अत्यंत मोठी बातमी! अमेरिकेची नव्हे, आता भारताची दादागिरी, टॅरिफ वॉर ठरला फुसका बार; भारताच्या जीडीपीची गगन भरारी
India GDP : 2025-26 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत (एप्रिल ते जून) जीडीपी वाढीचा दर 7.8 टक्के होता. गेल्या वर्षी याच तिमाहीत जीडीपी वाढीचा दर 6.5 टक्के होता. अमेरिकेच्या टॅरिफनंतरही भारताचा जीडीपी गगणात असल्याचे बघायला मिळत आहे.

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्थेने धमाकेदार कामगिरी केली आहे. 2025-26 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत (एप्रिल ते जून) जीडीपी वाढीचा दर 7.8 टक्के होता. गेल्या वर्षी याच तिमाहीत जीडीपी वाढीचा दर 6.5 टक्के होता. तर तिमाही दर आधारावर अर्थव्यवस्थेने तेजी नोंदवली आहे. ही बाब भारतीयांसाठी अत्यंत आनंदाची म्हणावी लागेल. कारण नुकताच अमेरिकेने भारतावर तब्बल 50 टक्के टॅरिफ लावलाय. अमेरिकेत होणारी जवळपास 70 टक्के निर्यात कमी झालीये. हेच नाही तर टॅरिफचा थेट परिणाम हा अर्थव्यवस्थेवर होणार असेही सांगितले जात होते. मात्र, आता ही अत्यंत दिलासादायक अशी बातमी पुढे आली आहे.
14 अर्थतज्ज्ञांच्या ईटी पोलनुसार, पहिल्या तिमाहीत जीडीपी वाढ 6.3 टक्के ते 7% दरम्यान अंदाजित करण्यात आली होती, ज्याचा सरासरी अंदाज 6.7 टक्के होता. रिझर्व्ह बँकेच्या 6.5 टक्क्याच्या अंदाजाशी सुसंगत होता. गेल्या वर्षी याच तिमाहीत जीडीपी 15 महिन्यांच्या नीचांकी 6.7 टक्क्यांवर घसरला होता. आर्थिक वर्ष 2025-26 च्या पहिल्या तिमाहीत स्थिर किमतींवर वास्तविक जीडीपी 47.89 लाख कोटी रुपये असण्याचा अंदाज आहे, जो आर्थिक वर्ष 2024-25 च्या पहिल्या तिमाहीत 44.42 लाख कोटी रुपये होता, जो 7.8 टक्के वाढीचा दर नोंदवतो.
आर्थिक वर्ष 2025-26 च्या पहिल्या तिमाहीत चालू किमतींवर नाममात्र जीडीपी 86.05 लाख कोटी रुपये असण्याचा अंदाज आहे, जो आर्थिक वर्ष 2024-25 च्या पहिल्या तिमाहीत 79.08 लाख कोटी रुपये होता, जो 8.8 टक्के वाढीचा दर दर्शवितो,असे प्रेस रिलीजमध्ये स्पष्टपणे म्हणण्यात आले आहे. अमेरिकेने घेतलेल्या टॅरिफच्या निर्णयात ही अत्यंत दिलासादायक बाब म्हणावी लागणार आहे. असाच जीडीपी दर कायम राहिला तरीही नो टेन्शन असणार आहे.
भारताने रशियाकडून तेल खरेदी बंद करावे, असा दबाव हा भारतावर टाकला जात आहे. मात्र, अमेरिकेचा अटी भारताकडून मान्य करण्यात आल्या नाहीत. भारत हा आपल्या अटीवर कायम आहे. मात्र, अमेरिकेसोबत होणारा व्यापार कमी झाल्याने त्याचा झटका बसण्याची दाट शक्यता असतानाच भारताकडून पर्यायी मार्गांचा शोध हा घेतला जात आहे. नरेंद्र मोदी हे जपान दाैऱ्यावर आहेत.
