AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानने भारताकडे मागितली थेट भीक, भारताने फटकारले, संयुक्त राष्ट्राच्या..

पाकिस्तानला भारताकडून चांगलाच मोठा दणका देण्यात आला. विशेष म्हणजे भारताने जागतिक मंचावर पाकिस्तानचा बुरखा फाडला. भर कार्यक्रमात भारताने पाकला सळो की पळो करून सोडले. पाकिस्तान फक्त पाणी पाणी करत या कार्यक्रमात राहिले.

पाकिस्तानने भारताकडे मागितली थेट भीक, भारताने फटकारले, संयुक्त राष्ट्राच्या..
Indus Water Treaty
| Updated on: Mar 20, 2026 | 10:44 AM
Share

भारत आणि पाकिस्तानचे संबंध गेल्या अनेक वर्षांपासून तणावात आहेत. पाकिस्तानकडून भारतात दहशतवादी कारवाया केल्या जातात. पाकिस्तानातून दहशतवादी भारतात घुसखोरी करतात आणि मोठे दहशतवादी हल्ले घडवून आणतात. मात्र, आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानकडून याला थेट नकार दिला जातो. आतापर्यंत भारताने अनेक पुरावेही याबाबतचे सादर केले आहेत. काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानमधून आलेल्या दहशतनाद्यांनी मोठा हल्ला पहलगाममध्ये केला. यावेळी हिंदू पर्यटक दहशताद्यांच्या निशाण्यावर होते. धक्कादायक बाब म्हणजे थेट धर्म विचारून गोळीबार करण्यात आला. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचे अनेक व्हिडीओही पुढे आले. या हल्ल्यानंतर संपूर्ण देशात मोठा संताप बघायला मिळाला. कोणत्याही परिस्थितीमध्ये पाकिस्तानला धडा शिकवण्याची मागणी केली जात होती. भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानात घुसून थेट मोठा हल्ला केला आणि दहशतवाद्यांचे अड्डे उद्ववस्थ केली.

यादरम्यानच भारताने पाकिस्तानला धडा शिकवण्याकरिता पाकिस्तानमध्ये जाणारे पाणीही रोखले. आता पाकिस्तान पाण्यासाठी तरसल्याचे बघायला मिळत आहे. भारताने सिंधू जल करार रद्द केल्यापासून पाकिस्तानात खळबळ उडाली आहे. पाकिस्तानकडून वारंवार सिंधू जल करार नर्संचयित करण्याचे आवाहन केले जात आहे. संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीमध्ये पाकिस्तानकडून याबाबत विनवणी करण्यात आली.

बैठकीदरम्यान पाकिस्तानकडून सिंधू जल करार निलंबनाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. यावेळी भारताने पाकिस्तानला सळो की पळो करून सोडले. भारताने यादरम्यान अगदी स्पष्ट शब्दात सांगितले की, जोपर्यत दहशतवादाचे जागतिक केंद्र असलेला पााकिस्तान आपली भूमिका बदल नाही, तोपर्यत सिधू जल करार निलंबितच राहिल. म्हणजेच थोडक्यात काय तर भारत कोणत्याही परिस्थितीमध्ये पाकिस्तानला पाणी देणार नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतावर दबाव टाकण्याचे काम पाकिस्तानकडून करण्यात आले.

मात्र, भारताने तिथेच पाकिस्तानला धुडकावून लावले. जागतिक जल दिनानिमित्त संयुक्त राष्ट्रांमध्ये एक कार्यक्रम पर बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी भारताचे प्रतिनिधी म्हणून तिथे पी. हरीश पोहोचले होते. यावेळी पाकिस्तानकडून जल सिधू करारचा मुद्दा उपस्थित करताच हरिश यांनी चांगले फटकारले. यावेळी हरिश यांनी म्हटले की, करारांचे पालक करण्यावर बोलण्यापूर्वी पाकिस्तानने मानवी जीवनाच्या पावित्र्याचा आदर केला पाहिजे. भारताने जागतिक मंचावर पाकिस्तानला तोंडावर पाडले.

Follow Us
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले...
Video :  शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले ते हजारो कोटी रुपये थेट..राजकारण न करण्याचं आवाहन!