AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्वतःवर संकट असतानाही इराण भारताच्या मदतीला, होर्मुझबाबत मोठी घोषणा, भारतावरील संकट टळणार

India Iran Relation : होर्मुझ सामुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या जहाजांची चिंता वाढली आहे. अशातच आता या संकटाच्या काळात इराण भारताच्या मदतीला धावला आहे. इराणने एक मोठी घोषणा केली आहे.

स्वतःवर संकट असतानाही इराण भारताच्या मदतीला, होर्मुझबाबत मोठी घोषणा, भारतावरील संकट टळणार
India IranImage Credit source: Google
| Updated on: Apr 13, 2026 | 9:54 PM
Share

इराण आणि अमेरिकेतील तणाव आणखी वाढला आहे, त्यामुळे होर्मुझ सामुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या जहाजांची चिंता वाढली आहे. अशातच आता या संकटाच्या काळात इराण भारताच्या मदतीला धावला आहे. इराणने स्पष्ट केले आहे की, होर्मुज सामुद्रधुनी मधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल आकारलेला नाही. पुढे इराणने आगामी काळात भारताला मदत करण्याची घोषणा केली आहे. भारतातील इराणचे राजदूत मोहम्मद फतहली यांनी सांगितले की, ‘तुम्ही भारत सरकारला विचारू शकता, आम्ही आतापर्यंत कोणताही टोल घेतलेला नाही.’ पुढे बोलताना त्यांनी म्हटले की, या कठीण काळात भारत आणि इराण यांचे संबंध मजबूत आहेत आणि दोन्ही देशांचे हितसंबंध समान आहेत.

इराण भारताला मदत करणार

स्वतः संकटात असणाऱ्या इराणने मदतीचे आश्वासन देताना म्हटले की भारतीय जहाजांना होर्मुज सामुद्रधुनीतून सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी मदत करू. फतहली यांनी सांगितले की, इराणचा भारत सरकारशी चांगला संपर्क आहे आणि भारतीय जहाजे कोणत्याही अडचणीशिवाय या मार्गाने जावीत अशी त्यांची इच्छा आहे. इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी भारताला त्यांच्या 5 विश्वासार्ह आणि खास मित्र देशांपैकी एक मानले आहे, ही खूप महत्त्वाची बाब आहे.

भारतानेही टोल वसूल केल्याच्या बातम्या फेटाळल्या

भारताने यापूर्वी स्पष्ट केले होते की, आपल्या जहाजांना बाहेर काढण्यासाठी इराणला कोणताही टोल दिलेला नाही. विशेष बाब म्हणजे युद्धाच्या काळात होर्मुज सामुद्रधुनीत वाहतूक जवळपास ठप्प झाली होती, तेव्हा भारताची 9 LPG जहाजे या भागातून सुरक्षित बाहेर पडली होती. सध्या सुमारे 15 भारतीय ध्वज असलेली जहाजे फारसच्या आखातात अडकलेली आहेत, तीही लवकरच बाहेर पडण्याची शक्यता आहे.

होर्मुज सामुद्रधुनी भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा सागरी मार्ग आहे. भारताचा जवळपास अर्धा कच्चा तेल आणि LPG याच मार्गाने येतो. त्यामुळे या भागात अडचण निर्माण झाल्यास भारताच्या ऊर्जा पुरवठ्यावर आणि व्यापारावर थेट परिणाम होतो. आता फतहली यांनी भारत सरकार आणि भारतीय नागरिकांचे आभार मानले आहे, त्यांनी म्हटले की, या कठीण काळात भारताने एक विश्वासू मित्र म्हणून साथ दिली आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...