AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

US Tariff On India : ‘भारत संधीसाधू, लागेल अशा ठिकाणी मारलं’ ट्रम्पच्या मनात विष कालवणारा हाच तो माणूस

US Tariff On India : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला आहे. अचानक डोनाल्ड ट्रम्प यांच्या मनात हा विचार आला नाही. त्यामागे एक माणूस आहे, टॅरिफ लावण्यामागे त्याची मुख्य भूमिका आहे. या व्यक्तीने एक वर्तमानपत्रात स्तंभ लिहून भारताला संधीसाधू म्हटलय. सध्या भारतावर 50 टक्के टॅरिफ आकारण्यात आलाय.

US Tariff On India :  'भारत संधीसाधू, लागेल अशा ठिकाणी मारलं' ट्रम्पच्या मनात विष कालवणारा हाच तो माणूस
narendra modi and vladimir putin and donald trump
| Updated on: Aug 19, 2025 | 9:17 AM
Share

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला आहे. यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेच नुकसान होत आहे. लाखोंचे रोजगार संकटात सापडले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी हा जो निर्णय घेतला, त्यामागे ज्या माणसाचा विचार आहे, तो म्हणजे पीटर नवारो. या नवारोने भारतावर कठोर शब्दात टीका केली आहे. रशियन तेल आणि संरक्षण साहित्य खरेदी करण्याबद्दल या पीटर नवारोंनी भारतावर जोरदार टीका केली. नवी दिल्लीने त्यांचं धोरण बदलावं, यासाठी भारताला लागेल अशा ठिकाणी मारण्याचा संकल्प त्यांनी बोलून दाखवला. फायनान्शिल टाइम्समध्ये त्यांनी एक स्तंभ लिहिला आहे. पीटर नवारो यांच्यामते भारताचा रशियासोबत तेल व्यापार हा संधीसाधूपणा आहे. रशियन अर्थव्यवस्थेला एकाकी पाडण्याच्या मार्गात भारत खोडा घालत असल्याच त्यांचं म्हणणं आहे.

अर्थशास्त्राचे माजी प्राध्यापक पीटर नवारो हे डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात त्यांचे व्यापार सल्लागार होते. अमेरिकेने अन्य देशांवर सुद्धा तितकाच टॅरिफ आकारावा, या विचारामागे पीटर नवारो यांचीच मुख्य भूमिका आहे. भारत अमेरिकेसोबत व्यापार करुन डॉलरची कमाई करतो आणि नंतर तोच पैसा रशियन तेल खरेदीसाठी वापरतो असं पीटर नवारो यांनी स्तंभात लिहिलं आहे.

‘तेल खरेदीमागे देशांतर्गत गरज हा एकमेव उद्देश नाही’

“भारताच्या आर्थिक पाठबळाच्या जोरावर रशिया युक्रेनवर हल्ला करतो. त्याचवेळी अमेरिका आणि युरोपला करदात्यांचा पैसा अब्जावधी युक्रेनच्या संरक्षणावर खर्च करावे लागतायत. 3 लाखापेक्षा जास्त सैनिक आणि नागरिकांचा मृत्यू झाला आहे” असं नवारो यांनी लिहिलं आहे. नवारो यांनी आपल्य स्तंभामधून भारताचे तेल शुद्धीकरण करणारे कारखाने आणि त्यातल्या नफेखोरीवर सुद्धा जोरदार टीका केली. “रशियाकडून सवलतीच्या दरात तेल खरेदी करायची आणि नंतर त्यावर प्रोसेस करुन तीच पेट्रोलियम उत्पादने युरोप, आफ्रिका आणि आशियामध्ये विकतात. भारताने 2022 नंतर रशियाकडून तेल आयात वाढवली. त्यामागे देशांतर्गत गरज भागवणं हा एकमेव उद्देश नव्हता” असं पीटर नवारो म्हणाले.

‘भारताला तसं वागावं लागेल’

“बायडेन प्रशासनाने या रणनितीक आणि भूराजनितीक समस्येकडे वेगळ्या दृष्टीकोनातून पाहिलं. आज डोनाल्ड ट्रम्प प्रशासन त्यांचा सामना करतय” असं पीटर नवारो म्हणाले. “भारताला वाटत असेल की, अमेरिकेकडून रणनितीक भागीदारासारखी वागणूक मिळावी, तर त्यांना तसं वागाव लागेल” असं पीटर नवारो यांनी स्पष्ट केलं. सध्या डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 25 टक्के टॅरिफ लावला आहे. येत्या 27 ऑगस्टपासून रशियाकडून तेल खरेदी करतो म्हणून अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ लागेल. असा एकूण मिळून भारतावर 50 टक्के टॅरिफ आकारला जाईल.

Follow Us
देवेंद्र फडणवीस, अन् ठाकरे बंधू एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली
Thackeray Brothers and Fadnavis : देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे अन् राज ठाकरे एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली?
बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सहाही जणांचा मृत्यू
Uttarakhand Helicopter Crash : बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं; जोशीमठजवळ कोसळून, पायलटसह सहाही जणांचा दुर्दैवी मृत्यू
मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील पाटलांच्या विधानाने
Solapur : मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील मोहिते पाटलांच्या विधानाने सोलापूरच्या राजकारणात चर्चांना उधाण
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट
बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा...
Helicopter Missing : बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा शोध सुरू
समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह
Shivsena UBT : समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह ठाकरे गटाचे कार्यकर्ते ताब्यात
BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर....
BEST Employees Diwali Bonus : BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर; ३ नोव्हेंबरला खात्यात होणार जमा
परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने
Shivsena UBT : परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने; शेलू बाजारात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; राऊतांचा....
Sanjay Raut : मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; संजय राऊतांचा पुस्तकातून गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?
महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं
Shivsena : महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं मोठं विधान