अरबी समुद्रात हालचाली वाढल्या, भारत-पाकिस्तानचा मोठा निर्णय, काहीतरी भयंकर घडतंय?
भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी झाल्याची घोषणा करण्यात आली होती. दरम्यान, दोन्ही देशांतील हे युद्ध सध्या थांबवलेले असले तरी भारताने मात्र ऑपरेशन सिंदूर रद्द केलेले नाही. सध्या ही मोहीम फक्त स्थगित करण्यात आलेली आहे. दरम्यान, एकीकडे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव कायम असताना अरबी सागरात मोठ्या हालचाली वाढल्या आहेत.

India Vs Pakistan : नुकत्या झालेल्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धाची संपूर्ण जगाने धसकी घेतली होती. पहलगामवरील हल्ल्यानंतर भारातने पाकिस्तानातील दहशतवादी तळांना उद्ध्वस्त केलं होतं. त्यानंतर पाकिस्ताननेही प्रत्युत्तरादाखल भारतावर जोरदार हल्ले केले होते. दोन्ही देशांतील युद्दसदृश स्थिती लक्षात घेता अमेरिकेने भारत आणि पाकिस्तान यांच्यात मध्यस्थी केली होती. त्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी झाल्याची घोषणा करण्यात आली होती. दरम्यान, दोन्ही देशांतील हे युद्ध सध्या थांबवलेले असले तरी भारताने मात्र ऑपरेशन सिंदूर रद्द केलेले नाही. सध्या ही मोहीम फक्त स्थगित करण्यात आलेली आहे. दरम्यान, एकीकडे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव कायम असताना अरबी सागरात मोठ्या हालचाली वाढल्या आहेत. भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश एकाच वेळी युद्धाभ्यास करत आहेत.
सागरात नेमकं काय घडतंय?
भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी प्रदीर्घ असा समुद्रकिनारा लाभलेला आहे. त्यामुळे आपल्यावर समुद्रातूनही हल्ला होऊ शकतो, याची दोन्ही देशांना कल्पना आहे. भारताने तर पाकिस्तानला रोखण्यासाठी अरबी समुद्रावर नजर ठेवण्यासाठी नौसेनेला मोठं बळ पुरवलेलं आहे. असं असतानाच आता पाकिस्तान आणि भारत या दोन्ही देशांनी फायरिंग ड्रिलची तयारी केली आहे. त्यामुळेच आता समुद्रातील हलाचाली वाढल्या असल्याचे बोलले जात आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी नेव्हिगेशन एरिया वॉर्निंग जारी केलेली आहे. त्यामुळे या दोन्ही देशांकडून स्वतंत्रपणए फायरिंग ड्रिल केली जाणार आहे. त्यामुळे आता भविष्यात नेमके काय होणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
पाकिस्तानने नेमका काय इशारा दिला?
पाकिस्तानच्या NAVAREA वॉर्निंगनुसार येत्या 11 ऑगस्ट रोजी सकाळी 4 ते 12 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 4 वाजेपर्यंत मरीन ट्रॅफिकला युद्धाभ्यास क्षेत्रापासून दूर राहण्याचा इशारा दिला आहे. पाकिस्तानतर्फे एक तर भारताकडून अशा 3 NAVAREA वॉर्निंग देण्यात आल्या आहेत.
भारत फायरिंग ड्रिल नेमका कधी करणार?
भारताने दिलेल्या वॉर्निंगमध्ये ओखा, पोरबंदर, मोरमुगाओ या भागातील मरीन ट्रॅफिकला खबरदारीचा इशारा देण्यात आला आहे. ओखा किनाऱ्यासाठी जारी करण्यात आलेल्या इशाऱ्यानुसार भारताचे नौदल 11 ऑस्ट रोजी 11:30 ते 1:30 वाजेपर्यंत, पोरबंदर समुद्र किनाऱ्यावर जारी करण्यात आलेल्या इशाऱ्यानुसार 12 ऑगस्ट रोजी रात्री 12:30 वाजेपासून ते संध्याकाळी 6:30 वाजेपर्यंत तसेच मोरमुगाओ किनाऱ्यावर जारी करण्यात आलेल्या इशाऱ्यानुसार 13 ऑगस्ट रोजी 1:30 वाजेपासून ते संध्याकाळच्या 6 वाजेपर्यंत फायरिंग ड्रिल केली जाईल. त्यामुळे या काळात सर्वच मरीन ट्रॅफिकला या भागापासून दू राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
NAVAREA वॉर्निंग म्हणजे नेमकं काय?
NAVAREA वॉर्निंग ही संबंधित भागातून जाणारे व्यापारी जहाज, प्रवासी जहाज यांच्यासाठी देण्यात येते. समोर धोका आहे, असा त्याचा अर्थ होता. NAVAREA वॉर्निंग दिल्यानंतर कोणत्याही जहाजाने किंवा आकाशातून विमानानेही फायरिंग ड्रिलच्या संबंधित भागातून जाऊ नये, असे सूचित केले जाते. पहलगामवर हल्ला झाल्यानंतर पाकिस्तानने गडबडीत अशाच प्रकारची वॉर्निंग जारी केली होती. भारत समुद्रमार्गे आपल्यावर हल्ला करू शकतो, या भीतीपोटी ही वॉर्निंग जारी करण्यात आली होती.
दरम्यान, आता भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश एकमेकांच्या सागरी हद्दीत फायरिंग ड्रिल करत आहेत. त्यामुळे याचा नेमका अर्थ काय? असे विचारले जात आहे.
