या देशात सापडल्या आत्तापर्यंतच्या सर्वात मोठ्या सोन्याच्या खाणी, किती सोनं सापडले पाहा ?
आपला मित्र असलेल्या आणि युद्धामुळे निर्बधांचा सामना करावा लागणाऱ्या देशात सोन्याच्या मोठ्या खाणी सापडल्या आहेत. या खाणीत प्रचंड सोने निघण्याचा अंदाज आहे. या सोन्याचा साठा साल 2030 पर्यंत सर्वोच्च पातळीवर पोहचेल असे म्हटले जात आहे.

मॉस्को | 15 जानेवारी 2024 : युक्रेन युद्धामुळे आर्थिक निर्बंध झेलत असलेल्या रशियासाठी दिलासा देणारी बातमी आली आहे. रशियामध्ये पूर्व दिशेला सगळ्यात मोठ्या सोन्याचा खाणींचा खजाना सापडला आहे. या खाणी रशियाच्या पूर्व दिशेला असलेल्या चुकोटका येथे सापडल्या आहेत. या खाणीमध्ये 100 टन सोने असू शकते असे रशियाने म्हटले आहे. साल 1991 मध्ये रशियाचे झालेल्या विघटनानंतर रशियात प्रथमच एवढा मोठा सोन्याचा साठा सापडण्याची ही पहिलीच घटना आहे. युक्रेन युद्धामुळे आर्थिक निर्बंधांचा सामना करणाऱ्या रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांच्यासाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे.
रशियाची सरकारी कंपनी रोसाटॉमच्या खनन मायनिंग डीव्हीजनने सोन्याच्या खाणी सापडल्याची घोषणा केली आहे. सोविनोय खाणीत ड्रिलिंगचे काम वर्षभर सुरु होते. गेल्या काही वर्षांत 32 किमीहून अधिक लांबीचे 123 खाणी खोदण्यात आल्या आहेत. यासाठी सर्वप्रकारच्या भुगर्भीय चाचण्या, भुवैज्ञानिक आणि भुरासायनिक आणि भूभौतिकीय कार्य पूर्ण झाले आहे. कंपनीने म्हटले आहे की सोविनोय खाणींचे वार्षिक उत्पादन 2029 पासून तीन टन सोन्यापासून सुरु होणार आहे.
2030 मध्ये सोन्याचं खोदकाम सर्वोच्च असेल
सोविनायची खाण चकची सागर जवळ स्थित आहे. जिची स्थापना 1970 च्या दशकात झाली होती. 1980 च्या दशकात या क्षेत्रात उच्च दर्जाच्या सोन्याचा शोध घेण्यासाठी व्यापक भुवैज्ञानिक चाचण्या करण्यात आल्या आहेत. याच वेळी येथे सोन्याचा मोठा साठा असल्याची माहीती उघड झाली होती. याआधी रशियाच्या मिडीयाने मॉस्को स्थित सेंट्रल रिसर्च एक्सप्लोरेशन इन्स्टीट्यूट ऑफ नॉन-फेरस एंड प्रेशियस मेटल्सच्या एका रिपोर्टच्या हवाल्याने रशियात साल 2030 मध्ये सोन्याचे उत्पादन सर्वोच्च पातळीवर पोहचलेले असेल असे म्हटले होते.
