AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तारीख ठरली! इराण अमेरिका युद्ध संपणार?, थेट या देशात होणार..

इराण आणि अमेरिका युद्धाची झळ जगाला बसत आहे. यादरम्यानच होर्मुज खाडीत तणाव वाढताना दिसतोय. अमेरिकेने मोठी तटबंदी इराणच्या भोवती केली. पुढच्या आठवड्यापर्यंत इराण आणि अमेरिकेत युद्धबंदी आहे. यानंतर मोठे हल्ले होण्याची शक्यता आहे.

तारीख ठरली! इराण अमेरिका युद्ध संपणार?, थेट या देशात होणार..
iran america meet
| Updated on: Apr 14, 2026 | 1:19 PM
Share

इराण आणि अमेरिका युद्धबंदी कराराची पहिली बैठक इस्लामाबादमध्ये झाली. कित्येक तास ही बैठक सुरू होती. मात्र, बैठकीमधून कोणताही तोडगा निघू शकला नाही. जगाचे लक्ष या बैठकीकडे होते. मात्र, शेवटी काहीच मिळाले नाही. नुकताच मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही देश पुढच्या आठवड्यात होणाऱ्या युद्धबंदी पूर्वी युद्धबंदी कराराकरिता बैठक घेऊ शकतात. दोन्ही देशांना युद्धबंदी उठण्यापूर्वी समोरासमोर येऊन चर्चा करायची आहे. एसोसिएटेड प्रेसच्या रिपोर्टनुसार, नवीन युद्धबंदी कराराकरिता चर्चा सुरू आहे. मध्यस्थी करणाऱ्या देशांनी मोठा दावा केला. नवीन बैठकीसाठी चर्चा सुरू असल्याचे त्यांनी म्हटले. तेहरान आणि वॉशिंग्टन पुढच्या बैठकीसाठी तयार असल्याचे त्यांनी म्हटले. याबाबत अजून स्पष्ट नाही की, पहिल्या बैठकीत असलेले अधिकारी दुसऱ्या बैठकीत सहभागी होतील.

अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी दुसरीही बैठक इस्लामाबादमध्ये घ्यावी, याकरिता शिक्कामोर्तब केल्याची माहिती आहे. यासोबतच जिनेवामध्येही बैठक घेण्यास अमेरिका तयार असल्याचे कळतंय. सध्याच्या घडीला बैठकीची वेळ आणि ठिकाण ठरणे बाकी आहे, पण बैठकीची तारीख ठरली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरूवारी ही बैठक होणार आहे.

यादरम्यान युद्धबंदी करारावर चर्चा होईल. सर्वजण युद्धबंदीसाठी प्रयत्न करतील. तारीख बैठकीची ठरली आता फक्त ठिकाण आणि वेळ ठरणे बाकी आहे. नुकताच अमेरिकेने म्हटले आहे की, दुसऱ्या पक्षाने आमच्यासोबत संपर्क साधला आहे. त्यांना करार करायचा आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी इराण आणि अमेरिका यांच्यात लवकर चर्चा होईल, असे म्हटले.

शनिवारी 21 तास युद्धबंदीवर इराण आणि अमेरिकेत चर्चा झाली. पण मार्ग निघू शकला नाही. आता या बैठकीतून काही आनंदाची बातमी मिळेल, अशी अपेक्षा जगाला आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये युद्ध थांबले पाहिजे, ही जगाची भूमिका आहे. होर्मुज खाडीत अमेरिकेने केलेल्या नाकेबंदीमुळे स्थिती अधिक बिघडताना दिसत आहे. अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे इराणच्या अर्थव्यवस्थेवर थेटपणे परिणाम होणार आहे. युद्धबंदीच्या होणाऱ्या या बैठकीतून काहीतरी मार्ग निघेल, असे सांगितले जात आहे.

Follow Us
तरुणाच्या मृत्यू प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंची मोठी पावलं; पोलिसांत...
Lalbaugcha Raja : तरुणाच्या मृत्यू प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंची मोठी पावलं; पोलिसांत तक्रार, अन् उद्या हायकोर्टात...
मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही म्हणालात!
Amit Thackeray : मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही म्हणालात! फडणवीसांचा जुना VIDEO दाखवत अमित ठाकरेंचा सवाल
मसाल्यांच्या बाजारात स्प्रिंको या नव्या सीझनिंग ब्रँडचे लॉन्चिंग
Goldie Group : मसाल्यांच्या बाजारात गोल्डी ग्रुपचा नवा धमाका; स्प्रिंको या नव्या सीझनिंग ब्रँडचे लॉन्चिंग
सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; ढोल-ताशांमधील टोल...
Mumbai High Court : सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; ढोल-ताशांमधील टोलवाद्यांवरही कोर्टाचा दणका
दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले
Sanjay Shirsat : दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले; अंबादास दानवेंकडून VIDEO ट्विट करत शिरसाट यांच्यावर टीका
दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? सुनील तटकरेंनी स्पष्टच सांगितलं
NCP : दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? सुनील तटकरे यांनी स्पष्टच सांगितलं...
बळीराजाचा दसरा-दिवाळी काळी होऊ देणार नाही! शिंदेंची मोठी ग्वाही
Maharashtra Drought : बळीराजाचा दसरा-दिवाळी काळी होऊ देणार नाही! शिंदेंची मोठी ग्वाही, पुढे म्हणाले...
डब्यात काय आणायचं, हेही शाळा ठरवणार? मेथीची भाजी आणल्याने...
Mira Bhayandar : डब्यात काय आणायचं, हेही शाळा ठरवणार? मेथीची भाजी आणल्याने विद्यार्थ्याला दंड केल्याचा आरोप; प्रशासन ॲक्शन मोडमध्ये
पैसेवाल्यांना आंदोलनाला साथ द्यायची नाही का? जरांगे पाटलांचा सवाल
Manoj Jarange : पैसेवाल्यांना आंदोलनाला साथ द्यायची नाही का? जरांगे पाटलांचा सवाल; पुढे म्हणाले...
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला; आजची सुनावणी....
Shivsena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला; आजची सुनावणी पुढे ढकलली, नवी तारीख काय?