AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताच्या Essar ग्रुपची US च्या स्टील प्लांटमध्ये प्रचंड मोठी गुंतवणूक पण ट्रम्पच्या मंत्र्याचं भारतीय चिडतील असं वक्तव्य

भारताच्या एस्सार ग्रुपने अमेरिकेत मोठी गुंतवणूक केली आहे. त्यामुळे अमेरिकेच्या नागरिकांसह तिथल्या अर्थव्यवस्थेचा फायदा होणार आहे. पण अमेरिकेचे व्यापार मंत्री हॉवर्ड लटनिक यांनी भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळणांर वक्तव्य केलं आहे.

भारताच्या Essar ग्रुपची US च्या स्टील प्लांटमध्ये प्रचंड मोठी गुंतवणूक पण ट्रम्पच्या मंत्र्याचं भारतीय चिडतील असं वक्तव्य
Donald trump
| Updated on: Sep 29, 2026 | 4:43 PM
Share

भारताच्या एस्सार ग्रुपने अमेरिकेच्या स्टील प्रोजेक्टमध्ये प्रचंड मोठी गुंतवणूक केली आहे. तब्बल 15 अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे. स्वत: डोनाल्ड ट्रम्प यांनी आज ही घोषणा केली. भारतीय कंपनीच्या या गुंतवणूकीमुळे अमेरिकन नागरिकांनाच फायदा होणार आहे. पण अमेरिकेचे व्यापार मंत्री हॉवर्ड लटनिक यांनी भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळणांर वक्तव्य केलं आहे. भारत सध्या डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाच्या टॅरिफ नितीमुळे त्रस्त आहे. अमेरिकेकडून सातत्याने टॅरिफ लावण्याची धमकी दिली जाते. त्यामुळे भारतीय उद्योगांचं नुकसान होत आहे. पर्यायाने भारतीय अर्थव्यवस्थेला त्याचा फटका बसतोय. अमेरिकेचे व्यापार मंत्री हॉवर्ड लटनिक यांचं म्हणणं असं आहे की, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्टीलवर टॅरिफ लावला नसता, तर एस्सार ग्रुपने अमेरिकेत स्टील प्लांटमध्ये गुंतवणूकच नसती केली. ट्रम्प यांच्या टॅरिफ पॉलिसीमुळे हे शक्य झाल्याचा लटनिक यांचा दावा आहे.

“जर, टॅरिफ नसता तर इथे खाणी आणि स्टील प्लांट बनला नसता. टॅरिफ धोरणामुळे अमेरिकेत स्टील उत्पादनलाा प्रोत्साहन मिळतय” असं लटनिक म्हणाले. मिनेसोटाच्या मेसाबी आयरन रेंजमध्ये एस्सारची खाण आहे. आयोवा येथे 15 अब्ज डॉलरचा इंटीग्रेटेड स्टील प्लांट बनतोय. ट्रम्प यांनी व्हाइट हाऊसमध्ये मेसाबी मेटालिक्स अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या प्रोजेक्टची घोषणा केली. मेसाबी मेटालिक्स एस्सार ग्रुपची कंपनी आहे. व्हाइट हाऊसने अमेरिकी इतिहासातील हा सर्वात मोठा स्टील प्लांट असल्याचं म्हटलं आहे.

75 लाख टन स्टील बनवण्याची क्षमता

या प्रोजेक्ट अंतर्गत मिनेसोटाच्या खाणीतून निघणाऱ्या आयरन ओरला आयोवा येथे नेऊन स्टील बनवलं जाईल. एस्सार ग्रुपने मिनेसोटा खाण विकसित करण्यासाठी 2.5 अब्ज डॉलर पेक्षा जास्त गुंतवणूक केली आहे. प्लांटच्या पहिल्या टप्प्यात 75 लाख टन स्टील बनवण्याची क्षमता असेल, जी वाढवून 1 कोटी टनापर्यंत नेण्यात येईल. स्टील उत्पादन 2030 पर्यंत सुरु करण्याचं लक्ष्य निर्धारित करण्यात आलय.

अमेरिकेत स्टीलवर किती टॅरिफ आहे?

ट्रम्प प्रशासनाने आयात स्टीलवरील टॅरिफ 50 टक्के केला आहे. या निर्णयामुळे कंपन्यांना परदेशातून स्टील मागवण्याऐवजी अमेरिकेतच उत्पादन सुरु करण्याची प्रेरणा मिळेल. एस्सारच्या प्रोजेक्टमुळे अमेरिकन कंपन्यांचं परदेशी स्टील आयातीवरील अवलंबित्व कमी होईल असं लटनिक यांचं मत आहे. त्यांनी खासकरुन आयरन ओर प्लेट्सचा उल्लेख केला. अमेरिका मोठ्या प्रमाणात ब्राझीलहून हे आयात करतो.

Follow Us
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही;
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही; कट रचणारी तिसरी व्यक्ती कोण?
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस..
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस किंवा तत्सम पदावर मिळणार नोकरी
पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
Video : पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? राजकीय वर्तुळात चर्चा
Video : एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? शिवसेनेच्या नेत्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी...
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी स्वतः दिली डोकं चक्रावणारी माहिती
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप
निलेश घायवळांची निर्दोष मुक्तता, ; तक्रारदाराच्या माघारीनंतर मकोका...
निलेश घायवळांची निर्दोष मुक्तता; तक्रारदाराच्या माघारीनंतर मकोका न्यायालयाचा मोठा निर्णय!
मोठी बातमी! तब्बल 5 वर्षांनी सचिन वाझेला जामीन, पण...
Sachin Waze : मोठी बातमी! तब्बल 5 वर्षांनी सचिन वाझेला जामीन, पण...अँटेलिया प्रकरणात कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय
महाराष्ट्रात बुलेट ट्रेन प्रकल्पाचा महत्त्वाचा टप्पा, पहिला स्टील पूल.
महाराष्ट्रात बुलेट ट्रेन प्रकल्पाचा महत्त्वाचा टप्पा, पहिला स्टील पूल उभारला
पावसाअभावी शेती उद्ध्वस्त, शेतकऱ्यांची दिवाळी संकटात; नवनीत राणा...
पावसाअभावी शेती उद्ध्वस्त, शेतकऱ्यांची दिवाळी संकटात; नवनीत राणा म्हणाल्या...