भारत बालाकोटपेक्षा मोठ्या कारवाईच्या तयारीत, इम्रान खानला भीती

भारत पाकव्याप्त काश्मीर (पाकिस्तानमध्ये आझाद काश्मीर म्हणून ओळख) मध्ये बालाकोटपेक्षाही मोठी कारवाई करण्याच्या तयारीत आहे. पण आम्हीही त्याला चोख उत्तर देऊ, असंही इम्रान खानने (Imran Khan in PoK) म्हटलंय. पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पीओकेमध्ये संबोधित करताना इम्रान खान यांनी हे वक्तव्य केलं.

भारत बालाकोटपेक्षा मोठ्या कारवाईच्या तयारीत, इम्रान खानला भीती

मुजफ्फराबाद, पीओके : काश्मीर प्रश्न घेऊन जगातील विविध देशांचा पाठिंबा मागणाऱ्या पाकिस्तानला अपयश आलंय. कुणीही मागणीकडे लक्ष न दिल्यानंतर आमच्यात युद्ध झालं, तर त्याला संपूर्ण जग जबाबदार असेल, अशी दर्पोक्ती पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan in PoK) यांनी केली आहे. शिवाय भारत पाकव्याप्त काश्मीर (पाकिस्तानमध्ये आझाद काश्मीर म्हणून ओळख) मध्ये बालाकोटपेक्षाही मोठी कारवाई करण्याच्या तयारीत आहे. पण आम्हीही त्याला चोख उत्तर देऊ, असंही इम्रान खानने (Imran Khan in PoK) म्हटलंय. पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पीओकेमध्ये संबोधित करताना इम्रान खान यांनी हे वक्तव्य केलं.

काश्मीरसाठी आम्ही कोणत्याही पातळीला जाऊ, असं पाकिस्तानच्या लष्करप्रमुखानेही यावेळी म्हटलंय. भारताने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नसली तरी पाकिस्तानला सध्या भीती सतावत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर दाद न मिळाल्यानंतर पाकिस्तानने आता युद्धाची धमकी देणं सुरु केलंय. यापूर्वीही पाकिस्तानने युद्धाची धमकी दिली आहे. काश्मीरप्रश्नी नरेंद्र मोदी यांनी मोठी चूक केली असल्याचं इम्रान खान यांनी म्हटलंय.

नरेंद्र मोदी यांनी हे जे कार्ड वापरलंय, ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेचाच एक भाग होता. काश्मीरमध्ये जे पाऊल उचललंय, त्याने कर्फ्यू हटल्यानंतर काय परिस्थिती होईल याची आम्हाला भीती आहे. एवढी फौज पाठवा, नंतर पर्यटकांना काढून द्या एवढं करण्याची काय गरज होती. हे काय करायला निघाले आहेत? मी याला नरेंद्र मोदी यांचं धोरणात्मक ब्लंडर मानतो. त्यांनी त्यांचं शेवटचं कार्ड वापरलंय. भाजप आणि नरेंद्र मोदी यांना हे महागात पडणार आहे, अशी पोकळ धमकीही इम्रान खानने दिली.

भारत काहीतरी मोठी कारवाई करण्याच्या तयारीत असल्याची भीतीही इम्रान खानने व्यक्त केली. ”आम्हाला माहिती मिळाली आहे. सुरक्षेसंबंधी बैठक झाली, पाकिस्तान सैन्याला भारताच्या प्लॅनविषयी पूर्ण माहिती आहे. पुलवामानंतर भारताने ज्या पद्धतीने बालाकोटमध्ये कारवाई केली, त्यापेक्षाही भयंकर कारवाईचा प्लॅन पीओकेमध्ये केल्याची आम्हाला माहिती आहे. मी नरेंद्र मोदींना इथून आव्हान देतो, की तुम्हा कारवाई करा, ‘ईंट का जवाब पत्थर से देंगे’. पाकिस्तानी सैन्य तयार आहे. तुम्ही जे कराल, त्याचा सामना आम्ही अखेरपर्यंत करु,” अशी धमकीही इम्रान खानने दिली.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *