India-canada Raw : भारताने कॅनडाला भरला दम ! 10 ऑक्टोबर दिली शेवटची डेडलाईन
India-Canada Rift : भारताने कॅनडाला पुन्हा एकदा त्याची जागा दाखवूव दिली आहे. खलिस्तानी दहशतवाद्याच्या हत्येप्रकरणी कॅनडाच्या पंतप्रधानांनी भारताचा हात असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर भारताने देखील यावर प्रत्यूत्तर दिले. कॅनडाच्या कारवाईनंतर भारताने ही कारवाईचा इशारा दिला आहे.

India vs canada raw : भारत आणि कॅनडा ( india-canada relation ) या दोन देशांदरम्यान सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने कॅनडाला आपल्या राजनैतिक अधिकाऱ्यांची संख्या कमी करण्याची सूचना केली आहे. भारताने यासाठी 10 ऑक्टोबरपर्यंतची डेडलाईन देखील दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने कॅनडाला स्पष्टपणे सांगितले आहे की, एकतर त्यांचे वाणिज्य दूतावास बंद करा किंवा समान मुत्सद्दींना जागा द्या. भारतात खलिस्तानी समर्थकांची संख्या मोठी आहे. वेळोवेळी भारताने खलिस्तानी समर्थकांवर कारवाईची मागणी केली आहे. पण कॅनडाने यावर कधीही गंभीरपणे कारवाई केली नाही. उलट खलिस्थानी समर्थकांना पाठिंबा देण्याचं काम केलं आहे. त्यामुळे अनेक खलिस्थानी दहशतवादी येथे सुरक्षितपणे राहतात.
भारत आणि कॅनडा यांच्यातील वाद काय ?
कॅनडासोबत सुरू असलेल्या तणावादरम्यान भारताने दोन्ही देशांच्या राजनैतिक अधिकाऱ्यांची संख्या समान असायला हवी असे म्हटले आहे. सध्या सरकारने असे म्हटले आहे की, 10 ऑक्टोबरपर्यंत असे झाले नाही तर भारत त्या 40 कॅनेडियन राजनैतिक अधिकाऱ्यांची मान्यता रद्द करेल जे भारतात आहेत. कॅनडाच्या पंतप्रधानांनी खलिस्तानी दहशतवादी निज्जरच्या हत्येमध्ये भारताचा सहभाग असल्याचे वक्तव्य केले होते. त्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले आहेत.
दोन्ही देशांतील मुत्सद्दींची संख्या समान असावी
सध्या कॅनडात भारतीय मुत्सद्दींची संख्या ३० च्या आसपास आहे. तर भारतात कॅनडाच्या मुत्सद्दींची संख्या जवळपास तिप्पट आहे. त्यामुळेच परराष्ट्र मंत्रालयाने कॅनडाला आपल्या राजनैतिक अधिकाऱ्यांची संख्या कमी करण्यास सांगितले आहे. 10 ऑक्टोबरपर्यंत ही कारवाई करावी, असा इशाराही देण्यात आला आहे.
भारताचा कॅनडाला इशारा
सुमारे 62 कॅनडाचे राजनैतिक अधिकारी सध्या भारतात आहेत. भारताने ही संख्या 41 पर्यंत कमी करावी असे सांगितले आणि त्यासाठी 10 ऑक्टोबरची अंतिम मुदतही निश्चित करण्यात आली आहे. याआधी दोन्ही देशांदरम्यान सुरू असलेल्या तणावामुळे दोन्ही देशांनी अनेक राजनैतिक अधिकाऱ्यांना परत पाठवले होते. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी सांगितले की, कॅनडातील मुत्सद्दींची संख्या नवी दिल्लीतील मुत्सद्दींच्या संख्येपेक्षा खूप जास्त आहे, त्यामुळे आम्ही ही संख्या कमी करण्यास सांगितले आहे.
