Gulf Nation : आखातामध्ये जवळच्या मित्रानेच अमेरिकेला दिला दगा, एक मोठा मुस्लिम देश गद्दारीच्या वाटेवर
अरब क्षेत्रातील ही मोठी घडामोड आहे. 2020 मध्ये त्या देशाने अब्राहम करारावर स्वाक्षरी केली. त्यासाठी त्यांना अमेरिकेची F-35 फायटर जेट्स मिळणार होती. पण बायडेन प्रशासनाने चीनसोबत वाढत्या संबंधांमुळे ही डील रोखली.

तेल संपन्न आखाती देशांमध्ये अमेरिकेचा शब्द अंतिम मानला जातो. आखाती देशांसोबत अमेरिकेचे अनेक वर्षांपासूनचे मैत्री संबंध आहेत. आखातामध्ये अमेरिकेच वर्चस्व आहे. अमेरिकेच्या शब्दापुढे हे देश जात नाहीत. हे मुस्लिम देश सुरक्षा आणि अन्य गरजांसाठी मोठ्या प्रमाणात अमेरिकेवर अवलंबून आहेत. पण आखातामधला एक मोठा मुस्लिम देश अमेरिकेच्या विरोधात जात असल्याचं समोर आलं आहे. संयुक्त अबर अमिरातीच्या एका महत्वाच्या सैन्य तळावर चिनी सैन्याची उपस्थिती आहे. दोन माजी सिनिअर अधिकाऱ्यांनी हा खुलासा केलाय. अबू धाबीच्या जायेद मिलिट्री सिटीमध्ये PLA चे सैनिक तैनात होते. अमेरिकन सैनिकांना बेसच्या एका भागावर जाण्यापासून रोखण्यात आलं, त्यावेळी UAE मध्ये चिनी सैनिक असल्याची माहिती 2020 च्या आसपास समोर आली.
या घटनेनंतर अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांनी त्या जागेवरील घडामोडींची माहिती जमवण्यास सुरुवात केली. विश्लेषणानंतर तिथे चिनी सैनिक असल्याचं स्पष्ट झालं. अमेरिकन सैनिक आणि त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवणं हा PLA सैनिकांचा तिथे उपस्थित असण्यामागचा उद्देश असू शकतो. UAE चा अल धाफरा एअर बेस अमेरिकेच्या 380 व्या एअर एक्सपेडिशनरी फोर्सचं मुख्य ऑपरेटिंग सेंटर आहे. अबू धाबीपासून हे बेस फक्त 20 मैल दूर आहे.
अमेरिकेच्या दबावानंतर निर्णय रद्द
चीन अबू धाबीजवळ एका सिक्रेट मिलिट्री पोर्ट बनवतोय याचा 2021 साली वॉल स्ट्रीट जर्नलच्या रिपोर्टमधून खुलासा झालेला. अमेरिकेच्या दबावानंतर UAE ने चीनला परवानगी नाकारली. पण गोपनीय कागदपत्रांवरुन तिथे पुन्हा एक वर्षाने कन्स्ट्रक्शन सुरु झाल्याचं समजलं. 2024 साली चीन-संयुक्त अबर अमिरातीने चीनच्या शिनजियांग क्षेत्रात जॉइंट एअरफोर्स ड्रील केली. त्यावरुन दोन्ही देशांचे सैन्य संबंध घट्ट होत असल्याचं स्पष्ट होतं. या रिपोर्टवर UAE आणि चिनी दूतावासाने कुठलीही टिप्पणी केली नाही.
अमेरिकेसाठी UAE इतका महत्वाचा देश का?
UAE ने अमेरिकेच्या रणनितीमध्ये नेहमी महत्वाची भूमिका बजावली आहे. अमेरिकेने UAE च्या रेड सी बेसचा वापर करुन सोमालियाच्या ISIS वर हल्ला केला होता. दुसऱ्याबाजूला UAE आज इस्रायलचा विश्वासू मित्र बनला आहे. अमेरिकन अधिकाऱ्यांनुसार UAE आता असे निर्णय घेतोय जे अमेरिकेच्या क्षेत्रीय रणनितीसाठी आव्हानात्मक ठरु शकतात. चीन सोबत गुप्त सैन्य करार, टेक्नोलॉजी सहकार्य हे मिडिल ईस्टमध्ये UAE एक नवीन आणि मोठी जियोपॉलिटिकल स्क्रिप्ट लिहित असल्याचा हा इशारा आहे. हे अमेरिकेच्या हिताविरोधात आहे.
