AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Israel Iran War : इस्रायलचा इराणला आणखी एका मोठा दणका, आता थेट.. युद्धाचे ताजे अपडेट्स जाणून घ्या

Israel Iran War : इस्रायलने इराणला आणखी एक मोठा दणका दिला आहे. इराण फक्त इस्रायलच्या नागरी वस्त्यांवर हल्ला करतोय. पण इस्रायल इराणला शक्तीहीन करण्यासाठी अचूक वार करतोय. आता सुद्धा त्यांनी तसच केलं आहे. इराणच्या इस्फहान शहरातही स्फोटाचे मोठे आवाज ऐकू आलेत.

Israel Iran War : इस्रायलचा इराणला आणखी एका मोठा दणका, आता थेट.. युद्धाचे ताजे अपडेट्स जाणून घ्या
Iran Israel War
| Updated on: Jun 21, 2025 | 11:26 AM
Share

इराण आणि इस्रायलमध्ये सध्या हल्ला आणि प्रतिहल्ला सुरु आहे. इराणने पुन्हा एकदा इस्रायलची राजधानी तेल अवीवर बॅलेस्टिक मिसाइल आणि रॉकेटने हल्ला केला आहे. सेंट्राल इस्रायलमध्ये सायरन वाजू लागले आहेत. इराणी रॉकेट शहराला लक्ष्य करत आहेत असं टाइम्स ऑफ इस्रायलने म्हटलं आहे. इस्रायलमध्ये पुन्हा एकदा काही ठिकाणी स्फोट झाले आहेत. इस्रायली एअर डिफेन्सने काही मिसाइल आणि रॉकेट्सना इंटरसेप्ट करण्यात यश मिळवलं आहे. “शुक्रवारी तेहरानच्या मिसाइल आणि ड्रोन्सनी सैन्य ठिकाणं, संरक्षण उद्योग कमांड आणि नियंत्रण केंद्रांविरुद्ध लांब पल्ल्याची आणि अत्याधुनिक मिसाइल्सचा वापर केला” असं इराणी सैन्य प्रवक्त्याच्या हवाल्याने फार्स वृत्तसंस्थेने म्हटलं आहे.

इराणने त्यांच्या ताज्या हल्ल्यात 20 मिसाइल्स डागली. इस्रायली रुग्णवाहिका सेवेनुसार त्यात दोन जण जखमी झाले. इस्रायली सैन्य अधिकाऱ्याने ही माहिती दिली. इस्रायली माीडियानुसार इराणच्या हल्ल्यानंतर मध्य इस्रायलमध्ये एका चार मजली इमारतीच्या छतावर आग भडकली. अग्निशमन पथक घटनास्थळी आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. हल्ल्यात कोणी फसलेलं नाही किंवा जखमी झालेलं नाही. इस्रायलचे परराष्ट्र मंत्री गिदोन यांच्यानुसार, इराणने दक्षिण इस्रायलच्या बीरशेबा आणि उत्तरेला हायफावर मिसाइल्स डागली. ज्यात ओटोमन काळातील एका मशिदीच नुकसान झालं.

इराणचा मोठा कमांडर ठार

इस्रायलकडून सुद्धा इराणमध्ये हल्ले सुरु आहेत. रिवोल्यूशनरी गार्डच्या सेकेंड यूएवी ब्रिगेडचा कमांडर अमीनपुर जौदकी एअरफोर्सच्या हवाई हल्ल्यात ठार झाला आहे, असा दावा इस्रायलने केला आहे. अमीनपुर जौदकीने दक्षिण-पश्चिम इराणच्या अहवाज क्षेत्रातून इस्रायलमध्ये शेकडो UAV हल्ले केले होते. 13 जून 2025 रोजी आयआरजीसी वायुसेना यूएवी मुख्यालयाचा कमांडर ताहिर पौरचा खात्मा झाला. त्यानंतर जौदकीने हेडक्वार्टर ऑपरेट करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

इस्रायलने इराणमध्ये कुठे-कुठे हल्ला केला?

पश्चिम इराणमधील मिसाइल लॉन्चिंग साइटवर हल्ला केल्याच इस्रायली सैन्याने शुक्रवारी सांगितलं. त्याआधी फायटर जेट्सनी दक्षिण-पश्चिम इराणमध्ये जमिनीवरुन हवेत मारा करणाऱ्या मिसाइल बॅटरीवर हल्ला केल्याी माहिती इस्रायलने दिली होती. इराण इस्रायलच्या नागरी भागांना लक्ष्य करत आहे, तर इस्रायलकडून इराणच्या सैन्य संपत्तीवर हल्ले सुरु आहेत. जेणेकरुन इराणची इस्रायलवर हल्ला करण्याची क्षमता संपून जाईल.

इस्फहानवर मिसाइल हल्ला

इराणची न्यूक्लियर रिसर्च साइट इस्फहानमध्ये आज स्फोटाचे आवाज ऐकू आले. इस्रायलने इराणच्या इस्फहान शहरावर आज मिसाइल्सचा पाऊस पाडला.

शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.