AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमेरिका, इस्त्रायल, ब्रिटन किंवा नाटो नाही तर या ग्रुपला घाबरतो इराण

ओपेक प्लसमध्ये ईयू,नाटो, ब्रिक्स, जी7 यासारखे पॉलिटिकल आणि डिप्टोमॅटिक ग्रुप नाही. या ग्रुपमध्ये क्रूड आईलचे उत्पादन करणारे देश आहे. या ग्रुपच्या एका वक्तव्यानंतर कच्चा तेलाच्या किंमतीत बदल होतो.

अमेरिका, इस्त्रायल, ब्रिटन किंवा नाटो नाही तर या ग्रुपला घाबरतो इराण
| Updated on: Jun 23, 2025 | 7:34 AM
Share

इराण आणि इस्त्रायल युद्ध सुरु असताना त्यात अमेरिकेची एन्ट्री झाली आहे. अमेरिका, ब्रिटन आणि युरोपमधील अनेक देश इराणच्या विरोधात उभे राहिले आहेत. यानंतरही इराणवर कोणताही फरक पडलेला नाही. पण एक गट असाही आहे ज्याचा प्रत्येक शब्द इराणला पाळावा लागतो. या गटात इराणसह २२ देशांचा समावेश आहे. या गटाचे नाव ओपेक प्लस आहे. यामध्ये कच्च्या तेलाचे उत्पादन करणाऱ्या मध्य पूर्वेतील देशांचा समावेश आहे. तसेच कच्च्या तेलाचे उत्पादन करणाऱ्या मध्य पूर्वेव्यतिरिक्त इतर देशांचाही या गटात समावेश आहे. ज्यामध्ये रशिया खूप महत्त्वाचा आहे.

ओपेक प्लस का महत्वाचा?

इराण ओपेक प्लस देशात सर्वात मोठ्या ऑईल प्रोड्यूसर देशापैकी एक आहे. यामुळे ओपेक प्लसने दबाव आणला तर इराणला त्यांचा शब्द पाळावा लागतो. विशेष म्हणजे ओपेकमधील देश जगातील अर्ध्यापेक्षा जास्त कच्चा तेलाचे उत्पादन करतात.

ओपेक प्लसमध्ये ईयू,नाटो, ब्रिक्स, जी7 यासारखे पॉलिटिकल आणि डिप्टोमॅटिक ग्रुप नाही. या ग्रुपमध्ये क्रूड आईलचे उत्पादन करणारे देश आहे. हा ग्रुप जगातील अर्ध्यापेक्षा जास्त क्रूड आईलचे उत्पादन स्वत: करतो. यामुळे हा ग्रुप खूप सामर्थ्यवान आहे. त्या ग्रुपच्या एका वक्तव्यानंतर कच्चा तेलाच्या किंमतीत बदल होतो. या ग्रुपकडे जगातील अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर इतकी पकड आहे की ते कधीही त्यावर दबाव आणू शकतात आणि समस्या निर्माण करू शकतात. यामुळे इराण या ग्रुपचा शब्द टाळू शकत नाही. यामुळे ओपेक प्लस ग्रुप युद्ध थांबवण्यासाठी काही पावले उचलणार का? याकडे लक्ष लागले आहे.

अमेरिका एनर्जी इन्फॉर्मेशन एजन्सीच्या अहवालानुसार, ओपेक आणि नॉन-ओपेक देश यांनी मिळून ओपेक प्लस नाव दिले आहे. ओपेक प्लस एका दिवसांत 45.2 दशलक्ष बॅरल कच्चा तेलाचे उत्पादन करतात. त्यातील ओपेकमधील 12 देशांचे एका दिवसाचे उत्पादन 28.7 दशलक्ष बॅरल आहे. नॉन ओपेक देशांचे प्रॉडक्शन दिवसाचे उत्पादन 16.5 दशलक्ष बॅरल आहे. ओपेक देशांकडून सर्वाधिक 10.4 दशलक्ष बॅरल उत्पादन सौदी अरेबियाचे आहे. नॉन ओपेक देशांत सर्वाधिक 10.3 दशलक्ष बॅरल उत्पादन रशियाचे आहे.

चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...