Imran Khan: पाकिस्तानात इमरान खानांची नारेबाजी आली अंगलट; तुरुंगात जाणार? धार्मिक भावना दुखवल्याचा ठपका..

पाकिस्तानचे गृहमंत्री राणा सनाउल्लाह यांच्या मंत्रालयातर्फे सांगण्यात आले आहे की, माजी पंतप्रधान इमरान खान यांना मशीदीमध्ये केलेल्या नारेबाजी प्रकरणी त्यांना अटक होऊ शकते. तर असंही सांगण्यात येत आहे की, सौदीमधील एका मशिदीमध्ये पंतप्रधान शहबाज शरिफ आणि त्यांचे प्रतिनिधी मंडळाविरोधात चोर चोर अशी नारेबाजी करण्यात आली होती.

Imran Khan: पाकिस्तानात इमरान खानांची नारेबाजी आली अंगलट; तुरुंगात जाणार? धार्मिक भावना दुखवल्याचा ठपका..
इमरान खान समर्थकांनी केलेली नारेबाजी खान यांना भोवणारImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 02, 2022 | 8:39 PM

नवी दिल्लीः पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान (Former Prime Minister Imran Khan) यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढतानाच दिसून येत आहेत. सध्या काही त्यांच्याबाबतीत काही बातम्या येत आहेत की, आता इमरान खान यांना कधीही अटक (Arrest) होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान शहबाज शरिफ (Prime Minister Shahbaz Sharif) यांच्या विरोधात नारेबाजी केल्याप्रकरणी इमरान खान यांच्या सोबतच आणखी 150 जणांनी अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पाकिस्तानातील सत्ताधारी पीएमएल-एन या पक्षाच्या समर्थकांचे म्हणणे आहे की, मशीदीमध्ये जे काही झाले आहे ते सगळं इमरान खान यांच्या सांगण्यावरुन सगळं झाले आहे.

नारेबाजी भोवणार…

पाकिस्तानचे गृहमंत्री राणा सनाउल्लाह यांच्या मंत्रालयातर्फे सांगण्यात आले आहे की, माजी पंतप्रधान इमरान खान यांना मशीदीमध्ये केलेल्या नारेबाजी प्रकरणी त्यांना अटक होऊ शकते. तर असंही सांगण्यात येत आहे की, सौदीमधील एका मशिदीमध्ये पंतप्रधान शहबाज शरिफ आणि त्यांचे प्रतिनिधी मंडळाविरोधात चोर चोर अशी नारेबाजी करण्यात आली होती. त्यामुळे ज्यांनी ज्यांनी नारेबाज केली आहे, त्यांनी इमरान खान यांच्या इशाऱ्यानुसार नारेबाजी केली असल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे.

फैसलाबादमध्ये गुन्हा दाखल

इमरान खान यांच्या समर्थकांनी जी नारेबाजी केली होती, त्याप्रकरणी शनिवारी फैसलाबादमध्ये गुन्हा दाखल केला गेला आहे. तहरीक-ए-इंसाफचे अध्यक्ष आणि माजी पंतप्रधान इमरान खान, त्यांच्या मंत्री मंडळातील फवाद चौधरी आणि माजी पंतप्रधान शाहबाज गुल यांचे सल्लागार शेख रशीद, नॅशनल असेंब्लीचे माजी डेप्युटी स्पीकर कासिम सुरी, लंडनमधील इम्रान खान यांचे जवळचे सहकारी अनिल मुसरत आणि साहिबजादा जहांगीर यांच्यासह 150 जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

मशीदीमध्ये गुंडागर्दी

फैसलाबादमध्ये राहणारे नईम भट्टी यांनी सांगितले की, मशीदीमध्ये नारे लावल्यामुळे ज्या मशीदीला पैगंबराची मशीदी समजली जाते, त्याला या नारेबाजीमुळे अपवित्र करण्यात आली आहे. मशीदीमध्ये गुंडागर्दी आणि मुसलामानांच्या भावाना भडकावण्याचाही प्रयत्न केला गेला आहे. माजी पंतप्रधान इमरान खान यांनी आणि त्यांच्या समर्थकांनी येथील मुस्लिमांच्या भावना भडकावल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यामुळे धार्मिक भावना दुखावल्याचे सांगत दीडशे जणांवर कारवाई केली गेली आहे.

मी स्वतःला दूर ठेवले

याविषयी माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी एका मुलाखतीत सांगितले की, पंतप्रधान शरीफ यांच्या विरोधात घोषणा देणाऱ्या लोकांपासून स्वतःला मी दूर ठेवले आहे. तसेच एवढ्या पवित्र स्थानी मी नारेबाजी करण्यास का सांगेन खरं तर ही कल्पनाही मी करु शकत नाही असंही त्यांनी सांगितले.

Non Stop LIVE Update
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....