आनंदाची बातमी! Covaxin लस घेतलेले भारतीय आता अमेरिकेत प्रवेश करू शकणार; WHO मान्यतेनंतर परदेशी प्रवासी धोरणात बदल

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: Devashri Bhujbal

Updated on: Nov 04, 2021 | 4:24 PM

ही भारतीय प्रवाशांसाठी मोठा दिलासादासक बाब आहे कारण अनेक भारतीय प्रवासी भारतीय बनावटीची कोवॅक्सिन लस घेतल्यामुळे त्यांना अमेरिकेत प्रवेशाला बंदी असल्याने भारतात अडकले होते. (Indian travellers can enter USA with Covaxin vaccine after WHO approval)

आनंदाची बातमी! Covaxin लस घेतलेले भारतीय आता अमेरिकेत प्रवेश करू शकणार; WHO मान्यतेनंतर परदेशी प्रवासी धोरणात बदल
मुंबई विमानतळ

वॉशिंग्टन: अखेर कोवॅक्सिनला (Covaxin) लस घेतलेले भारतीय प्रवासी 8 नोव्हेंबरपासून अमेरिकेत प्रवेश करू शकतात. भारत बायोटेकने विकसित केलेल्या कोविड-19 प्रतिबंधक कोवॅक्सिन लसीला बुधवारी जागतिक आरोग्य संघटनेकडून (WHO) मान्यता मिळाल्यानंतर अमेरिकेने गुरुवारी आपल्या परदेशी प्रवासी धोरणात सुधारणा केली. ही भारतीय प्रवाशांसाठी मोठा दिलासादायक बाब आहे कारण अनेक भारतीय प्रवासी भारतीय बनावटीची कोवॅक्सिन लस घेतल्यामुळे त्यांना अमेरिकेत प्रवेशाला बंदी असल्याने भारतात अडकले होते. (Indian travellers can enter USA with Covaxin vaccine after WHO approval)

अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (CDC) ने जागतिक आरोग्य संघटनेने भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनला आपत्कालीन वापर लसींच्या सूचीत (EUL) मंजूर केल्याची माहिती दिली. नवीन अमेरिकेच्या प्रवास नियमात आता Pfizer-BioNTech, Johnson & Johnson, Moderna, Oxford-AstraZeneca, Covishield, Sinopharm Sinovac आणि Covaxin द्वारे पूर्णपणे लसीकरण केलेल्या प्रवाशांना प्रवेशाला मान्यता आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या स्वतंत्र सल्लागार समितीच्या तांत्रिक सल्लागार गट (TAG) ने कोवॅक्सिनला आपत्कालीन वापरासाठी (EUL) दर्जा देण्याची शिफारस केली होती. त्यानंतर बुधवारी WHO ने कोवॅक्सिनलाआपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली. कोवॅक्सिन ही लस कोविड 19 च्या लक्षणाविरोधात 77.8 टक्के परिणामकारक ठरली आणि नवीन डेल्टा वेरिएंटविरोधात 65.2 टक्के संरक्षण करायला परिणामकारक ठरली आहे.

Other News

Afghanistan Foreign Currency ban: तालिबानने अफगाणिस्तानात विदेशी चलनाच्या वापरावर घातली बंदी

Prime Minister Narendra Modi : ‘सैनिक हो, तुम्हीच माझं कुटुंब’ म्हणंत जवानांसोबत साजरी केली ‘दिवाळी’

Dengue Outbreak: देशात डेंग्यूचा उद्रक, प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकार ‘या’ नऊ राज्यांमध्ये पाठवणार तज्ज्ञांची टीम

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI