India-Taliban Relation : अफगाणिस्तानातील तालिबान राजवटीला भारताने मान्यता का द्यावी? त्याचे 5 फायदे काय?
India-Taliban Relation : अफगाणिस्तानातील तालिबान राजवटीवरुन जगात वेगवेगळे मतप्रवाह आहेत. काहींच्या मते तालिबानशी जास्त संबंध ठेऊ नयेत कारण त्यांची मूळ विचारधारा दहशतवादाची आहे. दुसरीकडे तालिबानशी संबंध ठेवताना आपला फायदा बघावा असा एक मतप्रवाह आहे. त्यामुळे अफगाणिस्तानातील तालिबान राजवटीला भारताने मान्यता का द्यावी? त्याचे 5 फायदे काय? समजून घ्या.

सध्या अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्ताकी भारत दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दौऱ्याची भरपूर चर्चा होत आहे. काही मुद्यांवरुन अमीर खान मुत्ताकी यांच्या भारत दौऱ्यात वाद सुद्धा झाले. उदहारणार्थ त्यांच्या पत्रकार परिषदेला महिला पत्रकारांना प्रवेश नाकारणं. यातून तालिबानी विचारधारा दिसून आली. तालिबानच्या विचारधारेत महिलांना कुठेही स्थान नाही. चूल-मूल एवढीच त्यांची स्त्रियांबद्दलची विचारधारा आहे. या कृतीमुळे अमीर खान मुत्ताकी यांच्यावर भरपूर टीका झाली. तालिबानशी आपण का संबंध ठेवावेत? त्याचा फायदा काय? तालिबान ही मूळची दहशतवादी विचारांची संघटना आहे, असे अनेक वेगवेगळे मतप्रवाह आहेत. आंतरराष्ट्रीय राजकारणात प्रत्येक देश आपल्या हिताचा आधी विचार करतो. नैतिकता-अनैतिकता हा चष्मा बाजूला ठेवण्यातच फायदा असतो. अफगाणिस्तानातील तालिबान राजवटीबाबत भारत सरकारचा सुद्धा असाच दृष्टीकोन आहे. ...
