AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Donald Trump : ‘मी मध्ये पडलो नसतो, तर पाक पंतप्रधान मेले असते’ भारत-पाकिस्तान युद्धावर ट्रम्प यांचा धक्कादायक दावा

Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा दावा केला आहे. 'मी पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ यांचा जीव वाचवला' असा नवीन दावा ट्रम्प यांनी केला आहे.

Donald Trump : 'मी मध्ये पडलो नसतो, तर पाक पंतप्रधान मेले असते' भारत-पाकिस्तान युद्धावर ट्रम्प यांचा धक्कादायक दावा
Donald Trump
| Updated on: Feb 25, 2026 | 9:52 AM
Share

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा दावा केला आहे. ‘मी पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ यांचा जीव वाचवला’ असा नवीन दावा ट्रम्प यांनी केला आहे. ‘मी हस्तक्षेप केला नसता, तर पाकिस्तानी पंतप्रधान मेले असते’ असं ट्रम्प म्हणाले. ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारत-पाकिस्तानमध्ये झालेल्या युद्धावरुन ट्रम्प यांनी हा दावा केल्याचं म्हटलं जातय. वर्ष 2025 मध्ये भारत-पाकिस्तान सैन्य तणावादरम्यान आपल्या कूटनितीक हस्तक्षेपाने पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ यांचा जीव वाचला असा दावा अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. ‘मी हस्तक्षेप केला नसता, तर परिस्थिती गंभीर बनली असती’ असं ट्रम्प म्हणाले. “त्यावेळी अणवस्त्र संघर्षाच्या दिशेने परिस्थिती चाललेली. त्यांच्या मध्यस्थीमुळे 35 मिलियन लोकांचे प्राण वाचले” असा दावा ट्रम्प यांनी केला.

मागच्यावर्षी एप्रिल महिन्यात पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी पहलगाम येथे दहशतवादी हल्ला केला होता. त्यांनी तिथे फिरायला आलेल्या हिंदू पर्यटकांची पत्नी आणि मुलांसमोर गोळ्या मारुन हत्या केली होती. भारताने ऑपरेशन सिंदूर लॉन्च करुन या दहशतवादी कृत्याचा बदला घेतला. त्यानंतर 7 ते 10 मे दरम्यान दोन्ही देशांमध्ये चार दिवस सैन्य संघर्ष झाला. भारताने पाकिस्तानला चांगलचं धुतलं.

ट्रम्प यांचा दावा काय?

“मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानी पीएम शहबाज शरीफ यांच्याशी फोनवरुन संवाद साधून दोन्ही देशांमध्ये तणाव कमी केला” असा डोनाल्ड ट्रम्प यांनी मे 2025 पासून अनेकदा दावा केला आहे. ते भारत-पाकिस्तान सीजफायरच श्रेय घेण्याचा प्रयत्न करतात. पाकिस्तान त्यांना ते श्रेय देतो. पण भारताने कधीही ट्रम्प यांचा दावा मान्य केलेला नाही. आम्ही ट्रम्प यांच्यामुळे सीजफायरचा निर्णय घेतला नाही, हे भारताने आतापर्यंत अनेकदा ठणकावून सांगितलं आहे.

उलट पाकिस्ताननेच घातलेलं लोटांगण

ऑपरेशन सिंदूरच्यावेळी उलट पाकिस्ताननेच अमेरिकेसमोर लोटांगण घातलं होतं. पहिल्यांदा अमेरिकेने हे मान्य केलय की, भारताच्या कारवाईला घाबरुन पाकिस्तानने अमेरिकेकडे मदत मागितली होती. भारताने ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानच्या अनेक सैन्य तळांना लक्ष्य केलं होतं.

Follow Us
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ