5 कुत्रे, 1 मांजर आणि 92 अफगाण नागरीकांना सोडण्यासाठी दोन भारतीय बहिणींनी कोट्यवधी मोजले? का आहे देशभर चर्चा?

तिथून ते आता नेमके कोणत्या देशात सेटल होणार याची चाचपणी सुरु आहे. पण सर्व जण सुरक्षित आहेत कारण त्यांचा तालिबान्यांपासून बचाव करणारी टीम ही इस्त्रायल आणि अमेरीकन आहे

5 कुत्रे, 1 मांजर आणि 92 अफगाण नागरीकांना सोडण्यासाठी दोन भारतीय बहिणींनी कोट्यवधी मोजले? का आहे देशभर चर्चा?
अफगाणिस्तानमधून पळून जाण्यासाठी अफगाण नागरीकांना दोन भारतीय बहिणींनी मोठी आर्थिक मदत केलीय
Follow us
| Updated on: Dec 11, 2021 | 5:16 PM

ही बातमी आहे अफगाणिस्तानची, घडतेय पाकिस्तानच्या भूमीवर, घडवणारे आहेत भारतीय आणि चर्चा आहे ती जगभर. होय, ही बातमीच तशी आहे. तालिबानच्या जोखडातून सुटका करण्यासाठी दोन बहिणींनी जवळपास दीड कोटी रुपये खर्च केलेत. ह्या दोन्ही सख्या बहिणी असून दोन्ही भारतीय आहेत. त्यातली एक बहिणी ही दिल्लीत रहाते तर दुसरी बहिण ही जिब्राल्टरला. दोघींनी त्यांच्या आईच्या स्मरनार्थ दीड कोटी रुपये खर्च करुन 5 कुत्री, 1 मांजर आणि 92 अफगाण महिला मुलांची ताबिलान्यांच्या तावडीतून सुटका केलीय. हे सर्व जण सध्या पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये आहेत. तिथून ते आता नेमके कोणत्या देशात सेटल होणार याची चाचपणी सुरु आहे. पण सर्व जण सुरक्षित आहेत कारण त्यांचा तालिबान्यांपासून बचाव करणारी टीम ही इस्त्रायल आणि अमेरीकन आहे. हे सर्व जण तिसऱ्या देशात म्हणजे अफगाणिस्तान, पाकिस्तान सोडून सेटल होणार आहेत.

का मदत केली भारतीय बहिणींनी? हे मिशन होतं ऑपरेशन मॅझिक कार्पेट नावाचं. सहा पाळीव प्राणी, 30 महिला, 32 लहान मुलं यांचा वाचवण्यात आलंय. ह्या सर्वांना अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधून पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये आणलं गेलं. तेही हवाई किंवा समुद्रमार्गे नाही तर डोंगर-दऱ्या पार करत जमीनमार्गाने. बरं हे सर्व जण एका दिवसातही पोहोचू शकले नाहीत. यात काही व्हेटरनरी डॉक्टर्स आहेत, काही एक्झिक्युटीव्ह आहेत तर काही माजी सुरक्षा अधिकाऱ्यांची कुटूंब आहेत. वेळोवेळी त्यांना सुरक्षित घरात ठेवण्यात आलं आणि मजल दर मजल करत त्यांना काबूल ते इस्लामबाद असं ट्रॉन्सपोर्ट केलं गेलंय. ह्यात एक 90 वर्षांची एक महिलाही आहे आणि याच मिशन दरम्यान जन्मलेलं एक बाळही आहे. ह्या सर्व मोहीमेला जवळपास 3 कोटी रुपये खर्च आला. आणि त्यातला निम्मा खर्च हा दोन भारतीय बहिणींनी केलाय. कारण त्यांची आई पाकिस्तानमधून फाळणीच्या वेळेस भारतात आली होती आणि स्थलांतराची वेदना, जुलमी राजवटी याचा अनुभव ह्या कुटुंबाला होता. आईकडून ह्या दोन्ही बहिणींनी हे खुप वेळा ऐकलं होतं. त्याच वेदनेतून त्यांनी दीड कोटी रुपये ह्या अफगाण लोकांसाठी खर्च केलेत.

नेमक्या कोणत्या देशात जाणार? ज्यांना वाचवण्यात आलंय ते सर्व जण पाकिस्तानात आहेत. तिथून ते युरोप, अमेरीका, इस्त्रायल अशा कुठल्या तरी तिसऱ्या देशात सेटल होण्याची प्रकिया त्यांची सुरु आहे. त्यासाठी आवश्यक असलेली प्रक्रिया पार पाडण्यात येतेय. वेगवेगळ्या देशांकडे त्यासाठी विचारणा केली जातेय. यातले 30 जण हे मुक्या प्राण्यांसाठी काम करणाऱ्या मेहीव अॅनिमल चॅरीटीशी संबंधीत आहेत. ह्या ट्रस्टच्या पॅट्रॉन ह्या मेघन मर्केल आहेत. त्या ब्रिटीश रॉयल फॅमिलीशी संबंधीत आहेत. त्यामुळे तिसऱ्या देशात जागा मिळणं थोडं सोप्पं जाईल असं दिसतंय.

हे सुद्धा वाचा:

Kolhapur | कोणत्याही परिस्थितीत कामावर येणार नाही, एसटी कर्मचाऱ्यांचा एल्गार

Video : पाकिस्तानात लहानग्यांना दिली जातेय हत्या करण्याची ट्रेनिंग! कुठे मिळत आहे ईश्वर निंदेच्या आरोपीचं शीर धडावेगळं करण्याचं शिक्षण?

जितेंद्र आव्हाड म्हणतात, राष्ट्रवादीला सर्व मार्ग खुले; विनायक राऊत म्हणाले, बंधन नाही

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.