Dengue Outbreak: देशात डेंग्यूचा उद्रक, प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकार ‘या’ नऊ राज्यांमध्ये पाठवणार तज्ज्ञांची टीम

देशभरात गेल्या काही आठवड्यात एक लाखाहून अधिक डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत. सप्टेंबरच्या महिन्यात उत्तर प्रदेशच्या फिरोजाबाध्ये डेंग्यूच्या साथीला सुरूवात झाली होती. सध्याचा डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने तज्ज्ञांची टीम देशभरातील नऊ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.

Dengue Outbreak: देशात डेंग्यूचा उद्रक, प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकार 'या' नऊ राज्यांमध्ये पाठवणार तज्ज्ञांची टीम
डेंग्यूचे रुग्ण वाढले.

नवी दिल्लीः गेल्या काही आठवड्यांत संपूर्ण भारतात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे, ज्यामुळे लोकांमध्ये आणि साकारची चिंता वाढली आहे. उत्तर भारतातील राज्यांमध्या डेंग्यूची साथ जास्त प्रमाणात पसरली आहे. देशभरात गेल्या काही आठवड्यात एक लाखाहून अधिक डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत. सप्टेंबरच्या महिन्यात उत्तर प्रदेशच्या फिरोजाबाध्ये डेंग्यूच्या साथीला सुरूवात झाली होती. (Dengue cases rising in India Central health ministry to send expert teams to control Dengue outbreak)

सध्याचा डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने तज्ज्ञांची टीम देशभरातील नऊ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल आणि नॅशनल वेक्टर बोर्न डिसीज कंट्रोल प्रोग्रामचे अधिकारी त्या राज्यांतील आरोग्य अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील.

कोणत्या राज्यांना टीम नियुक्त केले आहेत?

ज्या राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये संघ पाठवण्यात आले आहेत त्यामध्ये हरियाणा, पंजाब, केरळ, राजस्थान, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, दिल्ली आणि जम्मू आणि काश्मीर यांचा समावेश आहे. डेंग्यूच्या प्रादुर्भावाचे व्यवस्थापन करण्यासाठी, सार्वजनिक आरोग्य उपायांसह तांत्रिक मार्गदर्शन केले जाईल.

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की या वर्षी जास्त झालेला पाऊस आणि डासांच्या उत्पत्तीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अपुरे उपाय या संसर्गाच्या वाढीस कारणीभूत असू शकतात. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी दिल्लीत एका बैठकीच्या अध्यक्षतेखाली आरोग्य सचिवांना डेंग्यूचे जास्त प्रकरण असलेल्या राज्यांमध्ये तज्ञांचे पथक पाठवण्याचे निर्देश दिले होते.

रुग्णांचे आकडे

देशभरात गेल्या काही आठवड्यात एक लाखाहून अधिक डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत. दिल्लीत या वर्षी 1,500 हून अधिक डेंग्यूच्या केसेस नोंदवल्या गेल्या आहेत. ज्यापैकी जवळपास 80% केसेस गेल्या महिन्यात नोंदवल्या गेल्या आहेत. दरम्यान, गाझियाबादमध्ये, डेंग्यूच्या रुग्णांची संख्या 1,000 च्या जवळपास आहे आणि त्यापैकी 68% ऑक्टोबरमध्ये आले आहेत. चंदीगडमध्ये या आजारामुळे आतापर्यंत 33 मृत्यू झाले आहेत. मेट्रो हॉस्पिटल नोएडाचे सल्लागार आणि विभाग प्रमुख डॉ रमित सिंह संभ्याल यांनी न्यूज 9 ला सांगितले की, “इमर्जन्सी वॉर्डमधल्या (emergency ward) सरासरी 10 पैकी 7 रुग्ण डेंग्यूसाठी पॉझिटिव्ह आढळत आहेत. एका दिवसात आम्हाला इमर्जन्सी वॉर्डमध्ये 50-60 रुग्ण आढळतायेत, त्यापैकी निम्म्याहून अधिक डेंग्यूचे रुग्ण आहेत.”

वेक्टर ब्रीडिंग नष्ट करणे आवश्यक

WHO ने म्हटले आहे की, साथीच्या रोगाचा आणि डेंग्यूच्या साथीचा एकत्रित परिणामाचा धोका जास्त लोकसंख्या असलेल्या भागात आसतो. भारतात कोरोना महामारी आजून संपलेली नाही. डेंग्यूच्या साथीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वेक्टर ब्रीडिंग (vector breeding spots) नष्ट करणे आवश्यक आहे. डासांसाठीजे फॉगिंग (fogging) केले जाते ते केवळ डासांना मारून टाकते, ब्रीडिंग त्याने संपत नाही.

Other News

Dengue: नवीन डासांनी डेंग्यूच्या डासांशी लढा; इंडोनेशियातील संशोधकांचा प्रयोग यशस्वी

कोरोनाचा डाग पुसण्यासाठी चीनच्या उलट्या बोंबा, आता म्हणतो, जगभरात कोरोना पसरवण्यासाठी हे 3 देश जबाबदार!

Russia Covid Update: रूसमध्ये मृत्यूंची विक्रमी वाढ; सप्टेंबरमध्ये 44,265 मृत्यू, World War II नंतर सर्वाधिक

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI