Donald Trump : यावेळी गोळीचा निशाणा चुकणार नाही, डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येची धमकी, या देशाचा मोठा इशारा
महागाईमुळे इराणमध्ये सध्या खूप अशांतता पसरली आहे. खामेनी सरकारविरुद्ध लोक रस्त्यावर उतरले आहेत. सरकारने निदर्शने शांत करण्यासाठी कठोर कारवाई करण्याची धमकी दिली आहे.

अमेरिकेने केलेल्या हल्ल्यामुळे इराण संतापलं असून आता या धोक्याच्या पार्श्वभूमीवर, इराणच्या सरकारी टीव्हीने डोनाल्ड ट्रम्प यांना गोळ्या घातल्याचे फुटेज प्रसारित केले आहे. मात्र हे फुटेज 2024 सालचं आहे, जेव्हा डोनाल्ड ट्रम्प पेनसिल्व्हेनियामध्ये प्रचार करत होते. हल्ल्यादरम्यान त्यांच्या कानाजवळ गोळी लागली होती, परंतु अखेर ते बचावले. हाच व्हिडीओ पुन्हा रिलीज करण्यात आला आहे. इराणच्या सरकारी टीव्हीने हे फुटेज प्रसारित केलं असून त्यासोबत एक कॅप्शनही दिली आहे. यावेळी गोळ्यांचंलक्ष चुकणार नाही असं त्यासोबत लिहीण्यात आलं आहे. त्यांचे लक्ष्य चुकवणार नाहीत. याचा अर्थ असा की जर हल्ला झाला तर ट्रम्प यांनाही सोडले जाणार नाही, असा इशाराच देण्यात आला आहे. हे फुटेज खूप व्हायरल होत आहे.
यापूर्वीही खुनाच्या प्रयत्नाचे दावे
इराणने ट्रम्प यांना अनेक वेळा मारण्याचा प्रयत्न केला होता असा दावा जुलै 2025 मध्ये, रिपब्लिकन सिनेटर टेड क्रूझ यांनी केला होता. ते वरिष्ठ अमेरिकन पत्रकार टर्कर कार्लसन यांच्याशी बोलत होते. कोणीही त्यांच्या आवाक्याबाहेर नाही हे सिद्ध करण्यासाठी इराणला अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना मारायचे आहे असंही त्यांनी म्हटलं
क्रूझच्या दाव्यापूर्वी, ट्रम्प यांनी फेब्रुवारी 2025 मध्ये इराणबाबत एक विधान देखील केले होते. या विधानात ट्रम्प यांनी म्हटलं होतं की, जर इराणने त्यांची हत्या केली तर त्यांनी इराणी राज्याचा नाश करण्याचे आदेश दिले होते.
गोंधळावरून ट्रम्प आणि इराण आमनेसामने
महागाईमुळे इराणमध्ये सध्या खूप अशांतता पसरली आहे. खामेनी सरकारविरुद्ध लोक रस्त्यावर उतरले आहेत. सरकारने निदर्शने शांत करण्यासाठी कठोर कारवाई करण्याची धमकी दिली आहे. जर इराणने कठोर कारवाई केली तर ते प्रत्युत्तर देतील असं ट्रम्प यांनी म्हटलं होतं.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार, ते इराणमधील अत्याचार शांतपणे पाहू शकणार नाही. वृत्तसंस्था रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार, इराणवर हल्ला करण्यासाठी वॉशिंग्टन ते तेल अवीव पर्यंत उच्चस्तरीय बैठकांच्या अनेक फेऱ्या झाल्या आहेत. जून 2025 मध्येही अमेरिका आणि इस्रायलने अण्वस्त्रे बनवण्याच्या मुद्द्यावर संयुक्तपणे इराणवर हल्ला केला होता.