AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतातील प्रसिद्ध योग गुरु, यामध्ये कोण आहे सर्वात बेस्ट योग गुरु?

International Yoga Day 2025: जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जात आहे, कोण आहे भारतातील लोकप्रिय आणि बेस्ट गुरु...,

भारतातील प्रसिद्ध योग गुरु, यामध्ये कोण आहे सर्वात बेस्ट योग गुरु?
| Updated on: Jun 21, 2025 | 9:52 AM
Share

जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जात आहे. जगभरात योगाचा प्रसार करण्यात भारताने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. हजारो वर्षांपासून, ही प्राचीन कला केवळ शारीरिक आरोग्य सुधारत नाही तर मानसिक शांती आणि आध्यात्मिक जागरूकतेचा मार्गही मोकळा करत आहे. भारतात असे अनेत योग गुरु आहेत. ज्यांनी शिकवणी आणि प्रयोगांद्वारे जागतिक स्तरावर योगाला लोकप्रिय केलं. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त, भारतातील प्रसिद्ध योग गुरु कोण आहेत आणि त्यांच्यापैकी सर्वोत्तम योग गुरु कोण आहेत? जाणून घेऊ

भारताली प्रसिद्ध योग गुरु…

तिरुमलाई कृष्णमाचार्य: यांना (1888-1989) आधुनिक योगाचे जनक मानलं जातं. त्यांनी हठयोगाचे पुनरुज्जीवन केले आणि विन्यास योगाचा पाया रोवला. कृष्णमाचार्य यांनी वैयक्तिक गरजांनुसार योगाचं रूपांतर करण्यावर भर दिला. त्यांच्या प्रमुख शिष्यांमध्ये बीकेएस अय्यंगार, टीकेव्ही देसिकाचार आणि के पट्टाभी जोइस यांचा समावेश आहे, ज्यांनी अय्यंगार योग आणि अष्टांग योग जगभरात लोकप्रिय केलं. कृष्णमाचार्य यांनी योग मकरंद (1934) आणि योग रहस्य सारखे ग्रंथ लिहिले, जे आजही योग साधकांसाठी महत्त्वाचे आहेत.

बीकेएस अय्यंगार: बेल्लूर कृष्णमाचार सुंदरराजा अय्यंगार (1918-2014) यांनी अय्यंगार योगाची स्थापना केली. त्यांचे ‘लाईट ऑन योगा’ (1966) हे पुस्तक योगाचं बायबल मानलं जातं, ज्याचं 17 भाषांमध्ये भाषांतर केलं आहे. शारीरिक मर्यादांमुळे योग करू न शकणाऱ्यांसाठी अय्यंगार यांनी योग सुलभ केला. पुण्यात स्थापन झालेली राममणी अय्यंगार मेमोरियल योगा इन्स्टिट्यूट आजही त्यांच्या स्वप्नांना नवा मार्ग देत आहे.

स्वामी शिवानंद सरस्वती: (1887-1963) यांनी कर्म योग, भक्ती योग, ज्ञान योग आणि राज योग यांना एकात्मिक करून एक समग्र दृष्टिकोन सादर केला. त्यांनी ऋषिकेशमध्ये शिवानंद आश्रम आणि दिव्य जीवन सोसायटी (1936) स्थापन केली, जी अजूनही योग आणि वेदांत शिकवते. त्यांच्या शिकवणींमध्ये योगाला आध्यात्मिक आणि शारीरिक आरोग्याचे साधन मानलं जात असे. जगभरात योगाचा प्रसार करण्यात त्यांच्या शिष्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

परमहंस योगानंद (1893-1952) यांनी पश्चिमी देशांमध्ये योग लोकप्रिय केलं. त्यांच्या ‘ऑटोबायोग्राफी ऑफ अ योगी’ या पुस्तकाने लाखो लोकांना योग आणि ध्यानधारणेसाठी प्रेरित केलं. त्यांनी 1920 मध्ये अमेरिकेत सेल्फ-रियलायझेशन फेलोशिपची स्थापना केली, जी आजही त्यांचे दृष्टिकोन पुढे नेत आहे. योगानंद यांनी योगाचं वर्णन आध्यात्मिक प्रगतीचा मार्ग म्हणून केलं, ज्यामध्ये प्राणायाम, मंत्र आणि मुद्रा यांचा समावेश होता.

स्वामी विवेकानंद: (1863-1902) यांनी 1893 मध्ये शिकागो येथील जागतिक धर्म संसदेत त्यांनी योगाचे वर्णन ‘मनाचे विज्ञान’ असे करून पाश्चात्य जगाला त्याची ओळख करून दिली. विवेकानंदांनी योगाला केवळ शारीरिक व्यायामापुरते मर्यादित ठेवलं नाही तर ते आत्म-जागरूकता आणि जागतिक बंधुत्वाचं साधन बनवलं.

स्वामी रामदेव : पतंजली योगपीठाचे संस्थापक स्वामी रामदेव यांनी योग सामान्य लोकांपर्यंत पोहोचवला. त्यांच्या योग शिबिरांनी आणि टीव्ही कार्यक्रमांनी लाखो लोकांना प्राणायाम आणि आसनांकडे आकर्षित केले. नुकताच समोर आलेल्या रिपोर्टनुसार, स्वामी रामदेव यांचे यूट्यूब चॅनेल आणि पतंजलीच्या योग कार्यक्रमांमुळे ते भारतातील सर्वात लोकप्रिय योगगुरू बनले आहेत.

भारतातील सर्वात बेस्ट गुरु कोणते?

तिरुमलाई कृष्णमाचार्य आणि बीकेएस अय्यंगार यांनी आधुनिक योगाचा पाया घातला. त्यांच्या शिकवणी अजूनही जगभरात प्रासंगिक आहेत. ते आता हयात नाहीत म्हणून सध्याच्या काळात त्यांची तुलना करणे कठीण आहे. परमहंस योगानंद आणि स्वामी विवेकानंद यांनी पश्चिमेकडे योग लोकप्रिय केला. परंतु त्यांची शिकवण अधिक आध्यात्मिक होती, जी शारीरिक योगापेक्षा वेगळी आहे. तर, स्वामी रामदेव यांनी योगाला भारतातील प्रत्येक घरा-घरात नेलं.

शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.