Iran-US Tension : युद्धाचं काउंटडाउन! जे सांगितलं करु नका तेच केलं, खामेनेईने ट्रम्पना तोंडावर पाडलं, इराणकडून अमेरिकेला पहिलं ओपन चॅलेंज
Iran-US Tension :अमेरिका आणि इराणमध्ये युद्ध कधीही भडकेल अशी स्थिती आहे. या परिस्थितीत इराणने युद्धाची ठिणगी टाकणारं काम केलं आहे. डोनाल्ड ट्रम्प जे करु नका असं वारंवार सांगत होते, तेच इराणने केलय. खामेनेईने ट्रम्प यांना तोंडावर पाडलं आहे. त्यामुळे अमेरिका आता काय उत्तर देणार? ही चर्चा सुरु झालीय.

इराणमध्ये शुक्रवारी अली रहबर या व्यक्तीला फाशी देण्यात आली. सत्ता विरोधी आंदोलनाचं सर्वात मोठं केंद्र राहिलेल्या मशहद मधून त्याला अटक करण्यात आली होती. अलीला इराणमध्ये सत्ता विरोधी प्रदर्शनाच्या आरोपावरुन अटक करण्यात आली होती. पेशाने तो एक स्पोर्ट्स कोच आणि फिटनेस ट्रेनर होता. त्याचं वय अवघं 33 वर्षांचं होतं. इराणमध्ये सत्ता विरोधी प्रदर्शनाच्या आरोपावरुन जवळपास 30 हजार लोकांना अटक करण्यात आली आहे. यात पहिली फाशी अली रहबरला देण्यात आली. आंदोलकांना फाशी देऊ नका असं डोनाल्ड ट्रम्प यांनी बजावलं होतं. मात्र, तरीही खामेनेई प्रशासनाने अली रहबरला फासावर लटकवलं. या घटनेने अमेरिका आणि इराणमध्ये युद्धासाठी ठिणगी टाकण्याचं काम केलं आहे.
इराणने हे पाऊल अशावेळी उचललय जेव्हा त्यांना चारही बाजूने अमेरिकेने घेरलेलं आहे. अमेरिकेच्या युद्धनौका इराणच्या दिशेने निघाल्या आहेत. अमेरिकेचा सर्वात मोठा नौदल ताफा इराणच्या दिशेने येत असल्याचं अमेरिकी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वत: सांगितलं होतं. याआधी डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या हस्तक्षेपामुळे इराणमध्ये 800 लोकांची फाशी थांबवण्यात आली असा दावा केला होता. पण इराणने आपल्या कृतीतून ट्रम्प यांच्या दाव्यात दम नसल्याचं दाखवून दिलं आहे. एकप्रकारे ट्रम्प यांना तोंडावर पाडलं आहे.
दावा पूर्णपणे निराधार
या दरम्यान इराणमध्ये आंदोलकांविरुद्ध करण्यात आलेल्या हिंसक कारवाईमध्ये मरण पावणाऱ्यांची संख्या 5002 पर्यंत पोहोचली आहे. इराणने विरोध प्रदर्शनादरम्यान ताब्यात घेतलेल्या 800 आंदोलकांची फाशी थांबवली असा ट्रम्प यांनी वारंवार दावा केला होता. ते कुठल्या आधारावर हा दावा करतायत, या बद्दल ट्रम्प यांनी काही माहिती दिली नव्हती. इराणची वृत्तसंस्था ‘मिजान’ने शुक्रवारी देशाचे वरिष्ठ वकिल मोहम्मद मोवाहेदी यांच्या हवाल्याने एक बातमी प्रकाशित केली. त्यात म्हटलेलं की, ट्रम्प यांचा दावा पूर्णपणे निराधार आहे. अशी कुठलीही संख्या उपलब्ध नाही तसच न्यायपालिकेने सुद्धा असा कुठला निर्णय घेतलेला नाही.
सरकारच्या विरोधाची शिक्षा मृत्यूदंड
यूएसएस अब्राहम लिंकनसह अमेरिकी युद्धनौकांचा एक मोठा ताफा पश्चिम आशियाच्या दिशेने येतोय. अमेरिका आणि इराणमधील तणाव आणखी वाढला आहे. ट्रम्प सैन्य उपस्थितीद्वारे खामेनेई प्रशासनावर दबाव टाकत आहेत. पण त्यामुळे ट्रम्प यांच्याकडे हल्ला करण्याचा सुद्धा एक पर्याय आहे. इराणच्या न्यायपालिकेने फास्ट ट्रॅक जस्टिसची घोषणा केली आहे. रहबरच्या फाशीच्या शिक्षेमध्ये हेच मॉडल लागू केलं. इराणने आंदोलकांना कठोर संदेश दिला आहे. सरकारच्या विरोधाची शिक्षा मृत्यूदंडच आहे.
