इस्त्रायलच्या धमकीला इराणचे सुप्रीम लीडर खामेनेई घाबरले, घर सोडून परिवारासह अंडरग्राउंड बंकरमध्ये
Iran Israel War: इस्त्रायल आक्रमक झाला आहे. यामुळे इराणचे सर्वोच्च नेता अयातुल्ला अली खामेनेई आणि त्यांचा परिवार सुरक्षित बंकरमध्ये राहत आहे. त्या बंकरवर बॉम्ब किंवा क्षेपणास्त्राचाही काहीच परिणाम होत नाही.

Iran Israel War: इराण आणि इस्त्रायल युद्धात दोन्ही राष्ट्रांकडून भीषण हल्ले सुरु आहे. इस्त्रायलवर इराणकडूनही हल्ले करण्यात आले. त्यानंतर इस्त्रायलकडून अधिक आक्रमकपणे हल्ले सुरु झाले आहेत. त्यामुळे इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनेई यांनी आपले घर सोडले आहे. इराणच्या सैन्याने खामेनेई यांना पूर्व तेहरानमधील एका बंकरमध्ये शिफ्ट केले आहे. इस्त्रायलकडून खानेनेई आणि त्यांच्या परिवारास लक्ष्य करण्याची भीती इराणच्या सैन्याला वाटत आहे. त्यामुळे त्यांना बंकरमध्ये शिफ्ट केले गेले आहे.
इराण इंटरनॅशनलच्या रिपोर्टमध्ये दावा केला आहे की, इराणचे सर्वोच्च नेता अयातुल्ला अली खामेनेई आणि त्यांचा परिवार सुरक्षित बंकरमध्ये राहत आहे. त्या बंकरवर बॉम्ब किंवा क्षेपणास्त्राचाही काहीच परिणाम होत नाही. खामेनेई यांचा मुलगा मुज्तबा आणि त्याचा परिवारासही बंकरमध्ये ठेवण्यात आले आहे. या बंकरच्या जवळपास सुरक्षेच्या कठोर उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
खामेनेई इस्त्रायलच्या निशाण्यावर
इस्त्रायलने इराणवर हल्ला करत इराणी लष्काराचे प्रमुख आणि आयआरजीसी कमांडरला ठार मारले. तसेच इराणच्या कमीत कमी नऊ अणूशास्त्रज्ञांचा मृत्यू इस्त्रायलच्या हल्ल्यात झाला आहे. इस्त्रायलकडून अली खामेनेई सुरक्षित नाही, अशी धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे इराणच्या लष्कराला खामेनेई यांच्या सुरक्षेची चिंता वाटत आहे. खामेनेई यांच्यावर हल्ला झाला तर इराणमध्ये मोठी अव्यवस्था निर्माण होणार आहे. त्यामुळे त्यांना सुरक्षित बंकरमध्ये ठेवण्यात आले आहे.
इराण आणि इस्त्रायल दरम्यान १३ जूनपासून युद्ध सुरु आहे. सोमवारी युद्धाच्या चौथ्या दिवशीही दोन्ही देशांकडून जोरदार हल्ले प्रतिहल्ले करण्यात आले. त्यामुळे संपूर्ण युरोपमध्येही चिंतेचे वातावरण आहे. इस्त्रायलने आपल्या हल्ल्यांचे लक्ष्य इराणाचे अणू उर्जा केंद्र आणि अणू शास्त्रज्ञांना केले आहे. राजधानी तेहरान आणि इतर प्रमुख शहरांवर झालेल्या हल्ल्यानंतर इराणसुद्धा संतापला आहे. इराणकडून इस्त्रायलच्या शहरांवर हल्ले सुरु आहे. दोन्ही देशांच्या युद्धामुळे पश्चिम आशियातील शांतता धोक्यात आली आहे. त्याचा परिणाम शेजारच्या देशांवर होऊ लागला आहे.