इराणच्या दूतावासाची भारतीय माध्यमांवर टीका, नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या
इराणनं भारतीय माध्यमांवर टीका केली आहे. ‘भारत आणि इराणमधील संबंध ऐतिहासिक आहेत, असा विचार करायला हवा. टीका करणे रास्त आहे, पण टीका आणि अपमान यातला फरक लक्षात घेणं गरजेचं आहे,’ असं इराणच्या दूतावासने म्हटले आहे.

इराणच्या दूतावासानं भारतीय माध्यमांवर टीका केला आहे. भारतीय प्रसारमाध्यमांनी टीका आणि अपमान यातला फरक लक्षात घेणं गरजेचं आहे, असं म्हणत भारतीय माध्यमांना लक्ष केलं आहे. इराणच्या दूतावासाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर आवाहन केले आहे की, “सनसनाटी आणि चुकीचा मजकूर पसरविणे टाळावे’’ दरम्यान, भारतीय माध्यमांनी असं काय म्हटलं आहे, ज्यामुळे इराणचं रक्त खवळलं आहे, याविषयीची माहिती पुढे जाणून घ्या.
इराण हा भारताचा मित्र असून पाकिस्तानला डावलून भारताला अफगाणिस्तानमार्गे मध्य आशियात व्यापाराचा मार्ग उपलब्ध करून देतो. इराण अनेक वर्षांपासून भारताचा मित्र देश आहे, पण भारतीय प्रसारमाध्यमांच्या काही घटकांनी इराणच्या सर्वोच्च नेत्याबद्दल सांगितलेल्या काही गोष्टींमुळे दोन्ही देशांमध्ये दुरावा निर्माण होत आहे.
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्याबद्दल भारतीय माध्यमांमध्ये अशा काही गोष्टी बोलल्या गेल्या आहेत, ज्याला दिल्लीतील इराणी दूतावासाने आक्षेपार्ह म्हटले आहे आणि त्यावर जोरदार टीका केली आहे. दिल्लीतील इराणच्या दूतावासाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भारतीय प्रसारमाध्यमांनी खोट्या आणि बनावट बातम्या पसरवून लोकांचा विश्वास आणि व्यावसायिक विश्वासार्हतेशी तडजोड करू नये.
अलीकडच्या काळात असे लक्षात आले आहे की, काही प्रसिद्ध प्रसारमाध्यमांसह काही भारतीय प्रसारमाध्यमांनी इराण आणि त्याच्या महान नेतृत्वाचा अवमान करणारे निराधार वृत्त प्रसिद्ध केले आहे. अशा बेजबाबदार वार्तांकनामुळे लोकांचा विश्वास तर डळमळीत होतोच, शिवाय प्रेक्षकांमध्ये या मीडिया हाऊसेसच्या व्यावसायिक प्रतिष्ठेलाही मोठा धक्का बसतो.”
इराणच्या दूतावासावरील आक्षेप एका सेकंदासाठी बाजूला ठेवून भारतीय प्रसारमाध्यमांनी भारत आणि इराणमधील संबंध ऐतिहासिक आहेत, असा विचार करायला हवा. आणि कोणत्याही देशाच्या नेत्यावर टीका करणे रास्त आहे, पण सीमारेषेचे उल्लंघन करणे चुकीचे आहे. टीका आणि अपमान यातला फरक लक्षात घेणं गरजेचं आहे, कारण हा दोन देशांमधील महत्त्वाच्या संबंधांचा विषय आहे.
इराणच्या दूतावासाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर लिहिले की, “दूतावास अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि माहिती मिळविण्याच्या जनतेच्या अधिकाराचा पूर्ण आदर करतो, परंतु भारतीय प्रसारमाध्यमांना विश्वासार्ह आणि निःपक्षपाती स्त्रोतांवर अवलंबून राहण्याचे आणि इराणबद्दल सनसनाटी आणि चुकीचा मजकूर पसरविणे टाळण्याचे जोरदार आवाहन करतो.
भारतीय प्रसारमाध्यमांमध्ये काही ठिकाणी इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांनी मोसादचा हवाला देत बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या. इस्रायली गुप्तचर संस्था मोसादच्या सोशल मीडिया हँडलवर इराणच्या सर्वोच्च नेत्याचे वर्णन ‘ड्रग्ज अॅडिक्ट’ असे करण्यात आले होते. ज्यावर इराणने तीव्र आक्षेप घेतला आहे. इराणने या अकाऊंटचे वर्णन प्रोपगंडा अकाऊंट असे केले आहे.
भारतासाठी इराण आणि इस्रायल हे दोन्ही देश महत्त्वाचे भागीदार, मित्र आणि सखोल संबंध आहेत. त्यामुळे इराण आणि इस्रायल यांच्यात नुकत्याच झालेल्या संघर्षातही भारताने समतोल दृष्टिकोन अवलंबला. पण प्रसारमाध्यमांमध्ये वार्तांकन करताना काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात की, माध्यमांमध्ये जे काही लिहिलं जातं त्याचा परिणाम सामान्य जनतेच्या विचारसरणीवर होतो आणि अशा अपमानजनक वार्तांकनामुळे इराणच्या लोकांमध्ये भारताविषयी नकारात्मक गोष्टी भडकू शकतात आणि भारत सरकारच्या धोरणातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘लोकांमधील संबंध’ निर्माण करणे. त्यामुळे उभय देश आणि त्यांचे नेते यांच्यातील संबंधांविषयी जबाबदारीने लिहायला हवे.
