AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Donald Trump : इराणमुळे युद्धाचा मोठा भडका, डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडाली, अमेरिकन सैन्य थेट…

सध्या अमेरिका आणि इराण यांच्यात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. अमेरिकेने आपल्या युद्धनौका इराणच्या दिशेने पाठवल्या आहेत. तर दुसरीकडे आता इराणनेही मोठी भूमिका घेतली आहे.

Donald Trump : इराणमुळे युद्धाचा मोठा भडका, डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडाली, अमेरिकन सैन्य थेट...
donald trump ali khameneiImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jan 24, 2026 | 5:09 PM
Share

America And Iran Clash : सध्या अमेरिका आणि इराण यांच्यात चांगलाच तणाव निर्माण झालेला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला थेट धमकीच दिली आहे.त्यामुळे आता या दोन्ही देशांत भविष्यात मोठं युद्ध भडकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ट्रम्प यांनी नुकतेच आमच्या युद्धनौका आणि सैनिक इराणच्या दिशेने निघाले आहेत, असे थेट सांगून जगात खळबळ उडवून दिली आहे. विशेष म्हणजे ट्रम्प यांनी दिलेल्या धमकीनंतर आता इराणनेही जशास तसे उत्तर देण्याची तयारी केली आहे. असे असतानाच इराणच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगता दिलेल्या माहितीमुळे संपूर्ण जगाची चिंता वाढण्याची शक्यता आहे. कारण आता ट्रम्प यांना प्रत्युत्तर देण्यासाठी इराणदेखील मोठी तयारी करत असल्याचे समोर आले आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी नेमकी काय धमकी दिलेली आहे?

सध्या इराणमध्ये तेथील सत्ताधाऱ्यांविरोधात जोरदार आंदोलन चालू आहे. या आंदोलनात आतापर्यंत शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे. या आंदोलनाला डोनाल्ड ट्रम्प यांचा पाठिंबा आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला खुली धमकी दिली आहे. आमच्या युद्धनौका इराणच्या दिशेने निघाल्या आहेत. सोबतच बरेच नौसैनिकही आहेत, असे थेट सांगून टाकले आहे. हे सांगताना त्यांनी आम्ही पाठवलेल्या युद्धनौकांचा उपयोग करण्याची गरज भासू नये, अशी अपेक्षा आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे. इराणमध्ये सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी झालेल्या आंदोलकांची हत्या करू नका, अन्यथा तुम्हाला गंभीर परिणाम भोगावे लाग शकतात, असेही अमेरिकेने इराणला सांगितले आहे.

आता इराणची भूमिका काय?

अमेरिकेच्या या धमकीनंतर आता इराण देशाने बचावासाठी आतापासूनच खबरदारीची पावलं उचलायला सुरुवात केली आहे. याबाबत इराणच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सविस्तर माहिती दिली आहे. अमेरिकेकडून झालेला कोणताही हल्ला हा थेट युद्ध म्हणूनच गृहीत धरला जाईल, असे इराणने आता ठरवले आहे. रॉयटर्स या आंतरराष्ट्रीय माध्यमाने तसे वृत्त दिले आहे. अमेरिकेचे जे सैन्य आमच्याकडे येत आहे, ते हल्ल्यासाठी नसेल, अशी आम्ही अपेक्षा करतो. परंतु आम्ही कोणत्याही संकटाला तोंड द्यायला सक्षम आहोत.कोणतेही संकट परतवून लावण्यासाठी आम्ही कठोरातील कठोर भूमिका घेऊन, अशी इराणची भूमिका आहे. त्यामुळे आता भविष्यात काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले...
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा.....
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे.