्यानं पटापट निर्णय घेतले. सर्वात आधी तर दररोज ज्या ठिकाणी डोकं लावावं लागतं, शारीरीक मेहनत असते, तिथल्या नोकरीला लाथ मारली. रिलॅक्स झाला आणि आता शोधतोय एक बायको…

काळी असो की गोरी, त्याला याची पर्वा नाही. फक्त तिला फिरण्याची प्रचंड आवड असावी, अशी त्याची अट आहे. या तरुण ४१ वर्षांचा आहे.

तर ही बातमी आहे जर्मनीची. २४ सप्टेंबरला जर्मनीतल्या डॉर्टमुंड येथील रहिवासी कुर्सेट यिल्दिरिम याने मोठी लॉटरी जिंकली. भारतीय चलनानुसार त्याला ८१ कोटी रुपये मिळाले.

एका स्टील कंपनीत काम करणाऱ्या या तरुणाला प्रचंड आनंद झाला. लॉटरी लागल्यावर आता एवढ्या पैशांचं काय करायचं, याचा विचार केला.

सर्वात आधी नोकरी सोडली. एक फेरारी ४४८ पिस्टा घेतली. ३.६ कोटी रुपयांत. त्यानंतर एक पोर्श टर्बो एस कॅब्रियोलेट घेतली २ कोटी रुपयांची. त्यानंतर आवडती ड्रिंक आणि महागडं घड्याळ खरेदी केलं.

आता ४१ वर्षांचा हा तरूण जोडीदाराच्या शोधात आहे. जेणेकरून पुढचं आयुष्य तो एकदम आलिशान पद्धतीने जगेल. बिल्ड या जर्मन वृत्तपत्राला त्याने मुलाखत दिलीय.

त्यात तो म्हणालाय, ‘ मी अजून लग्न केलेलं नाही. मला बायको हवी आहे. ती गोरी किंवा काळी कशीही चालेल. मला पर्वा नाही. मला प्रेमात पडायचंय…

तिला फिरण्याची प्रचंड आवड असावी. माझ्यासोबत एक नवीन प्रवास आणि संसार सुरू करण्यासाठी तिची तयारी असावी. कोणत्याही स्थितीत मी तिच्यावर विश्वास ठेवू शकेल, अशी ती असावी.

या तरुणाने लॉटरी जिंकल्यानंतरचा अनुभव शेअर केला. तो म्हणाला, मी माझी स्वतःची खूप काळजी घेऊ शकतो. मी सावध आहे. माझा पैसा सुरक्षित हातात आहे. अचानक कुणी मित्र बनतो. ज्यांना अनेक वर्षांपासून बोललो नाही, ते अचानक पैसे मागत आहेत. ९० टक्के लोक ईर्ष्या करतात. मी या लायकीचा नाही, असं त्यांना वाटतं..

पण मी कुठून आलोय.. एका मजूर कुटुंबाचा मुलगा आहे. मी कधीही पैशांचा गर्व करणार नाही. माझा द्वेष करणाऱ्यांसाठी मी या महागड्या कार खरेदी केल्या आहेत. माझी ईर्ष्या करणाऱ्यांसाठी हे सर्व आहे.

पुढे काय नियोजन आहे, हे सांगताना कुर्सेट म्हणाला, मला आफ्रिकेला जायचंय. विहिरी खोदणाऱ्यांना तसेच तेथील मुलांना गिफ्ट द्यायचेत. माझ्या हातून काही चांगली कामं होती, अशी देवाकडे प्रार्थना करतोय. आई-वडील, भावांनाही पैसा पाठवल्याचं त्याने सांगितलंय.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.