अमेरिकेलाही जमले नाही ते काम भारत करणार, भारताचा थेट प्रस्ताव, रशिया..
युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्ध गेल्या चार वर्षांपासून सुरू आहे. अमेरिकेने या युद्धात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला पण त्यांना अजिबात यश मिळाले नाही. त्यातच या युद्धात मध्यस्थी करण्यासाठी भारत मैदानात उतरला आहे. भारताच्या प्रयत्नांना यश मिळण्याची शक्यता आहे.

रशिया युक्रेन युद्ध सुरू आहे. गेल्या चार वर्षांपासून हे युद्ध सुरू आहे. आतापर्यंत या युद्धात हजारो बळी केले. पण अजूनही युद्ध थांबण्याचे नाव घेत नाही. अमेरिकेनेही हे युद्ध थांबवण्यासाठी मोठे प्रयत्न केले. पण त्यांनाही यश मिळाले नाही. डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, आम्ही युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न केली पण यश मिळाले नाही. आता रशिया आणि युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी भारत पुढे आला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हे युद्ध थांबवण्यासाठी रशियाला आर्थिक कोंडीत पकडण्याचा निर्णय घेतला. यासोबतच मोठ्या धमक्या देखील दिल्या. रशिया आणि युक्रेन यांच्यात शांतता प्रस्ताव भारताने ठेवला आहे. रिपोर्टनुसार, भारताकडून विदेश मंत्री एस.जयशंकर यांनी प्रस्ताव दिला. 3 सप्टेंबर रोजी जयशंकर युक्रेनमध्ये होते. वोलेडिमिर जेलेंस्की यांची त्यांनी भेट घेतली.
एस. जयशंकर मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा ते युक्रेन दाैऱ्यावर होते. यादरम्यान त्यांनी भाष्य केले की, हे युद्ध थांबवण्यासाठी जी काही मदत पाहिजे, ती सर्व करू. आम्ही त्याकरिता तयार आहोत. भारताचा हा प्रस्ताव संवेदनशील आणि आर्थिक महत्वपूर्ण आहे. यात तीन प्रस्ताव समाविष्ठ आहेत. ऊर्जा आणि पायाभूत सुविधांवर हल्ले थांबले पाहिजे, असे भारताचे प्रामाणिक मत आहे.
काही बंदरांवर हल्ले थांबवावी. अन्नधान्य पुरवठा करणाऱ्या जहाजांना टार्गेट केले जाऊ नये, असेही भारताने म्हटले. भारत पहिल्यांदाच या युद्धात थेट मध्यस्थी करताना दिसत आहे. अमेरिकेच्या प्रयत्नांना अपयश मिळाले असून आता यात भारत प्रयत्न करताना दिसतोय. भारताला जर यश मिळाले तर हा भारताचा अत्यंत मोठा विजय म्हणावा लागेल.
डोनाल्ड ट्रम्प यांनी हे युद्ध रोखण्यासाठी मोठे प्रयत्न केले. त्यांनी याकरिता आपल्या जावयालाही कामाला लावले. अमेरिका युद्ध थांबवलेच असे सर्वांना आवडत होते. मात्र, प्रत्यक्षात तसे घडले नाही. उलट दुसरीकडे अमेरिकेचे इराणसोबतचे युद्ध अधिक भडकले. ज्यामुळे अमेरिकेने शेवटी युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धातून माघार घेतली.
