AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एलियन्समुळे इराण विरुद्ध इस्रायल युद्ध पेटलं, महिलेचा खळबळजनक दावा

इराण आणि इस्रायल यांच्यात युद्ध सुरू आहे.दोन्ही बाजूंनी एकमेकांवर क्षेपणास्त्रे डागली जात आहेत.अशातच आता एका महिलेने एलियन्समुळे इराण आणि इस्रायलमधील युद्ध सुरू झाले असा दावा केला आहे.

एलियन्समुळे इराण विरुद्ध इस्रायल युद्ध पेटलं, महिलेचा खळबळजनक दावा
Aliens and war
| Updated on: Jun 17, 2025 | 10:10 PM
Share

गेल्या काही दिवसांपासून इराण आणि इस्रायल यांच्यात युद्ध सुरू आहे. सर्वप्रथम 13 जून रोजी इस्रायलने इराणवर हवाई हल्ला केला. यात इराणमधील अणु आणि लष्करी तळांना लक्ष्य करण्यात आले होते. तेव्हापासून दोन्ही देशांकडून सतत हल्ले होत आहेत. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर क्षेपणास्त्रे डागली जात आहेत. बऱ्याच देशांनी या युद्धाबाबत आपली भूमिका जाहीर केली आहे. त्यामुळे जग आता तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर तर नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

अशातच आता एका महिलेने खळबळजनक दावा केला आहे. एलियन्समुळे इराण आणि इस्रायलमधील युद्ध सुरू झाले आहे असं एमिली ईटन नावाच्या महिलेने म्हटलं आहे. एका टिकटॉक व्हिडिओमध्ये तिने एलियन्स पृथ्वीच्या जवळ येत आहेत, ज्यामुळे इस्रायल आणि इराणमध्ये संघर्ष सुरू झाला आहे असं भाष्य केलं आहे.

महिलेचा खळबळजनक दावा

ही महिला स्वतःला इंटर-डायमेंशनल कम्युनिकेटर असे म्हणवते. तसेच मी एलियन्स आणि देवदुतांशी बोलू शकते असंही या महिलेनं म्हटलं आहे. पुढे बोलताना ईटन म्हणाली की, ‘मला आशा आहे की या महिन्यात आपल्याला आकाशात एलियन्सची मदरशीप दिसेल. एलियन्सने टेलिपॅथिक पद्धतीने मला मेसेज पाठवला आहे, जो मी आयपॅडच्या मदतीने शब्दांमध्ये रूपांतरित केला.’

एमिलीने तिच्या व्हिडिओमध्ये एलियन्सने पाठवलेला मेसेज वाचला. या मेसेजमध्ये एलियन्स म्हणतात की, “आम्ही सध्या तुमच्या ग्रहाभोवती घडणाऱ्या घटनांवर लक्ष ठेवत आहोत. आम्हाला दिसत आहे की मीडियात काही बाबी वाढवून सांगितल्या जात आहेत. मात्र जे सांगायला हवं ते सांगितले जात नाही. काही घटना अशा आहेत ज्या मीडियात दाखवण्यात आलेल्या आहेत तितक्या वाईट नाहीत.”

एलियन्स पृथ्वीच्या जवळ आल्यामुळे युद्ध सुरू

एमिलीने असा दावा केला आहे की, ‘काही एलियनच्या पृथ्वीचे निरिक्षण करत आहेत. त्यांना पृथ्वीच्या घनतेत बदल जाणवत आहे कारण ते आपल्या आणखी जवळ येत आहेत. त्यामुळे इराण आणि इस्रायलमधील युद्ध सुरू झाले असावे. येणाऱ्या काळात जगभरातील लोकांना उर्जेचा भार जाणवण्याची शक्यता आहे. यामुळे थकवा, आर्थिक ताण आणि उदासीनता वाढेल. मात्र पृथ्वीवरील बिघडलेल्या गोष्टी दुरुस्त करण्यासाठी एलियन्स येत आहेत. दरम्यान, या महिलेचा हा विचित्र दावा आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.