AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Viने ‘अमर्यादित कॉल आणि इंटरनेट’ सह पाच नवीन ‘रिचार्ज प्लॅन’ केले लाँच; ज्याची सुरुवातीची किंमत आहे फक्त 29 रूपये !

VI प्रीपेड रिचार्ज: Airtel आणि Jio शी स्पर्धा करण्यासाठी, Vi ने 5 नवीन प्लॅन लॉंच केले आहेत, ज्याची किंमत 29 रुपये आहे. जरी तुम्ही इंटरनेट कमी वापरत असाल तरीही यापैकी कोणतीही योजना तुमच्यासाठी चांगली असू शकते. जाणून घ्या काय आहेत, खास ऑफर.

Viने ‘अमर्यादित कॉल आणि इंटरनेट’ सह पाच नवीन ‘रिचार्ज प्लॅन’ केले लाँच; ज्याची सुरुवातीची किंमत आहे फक्त 29 रूपये !
Vi रिचार्जImage Credit source: TV9
| Updated on: May 02, 2022 | 8:31 PM
Share

मुंबई : एअरटेल आणि रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी व्होडाफोन आयडियाने आता 5 नवीन आणि स्वस्त प्लॅन लॉंच (5 New and cheaper plans launched) केले आहेत. यामध्ये 3 प्लॅन 100 रुपयांपेक्षा कमी आहेत, तर 2 प्लॅन 100 रुपयांपेक्षा जास्त आहेत. जर तुम्ही स्वस्त प्लॅन्सच्या शोधात असाल तर या प्लॅनमध्ये तुमच्यासाठी काही खास सुविधा (Some special features) असू शकते. तुम्ही इंटरनेटचा कमी वापर करत असलात तरी यापैकी एक योजना तुमच्यासाठी चांगली असू शकते. Vodafone Idea च्या नवीन रिचार्ज प्लॅनमध्ये तीन वेगवेगळ्या योजना आहेत, जे सर्वांसाठी उपलब्ध झाले आहेत. या प्लॅनच्या किंमती 98 रुपये, 195 रुपये आणि 319 रुपये आहेत. हे तिन्ही प्रीपेड रिचार्ज प्लॅन (Prepaid recharge plan) आहेत. Vi रिचार्ज प्लॅन 2022 अंतर्गत, यूजर्सना अनलिमिटेड कॉलिंग, इंटरनेट आणि एसएमएस इत्यादी सुविधा मिळणार आहेत.

सर्वात स्वस्त प्लॅन

सर्वप्रथम, सर्वात स्वस्त प्लॅनबद्दल बोलूया, तो आहे 29 रुपयांचा. ही एक अॅडऑन योजना आहे. यामध्ये यूजर्सना 2 दिवसांसाठी 2 GB डेटा दिला जात आहे. हा एक डेटा पॅक आहे, ज्यामुळे तुम्हाला या प्लॅनसह इतर कोणताही लाभ मिळणार नाही. कारण या प्लॅनमध्ये कॉलिंग, एसएमएस किंवा इतर कोणताही फायदा दिला जात नाही.

Vi चा 39 रुपयांचा प्लॅन

हा देखील डेटा व्हाउचर प्लॅन आहे. म्हणजे यामध्ये यूजर्सना फक्त इंटरनेट मिळेल. ही योजना सर्वप्रथम गुजरातमध्ये सुरू करण्यात आली आहे. यामध्ये ३ जीबी डेटा देण्यात आला आहे. त्याची वैधता 7 दिवस आहे.

Vi 98 चा रिचार्ज प्लॅन

98 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये 200 MAB डेटा, अमर्यादित कॉल आणि 15 दिवसांची वैधता मिळेल. तथापि, या पॅकमध्ये एसएमएसचा समावेश नाही. डेटा संपल्यानंतर, प्रति एमबी 50 पैसे खर्च करावे लागतील.

Vi Recharge Plan: Rs 195

प्रीपेड प्लॅन Vodafone Idea त्याच्या 195 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये अमर्यादित मोफत व्हॉईस कॉल ऑफर करते. या प्लॅनमध्ये जीबी हायस्पीड डेटा आणि 300 मोफत एसएमएस देखील मिळतील, या पॅकची वैधता 31 दिवसांपर्यंत आहे. यामध्ये मोफत व्ही मूव्ही आणि टीव्ही सबस्क्रिप्शन सेवा उपलब्ध आहे. इंटरनेट डेटा संपल्यानंतर एका एमबीवर 50 पैसे आकारले जातील.

Vi Recharge Plan: Rs 319 चा रिचार्ज प्लॅन

Vodafone Idea च्या Rs 319 च्या प्लॅन मध्ये यूजर्सला अमर्यादित व्हॉईस कॉल्स मिळतील. यामध्ये युजर्संना दररोज 2 GB इंटरनेट डेटा मिळेल तसेच 100 SMS, Binge All Night, Weekend Data Rollover ची सुविधा देखील मिळेल. याशिवाय कंपनीने या प्लॅनमध्ये Binge All Night, Data Rollover आणि Data Delights समाविष्ट केले आहे.

मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.