AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Iran-Israel War : इस्रायल विरोधात पाकिस्तानचा इराणला शब्द, जर त्यांनी…पाकड्यांचे खतरनाक मनसुबे उघड

Iran-Israel War : पाकिस्तानला आपल्या समस्या सुटत नाहीयत आणि ते इस्रायल विरोधात आक्रमक भाषा करतायत. इराण-इस्रायल युद्धात पाकिस्तान उडी घेण्याच्या तयारीत आहे. दिवसेंदिवस या युद्धाच स्वरुप भयानक होत चाललं आहे. इराणच्या सुरक्षा परिषदेच्या सदस्याने टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत पाकिस्तानने त्यांना काय आश्वासन दिलय? त्या बद्दल सांगितलं.

Iran-Israel War : इस्रायल विरोधात पाकिस्तानचा इराणला शब्द, जर त्यांनी...पाकड्यांचे खतरनाक मनसुबे उघड
iran ally pakistan threatens to israel
Updated on: Jun 16, 2025 | 11:29 AM
Share

इथे पाकिस्तानला आपला देश संभाळला जात नाहीय आणि ते दुसऱ्या देशाच्या युद्धात उडी घेण्याच्या तयारीत आहेत. भारताकडून मार खाऊन काहीच दिवस झालेला पाकिस्तान आता इराणला सहानुभूती दाखवतोय. रिपोर्टनुसार इराण-इस्रायल युद्धात पाकिस्तान इराणला अनेक प्रकारची मदत करतोय. पाकिस्तानने आता इस्रायलला अणू बॉम्बची धमकी दिल्याची चर्चा आहे. पाकिस्तानने इराणच्या माध्यमातून इस्रायलला ही धमकी दिली आहे. “पाकिस्तानने आम्हाला सांगितलय, इस्रायलने जर तेहरानवर अणूबॉम्ब टाकला, तर पाकिस्तान सुद्धा त्यांच्यावर अणवस्त्र हल्ला करेल” इराणच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सदस्य मोहसेन रेजाई शुक्रवारी एका इराणी टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले. सध्या मध्य पूर्वेत अणवस्त्र हल्ला करण्याची क्षमता इस्रायलमध्ये आहे. इराण सुद्धा अणूबॉम्ब बनवण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणूनच इस्रायलने त्यांच्यावर हल्ला केला. दिवसेंदिवस या युद्धाच स्वरुप भयानक होत चाललं आहे. आता पाकिस्तान या युद्धात उतरण्याची भाषा करत आहे.

वेगवेगळ्या अंदाजानुसार 2023 पर्यंत पाकिस्तानकडे जवळपास 170 अणूबॉम्ब होते. स्टॉकहोम इंटरनेशनल पीस रिसर्च इंस्टीट्यूट (SIPRI) आणि फेडरेशन ऑफ अमेरिकन सायटिस्ट्सच्या (FAS) स्त्रोतांनुसार पाकिस्तान आपली अणवस्त्र क्षमता वाढवतोय. 2025 पर्यंत पाकिस्तानकडे 200-250 च्या आसपास अणूबॉम्ब असतील.

इस्रायलकडे किती अणूबॉम्ब

इस्रायल आपल्या अणवस्त्रांबद्दल माहिती सार्वजनिक करत नाही. ‘परमाणु अस्पष्टते’ची त्यांची निती आहे. एका अंदाजानुसार इस्रायलकडे जवळपास 90 ते 300 अणूबॉम्ब आहेत. यात FAS च्या अंदाजानुसार जवळपास 90 आणि काही अन्य स्त्रोतांच्या अंदाजानुसार 100-200 अणूबॉम्ब आहेत. उपलब्ध सामग्री आणि डिलीवरी सिस्टिमच्या क्षमतेवर हे अंदाज आधारित आहेत. दोन्ही देशांनी अणवस्त्र अप्रसार संधीवर स्वाक्षरी केलेली नाही. त्यामुळे त्यांची अचूक संख्या सांगता येत नाही.

नुकताच पाकिस्तानने भारताकडून प्रचंड मार खाल्लाय

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर लॉन्च केलं. भारताने केलेल्या हल्ल्यांमध्ये पाकिस्तानच प्रचंड नुकसान झालं आहे. चार दिवसांच्या या लढाईत भारताने पाकिस्तानच्या दहापेक्षा जास्त एअर बेसना लक्ष्य केलं. भारताच्या अभेद्य एअर डिफेन्स सिस्टिमने पाकिस्तानचे सर्व ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले विफल केले. अखेर पाकिस्तानला गुडघ्यावर येऊन शस्त्रसंधी करावी लागली. भारतीय DGMO ना फोन करुन त्यांनी हल्ले थांबवण्याची विनंती केली.

मग ठाकरेंनी 'दोपहरचा सामना' बंद करावा; सदावर्तेंची ठाकरे बंधूंवर टीका
मग ठाकरेंनी 'दोपहरचा सामना' बंद करावा; सदावर्तेंची ठाकरे बंधूंवर टीका.
ठाकरेंची राजकीय कवायत! इगतपुरीत उद्यापासून मनसेचं शिबिर
ठाकरेंची राजकीय कवायत! इगतपुरीत उद्यापासून मनसेचं शिबिर.
पंतप्रधान मोदींचा उज्ज्वल निकम यांना फोन, विचारला हा मोठा प्रश्न..
पंतप्रधान मोदींचा उज्ज्वल निकम यांना फोन, विचारला हा मोठा प्रश्न...
छत्रपती संभाजीराजेंचा एकेरी उल्लेख अन्..
छत्रपती संभाजीराजेंचा एकेरी उल्लेख अन्...
हतनूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला, काय आहे सध्याची परिस्थिती?
हतनूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला, काय आहे सध्याची परिस्थिती?.
रिक्षा चालकांची मुजोरी वाढली; ठाण्यात महिलेवर हात उचलला
रिक्षा चालकांची मुजोरी वाढली; ठाण्यात महिलेवर हात उचलला.
मद्यविक्री परवान्यांची खिरापत वाटणार? तब्बल 328 नवीन मद्यविक्री परवाने
मद्यविक्री परवान्यांची खिरापत वाटणार? तब्बल 328 नवीन मद्यविक्री परवाने.
प्रादेशिक न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेचं काम 2027 पर्यंत होईल
प्रादेशिक न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेचं काम 2027 पर्यंत होईल.
पवार अंबानी-आदानींपेक्षा कमी नाही; अंजली दमानियांचा टोला
पवार अंबानी-आदानींपेक्षा कमी नाही; अंजली दमानियांचा टोला.
रायगडच्या समुद्रात पाकिस्तानच्या बोटीकडून मासेमारी?
रायगडच्या समुद्रात पाकिस्तानच्या बोटीकडून मासेमारी?.