AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India-Bangladesh Tension : जो पर्यंत भारताचे तुकडे होणार नाहीत, तो पर्यंत…भारतीय खवळतील अशी बांग्लादेशची संतापजनक भाषा

India-Bangladesh Tension : पाकिस्तानचा लष्करप्रमुख आसीम मुनीर याला सुद्धा पाकिस्तानची जुनी रणनिती 'ब्लीड इंडिया विद अ थाउजंड कट्स' अंतर्गत भारताला त्रास द्यायचा आहे. आता बांग्लादेश सुद्धा अशी स्वप्न पाहू लागला आहे.

India-Bangladesh Tension : जो पर्यंत भारताचे तुकडे होणार नाहीत, तो पर्यंत...भारतीय खवळतील अशी बांग्लादेशची संतापजनक भाषा
abdullahil amaan azmi
| Updated on: Dec 03, 2025 | 3:39 PM
Share

बांग्लादेशातील काही रिटायर्ड जनरल पाकिस्तानी आर्मी चीफ आसिम मुनीर सारखी भारताबद्दल खतरनाक स्वप्न पाहत आहेत. बांग्लादेशी सैन्यातील रिटायर ब्रिगेडियर जनरल अब्दुल्लाहिल अमान आजमीने भारताविरोधात गरळ ओकली आहे. “भारताचे जो पर्यंत तुकडे-तुकडे होणार नाहीत, तो पर्यंत बांग्लादेशात शांतता स्थापित होणार नाही” असं विधान या रिटायर ब्रिगेडियरने केलय. अब्दुल्लाहिल अमान आजमी याचा भारत विरोधाचा जुना इतिहास आहे. बांग्लादेशी सैन्यात त्याने दीर्घकाळ काम केलय. जनरल आजमी 1971 साली युद्ध गुन्ह्यात दोषी ठरवण्यात आलेल्या जमात-ए-इस्लामीचा नेता गुलाम आजमचा मुलगा आहे. जमात-ए-इस्लामीचा चीफ राहिलेल्या गुलाम आजमला 1971 सालच्या हिंदू आणि स्वातंत्र्याचे समर्थक असलेल्या बंगालींचा नरसंहार केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आलेलं.

“भारताचे जो पर्यंत तुकडे-तुकडे होणार नाही, तो पर्यंत ते बांग्लादेशला शांततेत राहू देणार नाही. आमची मिडिया, सांस्कृतिक विश्व, आमचे विचारवंत या प्रत्येक ठिकाणी भारताचा हस्तक्षेप आहे.पाण्याच्या मुद्यावर जे लोक आमच्यासाठी अडचणी निर्माण करतायत, आमच्या लोकांना ज्या पद्धतीने मारलं जातय, त्यानंतर व्यापारिक असमानता आहे” असं अब्दुल्लाहिल अमान आजमी एका व्हिडिओमध्ये बोलताना दिसतो.

जेणेकरुन हळू-हळू तुकडे पडतील

पाकिस्तानचा लष्करप्रमुख आसीम मुनीर याला सुद्धा पाकिस्तानची जुनी रणनिती ‘ब्लीड इंडिया विद अ थाउजंड कट्स’ अंतर्गत भारताला त्रास द्यायचा आहे. ही रणनिती भारताला थेट युद्धाशिवाय प्रॉक्सी युद्ध, दहशतवाद, फुटीरतावाद आणि अंतर्गत अस्थिरतेसह भारताला हळू-हळू कमकुवत करण्याची आहे. याचा उद्देश भारताचं आर्थिक, सामाजिक आणि राजकीय नुकसान करणं आहे. जेणेकरुन हळू-हळू तुकडे पडतील.

हे स्वतंत्र बांग्लादेशच राष्ट्रगीत कसं असू शकतं?

बांग्लादेशात शेख हसीना यांचं सरकार कोसळल्यानंतर बांग्लादेशच राष्ट्रगान आणि संविधान बदलण्याची मागणी करण्यात आलेली. सप्टेंबर 2024 मध्ये रिटायर्ड जनरल अब्दुल्लाहिल अमान आजमी म्हणालेला की, “आमचं वर्तमान राष्ट्रगीत हे स्वतंत्र बांग्लादेशच्या अस्तित्वा विपरीत आहे. हे बंगालचं विभाजन आणि दोन बंगालच्या विलयाचा काळ दर्शवतो. दोन बंगाल एकत्र करण्यासाठी बनलेलं राष्ट्रगीत हे स्वतंत्र बांग्लादेशच राष्ट्रगीत कसं असू शकतं. 1971 साली भारताने हे आमच्यावर लादलेलं”

भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!.
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न.
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?.
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल.
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा.