AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India-America : अमेरिकन एअरपोर्टवर भारतीय विद्यार्थ्याला अशी वागणूक, फोटो पाहूनच तुम्हाला येईल चीड VIDEO

India-America : अमेरिकेत इमिग्रेशन धोरणाविरोधात वातावरण पेटत चाललय. लॉस एंजिल्समध्ये हिंसक विरोध प्रदर्शन सुरु आहे. आता एका भारतीय विद्यार्थ्याला अमानवीय वागणूक दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ही सगळी घटना संताप, चीड आणणारी आहे. भारतीय दूतावासाकडे हस्तक्षेप करण्याची मागणी होत आहे.

India-America : अमेरिकन एअरपोर्टवर भारतीय विद्यार्थ्याला अशी वागणूक, फोटो पाहूनच तुम्हाला येईल चीड VIDEO
indian student pinned down at usa newark airport
| Updated on: Jun 10, 2025 | 11:22 AM
Share

अमेरिकेत मागच्या काही दिवसांपासून इमिग्रेशन धोरणाविरोधात लोक रस्त्यावर उतरले आहेत. लॉस एंजिल्समधील हिंसक विरोध प्रदर्शनाने अमेरिकेला हादरवून सोडलय. मात्र, त्यानंतरही अमेरिकी प्रशासनाने आपल्या हरकती सुधारलेल्या नाहीत. अमेरिकेच्या नेवार्क एअरपोर्टवर भारतीय विद्यार्थ्यासोबत अत्यंत अमानवीय व्यवहार करण्यात आला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विद्यार्थ्याच्या हातात बेड्या असून त्याला जमिनीवर दाबून ठेवण्यात आलं आहे. या प्रकरणात आता भारतीय दूतावास सक्रीय झाला आहे.

भारतीय वंशाचे अमेरिकी बिझनेसमॅन कुणाल जैन यांनी रविवारी एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडिओमध्ये भारतीय विद्यार्थ्याला कशी अमानवीय वागणूक देण्यात आली, त्याबद्दल सांगितलय. यामध्ये त्यांनी भारतीय दूतावासाच्या हस्तक्षेपाची मागणी केली आहे.

खचून गेल्याची भावना माझ्या मनात

अमेरिकीन बिझनेसमॅन कुणाल जैन यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर व्हिडिओ पोस्ट केला. “मी विमानतळावर पाहिलं, एका भारतीय विद्यार्थ्याच्या हातात बेड्या होत्या. तो रडत होता, एका गुन्हेगारासारखी त्याला वागणूक दिली जात होती. तो इथे आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी आला होता. कोणाच नुकसान करण्यासाठी इथे आला नव्हता. एक NRI या नात्याने मी स्वत:ला कमकुवत आणि खचून गेल्याची भावना माझ्या मनात आहे” असं कुणाल जैन यांनी X वर म्हटलंय.

हातात बेड्या टाकून त्याला जमिनीवर आपटलं

“अमेरिकी अधिकारी विद्यार्थ्यासोबत असं वर्तन करत असताना तो रडत होता. मी वेडा नाही, असं तो सांगत होता. अधिकाऱ्यांनी भारतीय विद्यार्थ्याच्या हातात बेड्या टाकून त्याला जमिनीवर आपटलं. तो म्हणत होता, मी वेडा नाही. त्याला जबरदस्तीने वेडा सिद्ध करण्याचे प्रयत्न सुरु होते” असं कुणाल जैन यांनी लिहिलं आहे.

अशी प्रकरण रोज घडतायत

जैन यांनी भारतीय दूतावास तसच परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्याकडे हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. “या विद्यार्थ्यासोबत काय होतय हे समजलं पाहिजे. अशी प्रकरण रोज घडतायत. मागच्या काही दिवसांपासून अशा घटना वाढल्या आहेत” असं जैन म्हणाले.

भारतीय दूतावासाने काय म्हटलं?

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर न्यू यॉर्कमधील भारतीय दूतावासाने या घटनेवर टिप्पणी केली. “नेवार्क लिबर्टी आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका भारतीय नागरिकांला अडचणींचा सामना करावा लागला. आम्ही या संबंधी स्थानिक अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत. वाणिज्य दूतावास भारतीय नागरिकांच्या कल्याणासाठी नेहमी कटिबद्ध आहे” असं न्यू यॉर्कमधील भारतीय दूतावासाने म्हटलं आहे.

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.