AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इराणच्या हल्ल्यांमुळे इस्रायल उद्ध्वस्त, तब्बल 30 हजारांहून अधिक…, वाचा आकडेवारी

इराण आणि इस्रायलमधील युद्ध आता थांबले आहे. इराणी हल्ल्यांमुळे इस्रायलला मोठा फटका बसला आहे. या युद्धामुळे झालेल्या नुकसानाची आकडेवारी आता समोर आली आहे.

इराणच्या हल्ल्यांमुळे इस्रायल उद्ध्वस्त, तब्बल 30 हजारांहून अधिक..., वाचा आकडेवारी
| Updated on: Jun 25, 2025 | 3:07 PM
Share

इराण आणि इस्रायलमधील युद्ध आता थांबले आहे. या युद्धामुळे दोन्ही देशांचे मोठे नुकसान झाले आहे. खासकरुन इराणी हल्ल्यांमुळे इस्रायलला मोठा फटका बसला आहे. 13 जून रोजी सुरु झालेले हे युद्ध 24 जून रोजी थांबले. या युद्धामुळे इस्रायलमध्ये मोठ्या प्रमाणात विनाश झाला आहे. या युद्धामुळे झालेल्या नुकसानाची आकडेवारी आता समोर आली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

30 हजार घरांचे नुकसान

समोर आलेल्या माहितीनुसार 12 दिवसांच्या युद्धात इस्रायलमधील सुमारे 39 हजार लोकांनी नुकसान भरपाईसाठी अर्ज केले आहेत. यापैकी 30, 809 अर्ज घरांच्या नुकसानीबाबतचे आहेत. या सर्व लोकांनी त्यांच्या घराचे किंवा अपार्टमेंटचे इराणच्या हल्ल्यांमुळे नुकसान झाल्याचा दावा केला आहे. तसेच 3713 अर्ज हे वाहनांचे नुकसान झाल्याबद्दल आले आहेत. तसेच यंत्रसामग्री आणि इतर वस्तूंच्या नुकसानासाठी 4085 अर्ज आले आहेत.

या अर्जांव्यतिरिक्त इतरही हजारो इमारतींचे नुकसान झाले आहे, मात्र नुकसान भरपाईबद्दल अर्ज करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे आगामी काळात घरांच्या नुकसानीचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

तेल अवीवमध्ये सर्वात जास्त नुकसान

स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार इस्रायलची राजधानी तेल अवीवमध्ये सर्वाधिक नुकसान झाले असल्याचे समोर आले आहे. या शहरातून 24,932 लोकांनी नुकसान भरपाईसाठी अर्ज केले आहेत. त्यानंतर अश्केलोन मध्येही जास्त नुकसान झाले आहे. या शहरातून 10,793 लोकांना नुकसान भरपाईसाठी अर्ज केला आहे.

इस्रायल सरकारने लोकांना किती नुकसान भरपाई मिळणार याबाबत माहिती दिलेली नाही. मात्र आगामी काळात भरपाईसाठी येणाऱ्या अर्जांची संख्या वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे याचा भार सरकारवर पडणार आहे.

12 दिवसांनंतर युद्ध थांबले

सुरुवातील इस्रायल आणि इराणने एकमेकांच्या लष्करी तळांवर हल्ला केला. त्यानंतर अमेरिकाही या युद्धात उतरली होती. अमेरिकेना इराणच्या 3 अणुतळांवर हल्ला केला होता. त्यामुळे हे युद्ध आणखी पेटले होते. 12 दिवसांच्या युद्धानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धबंदीची घोषणा केली. मात्र दोन्ही देशांमध्ये युद्धाच्या खुणा दिसत आहेत.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.