भारत-चीन सीमेवर मोठ्या हालचाली, दोन्ही देशात वाढले टेन्शन, 11 लाख कोटीचा व्यापार येणार संकटात ?

चीनने यंदा आपल्या संरक्षण बजेटमध्ये वाढ केली आहे. चीन त्यांच्या संरक्षण बजेटमध्ये 7 टक्क्यांहून अधिक वाढ केली आहे. चीनचे संरक्षण बजट 232 अब्ज डॉलर म्हणजे 19 लाख कोटीचे झाले आहे. तर भारताचे संरक्षण बजेट 6.21 लाख कोटीचे झाले आहे. म्हणजे भारतापेक्षा चीनचा खर्च तीन पट जादा आहे. त्यामुळे भारताने एलएसी वरील बंदोबस्तात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

भारत-चीन सीमेवर मोठ्या हालचाली, दोन्ही देशात वाढले टेन्शन, 11 लाख कोटीचा व्यापार येणार संकटात ?
india and china disputeImage Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Mar 08, 2024 | 7:35 PM

मुंबई | 8 मार्च 2024 : भारत आणि चीन या देशांच्या सीमांवर मोठ्या घडामोडी सुरु झाल्या आहेत. भारताच्या एलएसी म्हणजे लाईन ऑफ एक्च्युअल कंट्रोलवर भारताने पुन्हा आपल्या सैन्याची संख्या वाढविण्यास सुरुवात केली आहे. भारता आपल्या चीनकडील सीमेवर एलएसीवर दहा हजार अतिरिक्त सैनिकांची गस्त वाढविणार आहे. सीमेवर आधीपासूनचे नऊ हजाराहून अधिक सैनिक तैनात आहेत. त्यामुळे भारत चीन सीमेवर वरील भारताच्या सैनिकांची संख्या 20 हजार इतकी होणार आहे. त्यामुळे दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे.

साल 2020 पासून भारत आणि चीन या दोन देशांतील सीमा वाद उफाळुन वर आला आहे. सप्टेंबर 2020 मध्ये गलवान व्हॅलीत दोन्ही देशांच्या सैन्यात चकमक झाली होती. त्यानंतर भारतात चीन विरोधात जनमानस संतापले होते. भारत सरकारने चीन वरुन आयात होणाऱ्या अनेक वस्तूंवर बंदी लादत बहिष्काराचे कॅंपेन सुरु झाले होते. चीनच्या मोबाईल एपवर देखील बंदी घालण्यात आली. आता भारत आपल्याला चीनकडून आयात होणाऱ्या वस्तूंना भारतातच तयार करण्याचे प्रयत्न करीत अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न करीत आहे. यासाठी सरकारने अनेक सेक्टर्स पीएलआय स्कीम देखील लॉंच केल्या आहेत. तरीही दोन्ही देशात साल 2023 मध्ये 11 लाख कोटी रुपयांहून अधिकचा व्यवसाय झाला आहे. आता भारत आणि चीनमधील वाढत्या संघर्षाचा या व्यापाऱ्यावर काय परिणाम होतोय याकडे लक्ष लागले आहे.

जेव्हा चीनी मालावर बहिष्कार

गलवान खोऱ्यात दोन्ही देशात साल 2020 मध्ये संघर्ष झाला होता. त्यानंतर भारताने चीन वस्तूंवर बहिष्कार टाकण्यास सुरुवात केली. दिवाळी आणि होळी सारख्या सणात चीनी सामानावर बहिष्कार टाकण्याच्या आवाहनानंतर अनेक कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्यावर्षीच्या दिवाळीच्या सणात देशात निर्मित वस्तू खरेदी करण्याचे आवाहन देशबांधवांना केले होते. त्यामुळे चीनी दिवे, दीपमाला यांची खरेदी घटली होती.आणि मेक इन इंडीया प्रोडक्टसना प्रोत्साहन मिळाले.

गेल्या तीन वर्षापासून चीन आणि भारतात तणाव आहे, त्यानंतरही दोन्ही देशांच्या व्यापारात कोणतीही घट झालेली नाही. साल 2023 मध्ये दोन्ही देशात 136 अब्ज म्हणजे 11 लाख कोटी रुपयांचा व्यापार झाला होता. आजही भारत चीनकडून कित्येक महत्वाच्या वस्तू आयात करतो. भारत चीनकडून आजही इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, कार आणि मोटरसायकलचे पार्ट्स, कंप्यूटरचे पार्ट्स, कूलिंग सिस्टम, कार बॅटरी, मेमरी कार्ड्स, मोडम, राऊटर्स सारख्या अनेक वस्तूची आयात करतो. भारताचा चीन सोबतचा ट्रेड डेफिसिट 100 अब्ज डॉलरचा आहे. साल 2023 मध्ये भारताची चीनी वस्तू आयातीत 7 टक्क्यांहून अधिक वाढ झाली होती.

संकटाची नांदी

भारताचा चीन सोबतचा व्यवसाय खूप मोठा आहे. या कारण भारताला अनेक वस्तू चीनकडूनच आयात कराव्या लागत आहेत. सध्या दोन्ही देशातील वाढत्या तणावाचा या व्यापारावर मोठा परिमाण होणार आहे. भारताच्या मॅन्युफॅक्चरिंग युनिटला या वस्तूंची गरज आहे. अशात एलएसीवरील वाढता तणाव आणि चीनकडून सीमेवर सुरु असलेली रस्त्यांची बांधणी आदी घटनेने हा व्यापार संकटात सापडू शकतो.

Non Stop LIVE Update
आणि नरेंद्र मोदी मंचावर येऊन रडतात, प्रियंका गांधी यांचा हल्लाबोल
आणि नरेंद्र मोदी मंचावर येऊन रडतात, प्रियंका गांधी यांचा हल्लाबोल.
अजित दादांवरच्या 'त्या' आरोपांवर देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण
अजित दादांवरच्या 'त्या' आरोपांवर देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण.
कौल कुणाला? दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला, बीड-शिरूर कोण राखणार?
कौल कुणाला? दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला, बीड-शिरूर कोण राखणार?.
पवारांच्या वक्तव्यावर शशी थरूर म्हणाले,तर रेड कार्पेट टाकून स्वागत करू
पवारांच्या वक्तव्यावर शशी थरूर म्हणाले,तर रेड कार्पेट टाकून स्वागत करू.
मोदींच्या गुलामांच्या फौजेत आणखी एक भर, राज ठाकरेंवर कुणाचा निशाणा?
मोदींच्या गुलामांच्या फौजेत आणखी एक भर, राज ठाकरेंवर कुणाचा निशाणा?.
'राज ठाकरे बाळासाहेबांचे प्रतिरूप, त्यांना धनुष्यबाणाच्या मंचावर....'
'राज ठाकरे बाळासाहेबांचे प्रतिरूप, त्यांना धनुष्यबाणाच्या मंचावर....'.
फडणवीस राजकारणातलं कच्चं मडकं, ठाकरे गटातील बड्या नेत्याचा घणाघात
फडणवीस राजकारणातलं कच्चं मडकं, ठाकरे गटातील बड्या नेत्याचा घणाघात.
पवारांनी माझा राजीनामा मागितला...खडसे भाजपात येण्यापूर्वी काय म्हणाले?
पवारांनी माझा राजीनामा मागितला...खडसे भाजपात येण्यापूर्वी काय म्हणाले?.
ठाकरेंना 1999 पासूनच मुख्यमंत्रिपदाची स्वप्न, पण...फडणवीसांचा हल्लाबोल
ठाकरेंना 1999 पासूनच मुख्यमंत्रिपदाची स्वप्न, पण...फडणवीसांचा हल्लाबोल.
११ महिन्यांच्या चिमुकल्यासह महिला कर्मचारी निवडणुकीच्या ड्युटीवर
११ महिन्यांच्या चिमुकल्यासह महिला कर्मचारी निवडणुकीच्या ड्युटीवर.